ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. सुरवातीला जरी ते यांत्रिकपणे होत असेल तरी नाम घेत राहा. भाव आपोआप येतील."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
स्वामींनी मला ' वसंतसाई सच्चरित' हे पुस्तक लिहिण्यास सांगितले. माझ्या
जुन्या रोजनिशांमध्ये मध्ये स्वामींनी केलेल्या नोंदी व टिपणे यामधून ह्या
पुस्तकाने रूप धारण केले. माझ्या इतर पुस्तकांच्या हस्तलिखितातही लिहून
त्यातील अनेक गोष्टी दयाळूपणे निदर्शनास आणून दिल्या. माझे वडील अे.व्ही.
व्ही. मधुरकवी सुद्धा रोजनिशी लिहीत असत. एकदा त्यांच्या जुन्या डायऱ्या
चाळत असताना आमच्या लक्षात आली की स्वामींनी एक तारीख अधोरेखित केली आहे.
त्यादिवशी माझ्या वडिलांनी भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायातील पुरुष
प्रकृती तत्त्वाविषयी विवेचन करणाऱ्या २३ व्या श्लोकाच्या संदर्भात आपल्या
भावना व्यक्त केल्या आहेत. उत्सुकतेने आम्ही ती वाचण्यास सुरुवात केली.
माझ्या वडिलांच्या लिखाणातून झालेली हृदयस्पर्शी भाव-वर्षा वाचून आम्ही
चकित झालो.
अनेक ज्ञानी जनांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधाराने प्रत्येक श्लोकाचा
अर्थ लावून विविध प्रकारे भगवद्गीतेचे समालोचन केले आहे. परंतु वाचकांना
त्याचा कायमस्वरूपी असा काय लाभ झाला? ज्यांचे लिखाण स्वानुभवावर आणि
त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित असते ते आपल्या हृदयात भिडते.
त्यांच्या अनुभवांची सत्यता आपल्याला त्यांचा मार्ग अनुसरण्यास प्रवृत्त
करते. वाचत असताना आपण त्यांचा खडतर प्रवास व विजयाचे क्षण प्रत्यक्ष
अनुभवतो. जेव्हा वाचक अनुभव आणि अनुभव घेणारा या दोहोंशी एकतान होतो
तेव्हाच त्याच्यामध्ये परिवर्तनाची इच्छा जागृत होते. माझे वडील
भगवद्गीतेशी तन्मय झाले होते व गीतेची शिकवण त्यांनी तंतोतंत आचरणात आणली
होती. ते स्वतःच अर्जुन, दुर्योधन, भीष्म, कर्ण झाले. त्यांच्या अनुभवांशी
एकतान झाले. भगवद्गीतेची एक झाले होते. माझे वडील स्वतःच एक जिती जागती
गीता होते.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा