गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत. हे सत्य आहे. "

१३ 
नभ गुरु 

           माझ्या आयुष्यातही मी खूप वादळे, झंजावती वारे, अडचणी सोसल्या. माझ्या जीवननौकेने समुद्राच्या प्रचंड लाटांवर वर खाली हेलकावे खाल्ले. ती अनेक निरनिराळ्या स्थित्यंतरांना सामोरी गेली. माझ्या मनाने होकायंत्राप्रमाणे फक्त परमेश्वराचे चरण घट्ट पकडून ठेवले. माझ्या डोळ्यांना नेहमी तीच दिशा स्पष्टपणे दिसते. जेव्हा खूप अडचणी समोर येतात तेव्हा कधी कधी मन हेलकावे खातं; परंतु ते परमेश्वराचे चरण सोडत नाही. ते कधीही परमेश्वरापासून दूर जात नाही. मी या सर्व अनुभवांच्या पलीकडे जाते. शाश्वत सत्याच्या मार्गावर मी दृढ उभी आहे. हीच आकाशासारखी सर्वव्यापक, निश्चल, शांत अवस्था आहे.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा