गुरुवार, ३० जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

  " जसे भाव तसे जीवन. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - १४

 
           दुसऱ्या बाजूला, शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख फुंकले.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
            हे वैकुंठवासा, या पाप्याला तुझा सच्चा भक्त बनव. त्याला तुझे चरणकमल प्राप्त होऊ देत. राधाकृष्णा, रावणमर्दना, माझ्या क्रोधाचा नाश कर. हे प्रभू, मला शुद्ध आणि पवित्र बनव. शरणो शरणम्

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, २६ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " जो स्वार्थ आणि अपेक्षा यापासून मुक्त आहे, त्याला कर्माचे परिणाम बाधत नाहीत. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - १३

 
           त्यानंतर शंख, ढोल,भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाचू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
            हे कान्हा, गरुडवाहना, प्रभू माझा बेडा पार कर. सर्व ध्वनींमधील नादा! नादब्रह्म! मी तुला नादब्रह्मामध्ये पहायला हवे. नादा! नमो नारायणा ! तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
स्वामी - तू माझी शक्ती  असल्याचेही मांगल्य जगाला दर्शवले हे स्वाक्षरी होऊन अधिक मोठे प्रमाणपत्र नाही का?
वसंता - स्वामी माझ्या मनात शंका आहे. लोक म्हणतील, यात काय विशेष आहे ते अनेकांना मांगल्य देतात.
स्वामी - मी इतरांना मांगल्य देतो जेव्हा त्यांचा विवाह निश्चित होतो. ते त्यांच्यासाठी नवे नाते निर्माण करते. तुला मी जे मांगल्ये दिले ते तुला सर्व बंधातून मुक्त करण्यासाठी, तुझ्या आणि माझ्या मधील बंध दर्शवण्यासाठी आणि तुला अन्य कोणतेही बंध नाहीत हे दर्शवण्यासाठी.
          कोणाचाही जीवनात अशी घटना कधी घडली आहे का? स्वामींनी मला सर्वसंग परित्याग करून संन्यास घेण्यास सांगितला. पुस्तक प्रकाशित करण्यास व परमेश्वराचे मांगल्य घालण्यास सांगितले. माझे आश्रमातील जीवन सुरू  करण्याच्या दृष्टीने स्वामींनी सर्व व्यवस्था केली. सगळं कसं सुसंगत्व परिपूर्ण आहे! हे सगळं लिहून झाल्यानंतरच माझे अश्रू थांबले.
            त्यानंतर मी चार दिवस गुलाब करत होते व प्रार्थना करत होते," जगातील सर्व लोकांना जोपर्यंत दिव्य आनंदाचा लाभ होत नाही तोपर्यंत मलाही दिव्य आनंद नको आहे." पाचव्या दिवशी स्वामींनी मला ध्यानात सांगितले," ब्रम्हरंध्र अवस्थेच्या भगवद् भावातील तुझ्या दिव्य आनंदाची स्पंदने तयार होऊन जगामधील सर्व दुःखांचा नाश करतील. सर्वांना दिव्य आनंद मिळेपर्यंत तुला आनंद नको असे तू म्हणतेस जर तू या अवस्थेत स्थित राहिलीस तर प्रत्येकाला स्पंदनांचा लाभ होईल व त्यांच्या कर्मांचा नाश होईल. तुझी करुणा व त्याग जगामध्ये परिवर्तन घडवेल.
            स्वामींनी जे सांगितले ते मला थोडेफार समजले आणि त्याने माझ्या मनाला शांती लाभली.
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " मनुष्याच्या प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यामधून त्याच्यातील देवत्व प्रतिबिंबित झाले पाहिजे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १, श्लोक - १२
 
           नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी दुर्योधनास आनंदित करत सिंहाप्रमाणे गर्जना करून शंख फुंकला.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
            कान्हा! या क्षुद्र जिवामधील चांगले आणि वाईट गुण युद्धास सज्ज होऊन या गुणांच्या सेना कवायत करत शंख फुंकत आहेत. सर्वेशा! ये! येऊन माझ्या बाजूने तू तुझ्या दिव्य पांचजन्य शंखाचा नाद कर. तू दूत झालास, खांबातून प्रकट झालास! या क्षुल्लक काटकीला रक्षण देऊन उद्धार कर. कान्हा, कृष्णा  जलकिरिटी! मेघ:शामा! तूच माझा आसरा आहेस. शरणो शरणम्

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, १९ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १, श्लोक -११
 
           आता तुम्ही सर्वांनी व्ह्यूहरचनेतील नेमलेल्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांचे सर्व बाजूंनी रक्षण केले पाहिजे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           कान्हा, माधव, सप्तगिरीवासा, हे सोलाईमलाईच्या सुंदरराजा, तू तुझे सत्य स्वरूप मला दाखव. माझ्या स्वभावातील कावेबाजपणा, धुर्तपणा नष्ट होण्यासाठी योग्य ती स्थिती तू निर्माण कर. हे ज्योतिरमया, कोटीसूर्यसम तेजप्रकाशा, ईसा, हे परमधामा, या नीच पाप्याचे रक्षण कर. हे कान्हा! करुणासागरा येऊन माझ्या हृदयात निवास कर. गोविंदा, तूच माझा आश्रय! शरणो शरणम्

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " प्रथम भाव निर्माण होतात, त्यांनतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का ?"

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय -१, श्लोक - १०

           पितामह भीष्मद्वारा रक्षित आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे. परंतु भीमाने रक्षण केलेल्या पांडवसेनेची शक्ती मर्यादित आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----

कान्हा! या दासाचे नेत्र तुझा देह पाहणारे नेत्र कर. जे काही पाहीन त्या सर्वांमध्ये नयनरम्य अशा तुला पहायला शिकव. गरुड वाहना! कमलनयना! कान्हा! याला तुझ्या चरणी घे. तूच माझा आधार प्रभू! शरणो शरणम् ! का या गरीब जीवाची अजून परीक्षा घेत आहेस? रक्तवर्णकमलवासा! ईसा ! याला या क्षणी तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद दे वासुदेवा!

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १२ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " सौंदर्य भक्तिचे दुसरे नावं आहे."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय - १, श्लोक -९
             माझ्यासाठी जीवावर उदार झालेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्वजण विविध प्रकारच्या  शास्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्ध कलेत निपुण आहेत.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
            कान्हा ! तू या अगतिकाची गती आहेस. तू या बलाढ्य शत्रूंचा संहार कर. पाप्याला चांगला माणूस बनव. परमपुरुषा! पुरुषोत्तमा! चांगला स्वभाव व वाईट स्वभाव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करून तू या  पामराच्या बाजूला राहून त्याचं युद्ध चालव. नारायणा, मी काय करणार? सुख येतं आणि या गरिबाला आशा दाखवून दुःखात लोटतं. तू दूत झालास. खांबामधून प्रकट झालास. नृसिंहा ! दुःखीत अशा मला रक्षण करून आशीर्वाद दे. कान्हा! तुझ्या सुवर्णचरणी घेऊन उधार कर. तूच माझा आधार! शरणो  शरणम्. 

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
             मदुराई मधील एका भक्ताच्या घरामध्ये बराच वेळा मांगल्य आणि जोडवी साक्षात झाली आहेत. त्यांनी गरजू गरीब लोकांसाठी विनामूल्य सामुदायिक विवाह आयोजित केले आहेत. एकदा अशाच दोन जोडप्यांच्या विवाह समारंभास मी उपस्थित होते. त्यांना संसारासाठी लागणारी भांडीकुंडी भेट देण्यासाठी मला त्यांनी आमंत्रण दिले होते. ते मला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आमंत्रित करत असत परंतु माझ्या कामामुळे मला जाणे शक्य होत नसेल. योगायोगाने मी भगवानांकडे मांगल्य मागितल्यानंतर त्या भक्तांनी मला फोन केला. मला स्वप्नातही अशा महत्त्वाच्या घटनांची मालिका यातून सुरू होईल असे वाटले नव्हते. प्रत्येक गोष्ट त्यांच्या संकल्पानुसार घडते.
             एक महिना अगोदर दिनांक ७ फेब्रुवारी रोजी स्वामींनी मला 'इथेच, याक्षणी मुक्ती' भाग दोन हे पुस्तक प्रकाशित करण्यास सांगितले. पुस्तकाच्या छपाईचे काम चालू होते. मी स्वामींची शक्ती आहे यावर  शिक्कामोर्तब करणारे अनेक विलक्षण अनुभव आणि घटना या पुस्तकामध्ये नमूद केल्या आहेत. ध्यानामध्ये मी स्वामींना म्हणाले," स्वामी तुम्ही श्री चेट्टियाराच्या घरी पहिल्या पुस्तकावर (इथेच, या क्षणी, मुक्ती भाग -१) स्वाक्षरी केलीत. तुम्ही त्यांच्याशी पुस्तकाविषयी बोललात व फोटोसुद्धा घेण्यात आले. तरीसुद्धा काही जणांचा त्याच्या खरेपणावर विश्वास नाही. मग ते त्याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर कसा विश्वास ठेवतील. ह्याच्या सत्यतेविषयी अनेक पुरावे दर्शविल्यानंतर ही काही जण म्हणतात की हे सर्व म्हणजे माझ्या कल्पनेचा अविष्कार आहे. लोक या मांगल्याविषयी काय विचार करतील?
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय - १, श्लोक - ८
           येते स्वतः पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वथामा, विकर्ण आणि सोमदत्तपुत्र भूरिश्रवा यांच्यासारखे युद्धात सदा विजयी ठरणारी योद्धे आहेत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
           हे कान्हा, तू माझा आश्रयदाता आहेस. हे आदिपुरुषा, पुरुषोत्तमा, तू सुविचारांचे सारथ्य कर आणि कुविचारांविरुद्ध पुकारलेला युद्धात नेतृत्व कर. ये, माझ्या हृदयात वास कर. हे गोविंदा! वामना! वैकुंठवासा, वासुदेवा, वटवेंकटा ये. प्रभू, परब्रम्हा, परमधामा, बद्री नारायणा, तूच माझा आश्रय. शरणो शरणम्. मरते समयी तुझा विचार येण्यासाठी सदासर्वदा, क्षणभरही मोकळा वेळ न ठेवता तू मला तुझा विचार करायला लाव.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, ५ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय - १, श्लोक - ७.

हे ब्राम्हणश्रेष्ठ! तुमच्या माहितीकरता, माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्रता असणाऱ्या  सेवाधिकार्‍यांविषयी मी तुम्हाला सांगतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
कान्हा, तू माझ्या सर्व दुर्गुणांचा नाश कर. हे करुणाकारा, करुणासागरा, प्रभू, वासुदेवा, येऊन माझ्या हृदयात वास कर. नारायणा, माझ्यावर, या दासावर तुझे प्रभुत्व ठेवण्याचा आशीर्वाद दे.
 
*    *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय -१ श्लोक ४-६

           कान्हा या दुबळ्यांच्या मनातील सुविचार आणि कुविचार झगडा करण्यासाठी सज्ज होऊन कवायत करत आहेत. तू माझ्या मनरूपी रथावर आरुढ होऊन सारथ्य कर. तुझ्या कृपेचा वर्षाव कर. हे देवा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम् हे प्रभू, मृत्यू समय माझ्या मनात तुझाच विचार करण्याचा विचार येऊ दे. जेव्हा मी तुझा विचार करत असेल तेव्हाच मला मृत्यू  येवो. गोविंदा, नंदगोपाला, प्रभू, तू सदैव या दासा सोबत रहा. तूच माझे आश्रयस्थान आहेस शरणो शरणम्. तू लवकरात लवकर मला तुझ्या चरणांशी घेऊन दुवा दे.
           कान्हा, माझ्यातील प्रमुख योद्धांना युद्धासाठी सुसज्ज बनव. तू या युद्धाचे नेतृत्व करणारा सारथी आहेस. नारायणा, तू माझा आश्रयदाता आहेस. शरणो शरणम् प्रभु या क्षुद्र जीवाला सोडव. हे कमलनयना, कौस्तुभाभरणा तूच माझे आश्रयस्थान आहेस शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम