ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जसे लोखंड वितळवून साच्यात ओतले जाते तसेच आपण पुन्हा पुन्हा आपले जीवन भक्तीमध्ये वितळवून आध्यात्मिक शिस्त अंगी बनवली पाहिजे. "
१३
नभ गुरु
नभ गुरु
बोटीत होकायंत्र दिशा दाखवते. त्याच्या सुईचा काटा नेहमी उत्तरेला असतो. समुद्र कितीही खळवळला, वादळ झालं तरीही होकायंत्र उत्तर दिशाच दाखवते. कितीही अडथळे उभे ठाकले तरीही ते उत्तर दिशाच दाखवणार. चहु बाजूंनी बोट उभीआडवी हेलकावे खात राहिली, तरीसुद्धा होकायंत्राच्या सुईत काही फरक पडत नाही. कोणत्याही वेळी ती उत्तर दिशाच दाखवते. होकायंत्राच्या मार्गदर्शनाखाली तर कॅप्टन बोट चालवीत असतो.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा