ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
संध्याकाळच्या ध्याना अगोदर माझ्या अवस्थेमध्ये एक मोठा बदल घडल्याचे मला जाणवले. मी विलाफ करत होते," स्वामी, स्वामी.... माझे दुर्गे मध्ये रूपांतर करा. मला सर्वांचा उद्धार करायचा आहे मला अधिक शक्ती प्रदान करा!"
स्वामी- आता तू हे सर्व विसर. जग, जगातील लोकांच्या समस्या सारं काही विसर आणि माझ्याबरोबर गोकुळात चल.
वसंता- नाही स्वामी मला एकटीला कोणताही आनंद नको सर्वांना दिव्य आनंद मिळायला हवा.
स्वामी- थोड्या वेळासाठी हे सार तू विसर. रडू नकोस. दिव्य आनंदाची अनुभूती घे.
वसंता- नाही स्वामी जर मी एकटीच हा आनंद लुटत असेन तर मी एखाद्या चोरीच्या मालमत्तेचा आनंद लुटण्यासारखे आहे आणि मला तसे नको आहे. जगातील प्रत्येकाला तो आनंद मिळायला हवा. तोपर्यंत मलाही आनंद नको. जगातील सर्व समस्यांचा त्रासाचा अंत झाला पाहिजे जर तुमच्या या अत्यंत करुणाघन अवतार काळात लोकांना मुक्ती मिळाली नाही तर त्यांना कशी आणि कोण मुक्ती प्रदान करणार?
स्वामींनी माझा हात धरून ओढले आणि ते मला राधेच्या घरामध्ये घेऊन गेले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा