ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
हा माझा जीवनातील सोन्याचा दिन होता.
श्री रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा त्यांचा पवित्र धागा तोडून टाकला होता. त्याचप्रमाणे माझ्या भक्तीचे सामर्थ्य जगाला ज्ञात होण्यासाठी स्वामींनी, सर्वसंगपरित्यागाचे प्रतिक म्हणून मला मांगल्य काढण्यास सांगितले. माझे नाते एकमात्र परमेश्वराशी आहे. मला अन्य कोणतेही बंधन नाहीत. जे बंध मी मानसिक दृष्ट्या अगोदरच तोडले होते ते भौतिक दृष्ट्या तोडण्यास स्वामींनी मला सांगितले. माझे कौटुंबिक बंध तोडल्यानंतर समस्त विश्वच माझे कुटुंब बनले. मी वैश्विक कुटुंबाशी एकरूप झाले कदाचित म्हणूनच स्वामींनी मला 'त्रिलोक कुटुंबिनी.' ( तिन्ही जगत (त्रिलोक) जिचे कुटुंब आहे) असे म्हटले असावे.
माझ्या सर्व नाड्यांमध्ये असे म्हटले आहे की मी गृहस्थाश्रमी संन्यासी असेन. त्यात असे म्हटले आहे की वयाच्या ६३ व्या वर्षी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यासी म्हणून आश्रमामध्ये निवास करीन. ही भाकिते खरी ठरली आहेत महर्षींची दिव्यदृष्टी स्तुत्य आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा