ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गुरुपौर्णिमा संदेश
कर्तव्यं हाच परमेश्वर - कर्म हीच भक्ती
जर आपण आपली लहान मोठी सर्व कर्मं परिपूर्णतेने केली तर सामान्य कर्मं भक्तीमध्ये परिवर्तित होतात. जेव्हा आपण आपली सर्व कर्मं या पद्धतीने परमेश्वराला समर्पित करतो तेव्हा ती सामान्य कर्मं कर्मयोग बनतात. मी माझ्या 'साई गीता प्रवचनम' या पुस्तकातील 'कर्मयोग' या प्रकरणांमध्ये, सकाळपासून रात्रीपर्यंत मी माझे प्रत्येक कर्म कशाप्रकारे करते याविषयी सविस्तर लिहिले आहे.
जर आपण घरामधील आपली सर्व कर्मं परमेश्वराप्रीत्यर्थ केली तर ते परमेश्वराच्या चरणावरील एक पुष्प बनते. तुम्ही तुमच्या मुलाला दूध पाजताना वा खाऊ घालताना जर त्याला परमेश्वर समजून खाऊ घातलेत तर या भावनेने तुम्ही यशोदा आणि तो बाळकृष्ण व्हाल. अधून मधून तुम्ही मंदिरात जाता परमेश्वराला भक्ती, सेवा अर्पण करता परंतु तीच संधी दररोज तुमच्या घरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. स्वामींचे स्तुतीस्तवन करणारी हजारो गीतं मी रचली आहेत त्यातील एक खाली देत आहे.
परमेश्वराचे साम्राज्य पाहते
मी सर्वत्र
कृपा तयांची पाहते मी कोसळणाऱ्या जलप्रपातात
केवळ त्यातच नव्हे तर पाहते
जलाच्या प्रत्येक थेंबात
या जलाविना जीवन आपले मृतवत
परमेश्वराची कृपा दर्शवतो उगवता सूर्य
कृपेविना तयाच्या नाही होत सूर्योदय
रात्र सरुनी होतो सूर्याचा उदय
सूर्याविना आपण सुस्त निष्क्रिय
कृतज्ञता करू अर्पित त्याप्रती सुप्रभातीसी अन ......
निरंतर समर्पित करू भक्ती त्या दिनकरासी
शीतल मंद झुळुकी स्मरण देती मज त्याच्या स्पर्शाचे
मधूचा स्वाद जणु माधुर्य परमेश्वराचे
अवखळ वासरू देई बाळकृष्णाचा आनंद मज
वायुही दर्शवी कृपा तयांची मज
वायुविना जगावे कसे जीवन
हंबरुनी धेनु साद घालिते वत्सास
साद ऐकुनी स्मरते मी परमेश्वराच्या मातृभावास
जे साद घालिती तिज व्याकुळ होऊनी
प्रभू परमेश
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा