ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रथम भाव निर्माण होतात, त्यांनतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का ?"
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय -१, श्लोक - १०
पितामह भीष्मद्वारा रक्षित आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे. परंतु भीमाने रक्षण केलेल्या पांडवसेनेची शक्ती मर्यादित आहे.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
कान्हा! या दासाचे नेत्र तुझा देह पाहणारे नेत्र कर. जे काही पाहीन त्या सर्वांमध्ये नयनरम्य अशा तुला पहायला शिकव. गरुड वाहना! कमलनयना! कान्हा! याला तुझ्या चरणी घे. तूच माझा आधार प्रभू! शरणो शरणम् ! का या गरीब जीवाची अजून परीक्षा घेत आहेस? रक्तवर्णकमलवासा! ईसा ! याला या क्षणी तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद दे वासुदेवा!
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा