ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे, याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मूलस्त्रोत्र शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
युवावस्थेतच माझे वडील गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन स्वातंत्र्य सैनिक झाले होते. ते एक सच्चे गांधीवादी असून त्यांच्या अनुयायांपैकी एक होते. त्यामुळे अनेकदा त्यांना तुरुंगवाद घडला होता. तुरुंगात असतानाच त्यांनी अगदी मनापासून गीतेच्या अभ्यासास सुरुवात केली. तुरुंगात इतर कामे नसल्यामुळे मोकळा वेळ मिळत असे. म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगातील सर्वांसाठी भगवद्गीतेचे वर्ग घेण्यास ठरवले. इथेच त्यांना भग्वद्गीतेशी जन्मभराचा संबंध जडला.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा