गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      "  भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे, याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मूलस्त्रोत्र शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
           युवावस्थेतच माझे वडील गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन स्वातंत्र्य सैनिक झाले होते. ते एक सच्चे गांधीवादी असून त्यांच्या अनुयायांपैकी एक होते. त्यामुळे अनेकदा त्यांना तुरुंगवाद घडला होता. तुरुंगात असतानाच त्यांनी अगदी मनापासून गीतेच्या अभ्यासास सुरुवात केली. तुरुंगात इतर कामे नसल्यामुळे मोकळा वेळ मिळत असे. म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगातील सर्वांसाठी भगवद्गीतेचे वर्ग घेण्यास ठरवले. इथेच त्यांना भग्वद्गीतेशी जन्मभराचा संबंध जडला. 

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. सुरवातीला जरी ते यांत्रिकपणे होत असेल तरी नाम घेत राहा. भाव आपोआप येतील."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
            स्वामींनी मला ' वसंतसाई सच्चरित' हे पुस्तक लिहिण्यास सांगितले. माझ्या जुन्या रोजनिशांमध्ये मध्ये स्वामींनी केलेल्या नोंदी व टिपणे यामधून ह्या पुस्तकाने रूप धारण केले. माझ्या इतर पुस्तकांच्या हस्तलिखितातही लिहून त्यातील अनेक गोष्टी दयाळूपणे निदर्शनास आणून दिल्या. माझे वडील अे.व्ही. व्ही. मधुरकवी सुद्धा रोजनिशी लिहीत असत. एकदा त्यांच्या जुन्या डायऱ्या चाळत असताना आमच्या लक्षात आली की स्वामींनी एक तारीख अधोरेखित केली आहे. त्यादिवशी माझ्या वडिलांनी भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायातील पुरुष प्रकृती तत्त्वाविषयी विवेचन करणाऱ्या २३ व्या श्लोकाच्या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उत्सुकतेने आम्ही ती वाचण्यास सुरुवात केली. माझ्या वडिलांच्या लिखाणातून झालेली हृदयस्पर्शी भाव-वर्षा वाचून आम्ही चकित झालो.
             अनेक ज्ञानी जनांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधाराने प्रत्येक श्लोकाचा अर्थ लावून विविध प्रकारे भगवद्गीतेचे समालोचन केले आहे. परंतु वाचकांना त्याचा कायमस्वरूपी असा काय लाभ झाला? ज्यांचे लिखाण स्वानुभवावर आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित असते ते आपल्या हृदयात भिडते. त्यांच्या अनुभवांची सत्यता आपल्याला त्यांचा मार्ग अनुसरण्यास प्रवृत्त करते. वाचत असताना आपण त्यांचा खडतर प्रवास व विजयाचे क्षण प्रत्यक्ष अनुभवतो. जेव्हा वाचक अनुभव आणि अनुभव घेणारा या दोहोंशी एकतान होतो तेव्हाच त्याच्यामध्ये परिवर्तनाची इच्छा जागृत होते. माझे वडील भगवद्गीतेशी तन्मय झाले होते व गीतेची शिकवण त्यांनी तंतोतंत आचरणात आणली होती. ते स्वतःच अर्जुन, दुर्योधन, भीष्म, कर्ण झाले. त्यांच्या अनुभवांशी एकतान  झाले. भगवद्गीतेची एक झाले होते. माझे वडील स्वतःच एक जिती जागती गीता होते.

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
           जरी गेली 63 वर्षे मी कुटुंबीयांबरोबर रहात होते तरी मनातून मी परमेश्वरासोबतच राहिले. ७ फेब्रुवारी २००१ रोजी ध्यान सभागृहाच्या उद्घाटनाच्या दिवशी मी संन्यास घेऊन केवळ परमेश्वरासोबत जीवन व्यतीत करावे, माझे सर्व सांसारिक बंध गळून पडतील असे स्वामींनी स्पष्ट सांगितले.
हा माझा जीवनातील सोन्याचा दिन होता.
           श्री रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा त्यांचा पवित्र धागा तोडून टाकला होता. त्याचप्रमाणे माझ्या भक्तीचे सामर्थ्य जगाला ज्ञात होण्यासाठी स्वामींनी, सर्वसंगपरित्यागाचे प्रतिक म्हणून मला मांगल्य काढण्यास सांगितले.  माझे नाते एकमात्र परमेश्वराशी आहे. मला अन्य कोणतेही बंधन नाहीत. जे बंध मी मानसिक दृष्ट्या अगोदरच तोडले होते ते भौतिक दृष्ट्या तोडण्यास स्वामींनी मला सांगितले. माझे कौटुंबिक बंध तोडल्यानंतर समस्त विश्वच माझे कुटुंब बनले. मी वैश्विक कुटुंबाशी एकरूप झाले  कदाचित म्हणूनच स्वामींनी मला 'त्रिलोक कुटुंबिनी.' ( तिन्ही जगत (त्रिलोक) जिचे कुटुंब आहे) असे म्हटले असावे.
            माझ्या सर्व नाड्यांमध्ये असे म्हटले आहे की मी गृहस्थाश्रमी संन्यासी असेन. त्यात असे म्हटले आहे की वयाच्या ६३ व्या वर्षी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यासी म्हणून आश्रमामध्ये निवास करीन. ही भाकिते खरी ठरली आहेत महर्षींची दिव्यदृष्टी स्तुत्य आहे.
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


भगवान बाबांचा जन्मदिन संदेश


 

स्वामींना काय प्रिय आहे?
तुम्ही गेल्या ३०-४० वर्षांपासून स्वामींकडे येत आहात. तुम्ही स्वामींची दिव्य प्रवचनेही ऐकता.  

न कर्मणा न प्रजया धनेन
त्यागेनैके अमृतत्वमानशुः।

भगवान पुन्हा पुन्हा सांगतात की केवळ त्यागानेच अमृतत्व प्राप्त होते.
तुमच्यापैकी किती जणं त्याग करतात ? कितीजणं स्वामींची शिकवण आचरणात आणतात. तुम्ही येथे येण्याचे प्रयोजन काय? ते सर्व व्यर्थ आहे. त्यापैकी किमान एक तरी आचरणात आणले पाहिजे. तुम्ही काय आचरणात आणले पाहिजे? स्वामींना काय प्रिय आहे? त्यांना काय आवडते?  त्यांना केवळ एकच गोष्ट  प्रिय आहे ती म्हणजे प्रेम प्रेम आणि प्रेम.  प्रेम हे स्वामींचे अत्यंत शक्तीशाली शस्त्र आहे. तुमच्यापैकी कोणाला येथे येण्यासाठी आमंत्रण दिले होते का वा एखादी घोषणा केली गेली होती का? प्रेमाच्या ओढीने तुम्हाला सर्वांना येथे आणले आहे. या जगामध्ये, अशी कोणतीही गोष्ट नाही जी प्रेमाने प्राप्त करता येत नाही.  प्रेमाने तुम्ही परमेश्वरालाही जिंकू शकता आणि त्याला आपल्या पराधीन बनवू शकता.


२३ नोव्हेंबर १९९४ रोजी 

स्वामींनी दिलेल्या दिव्य सत्संगातून


जय साईराम 

 


गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      "तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
            २२ एप्रिल २०१० रोजी  स्वामींनी साई कुलवंत हॉलमध्ये,
सायंकाळच्या दर्शनाचे वेळी ह्या पुस्तकाचा स्वीकार केला.

समर्पण 

प्रिय भगवान,
 
           माझ्या वडिलांच्या रोजनिशीतील हा खजाना तुम्ही उघड केलात. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तारसणाऱ्या आत्म्याच्या भावविश्वामध्ये सर्वांना सहभागी करण्यासाठी तुम्ही हे छोटे पुस्तक प्रकाशित करण्यास सांगितले. मी हे पुस्तक, मुक्ती निलयम, माझे वडील आणि मला स्वतःला तुमच्या दिव्य चरणी समर्पित करते. कृपया स्वीकार करून आशीर्वाद द्या.
तुमची
वसंतसाई

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

 

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

कर्मकायद्यावर उपाय 
 
            ह्या पुस्तकात विशद केलेल्या कर्मकायद्यावरील उपायांचा इथे सारांश देत आहोत. हे महत्वाचे मुद्दे वाचून तुम्ही तुमचे जीवन आध्यात्मिक मूल्यांवर केंद्रित करू शकाल. त्याचा तुम्हाला निश्चितच मोठा फायदा होईल आणि तुम्ही जन्ममृत्युच्या रोगातून मुक्त व्हाल.

* वसंताच्या तपश्चर्येची शक्ती म्हणजे सर्वांची कर्म आपोआपच कमी होणे.
* वातावरण वैश्विक दिव्य भावांनी व्याप्त झाल्याने कर्म कमी होतील.
* राधेचे १९ गुण अंगिकारण्याचा प्रयत्न करा. हे भाव माझ्यामधून जगात प्रवाहित होतात आणि सत्ययुग आणतात.
* कर्मयोगाचे अनुसरण करा.
* तुमची श्रद्धा अधिक दृढ करा. श्रद्धेमध्ये कर्मसंहार करण्याची ताकद आहे.
* प्रेमाच्या विस्तृतीने कर्म कमी होतात. सर्वांवर प्रेमवर्षाव करा.
* भूतकाळातील कर्मांची जबाबदारी स्वीकारा. त्याचे परिणाम भोगा आणि हे भोग पूर्वजन्मांच्या पापांमुळे आहेत याची जाणीव होऊ द्या. मनःपूर्वक पश्चात्ताप वाटून परमेश्वराजवळदयेची भीक मागा. वैश्विक कृतज्ञतेचे भाव तुम्हाला मदत करतील नक्कीच, खात्रीने!
* मधुरभाव ते मातृभाव - परमेश्वरावर एकचित्त झाल्यावर तुमच्यातील मातृभाव जागृत होईल. तो विस्तारित करून सर्वांना त्यात समाविष्ट करून घ्या.

*     *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम तुमच्याकडे येईल. "

राधेचे १९ गुण 
 
            स्वामी म्हणतात की राधेचे १९ गुण प्रेमाची व्याख्या सांगतात. तोच आहे कर्मकायद्यावर उपाय. 

१) अनिर्बंध प्रेम 
२) त्या प्रेमाशी स्पर्धा करणारा त्याग 
३) वैश्विक करुणा 
४) संवेदनशील स्वभाव 
५) स्वस्थितीची नेणीव 
६) वाणीचे माधुर्य 
७) व्यापक दानशीलता 
८) साधेपणा 
९) मदत करण्याचा स्वभाव 
१०) बुद्धीची शुद्धता 
११) ज्वालामुखीसम धगधगतं वैराग्य 
१२) चुंबकीय पावित्र्य 
१३) शिशुसम निरागस हृदय 
१४) मातृहृदय 
१५) चंद्राची शीतलता 
१६) फुलासम मृदुता 
१७) हिमालयसदृश इच्छाशक्ती 
१८) गंगेचा निर्मळ स्वभाव 
१९) आनंदमग्न. 

*     *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " सर्व गोष्टींची अनुभूती घेण्याची इच्छा ठेवू नका तर सर्वांतर्यामी परमेश्वराची भक्ती करा. "

१३ 
नभ गुरु 

महान तेलगू संत त्यागराजांचे बोल,

' शांती नाही तिथे स्वास्थही नाही '
 
           शांतिविना स्वास्थ्य असूच शकत नाही. शांती ही अंतिम अवस्था आहे. भीष्म हे शांतभक्तीचे एकमेव उदाहरण आहे. ते बाणशय्येवर, उत्तरायण येण्याची शांतपणे वाट पहात राहिले. यावेळी मी पुट्टपर्तीत, आकाशाकडून एक धडा शिकले. मीसुद्धा बाणशय्येवर पडून आहे. मला उत्तरायण येईपर्यंत शांत राहायला हवे, उत्तरायण म्हणजे स्वामींची बोलवणे. हाच आहे सत्ययुगाचा प्रारंभ.

*     *     *
 
समारोप
 
३ एप्रिल २००९ ध्यान
वसंता- स्वामी प्लीज 'कर्मकायद्यावर उपाय' पुस्तकासाठी काहीतरी सांगा.
स्वामी- सगळी न्यायासाठी वाद घालतात पण तू पापी जनांसाठी कर्मकायदाच बदलण्यासाठी वाद घालते आहेस. सर्वांची कर्म अंगावर घेऊन त्यांच्या कर्मांचा हिशोब समतोल करायची तुझी इच्छा आहे. एवढेच नव्हे तर तू कर्म कायद्यावर उपायही विचारते आहेस.....

कोणी न्यायासाठी वाद घालू शकतात
तू सर्वांची सुटका करण्यासाठी वाद घालतेस
पाप जनांसाठी आत्मीयतेने वाद घालताना
न पाहिले, न ऐकिले
तू वाद घालतेस कैकयी, कूनी,
कंस आणि शकुनींसाठी
मी म्हणे ते आहेत पापी,
तू बोलती ते तर बुद्धिबळाच्या सोंगट्या.

पहिल्यांदाच जग पाहत आहे इतकी निर्मळता
असे कारुण्य पापी जनांसाठी.
वाद घालसी तू परमेश्वराशी, पापी जनांसाठी
वाहसी त्यांच्या कर्मांचे ओझे
कर्मकायदा समतोल करण्यासाठी
कर्म म्हणजे कायद्याचा गोड सापळा
त्यासाठी देतसी उपाय, औषध
हे कर्म असे मर्म, एक गुढ 
 
स्वामी म्हणाले,
" परमेश्वराच्या विरुद्ध वागणाऱ्यांसाठी कोण बरे परमेश्वराची वाद घालेल? "
मी परमेश्वराशी वाद घालते आणि म्हणते की कंस, कूनी, कैकयी आणि शकुनी हे पापी नाहीत ते परमेश्वराविरोधी नाहीत. ते अवतारकार्यासाठी त्याचे फक्त एक साधन होते. म्हणूनच मी स्वामींना त्यांना माफ करण्यास सांगितले.
जय साईराम

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम