रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

                               पुष्प तिसरे पुढे सुरु

हे दाखवण्यासाठीच हा महाअवतार  येथे आला . वेदांनी दर्शवलेला अंतर्यामी म्हणजेच प्रत्येकाची इष्टदेवता होय . एका साई भजनात म्हटले आहे .
राम कहो , कृष्ण कहो , ईश्वर अल्ला साई कहो
बुद्ध कहो,  गुरुनानक कहो , 
झौराष्ट्र,  महावीर येशू कहो
युगावतार तुम हो विश्वशक्ती तुम हो
सर्वधर्म प्रिय साई महेशा
परब्रम्ह तुम हो
                  यामध्ये असे म्हटले आहे . स्वामी युगावतार आहेत . सर्व धर्माची प्रेम ही एकच शिकवण आहे . हेच स्वामी दर्शवतात . सर्वांनी स्वामींसमोर वेदपठणही केले तरीही लोक जात , धर्म , वंश असे भेद का मानतात ? नारायण सुक्तातही हेच सांगितले आहे . परमेश्वर सर्वांच्या हृदयात तांदुळाच्या अग्राएवढ्या नील वर्णी ज्योतीस्वरुपात वास करतो हे सर्वजण जाणतात . हे सर्वांसाठी सारखेच आहे. आपण म्हणतो," ते ब्रह्मा आहेत , विष्णू आहेत , शिव आहेत हिंदू धर्मांमध्ये विविध रूपांची भक्ती केली जाते . कोणी शिवाची भक्ती करते , कोणी विष्णूची तर कोणी ब्रम्हा आणि इंद्राची . वरील श्लोकामध्ये म्हटले आहे . भक्त परमेश्वराच्या विविध नाम आणि रुपाची भक्ती करू शकतो हृदयातील निळे तेज म्हणजेच ब्रम्हा , विष्णू,  महेश होय . हिंदू धर्मानुसार त्या निळ्या तेजात सर्वांच्या शेकडो इष्टदेवदेवतांचा  अंतर्भाव आहे. 
                    ख्रिश्चन लोकही तीच निळी ज्योत पाहतात काहींसाठी ती ज्योत म्हणजे जिझस आहे तर काहींसाठी व्हर्जिन मेरी . प्रत्येक धर्मातील लोक त्यांच्या  इष्टदेवतेला त्या निळ्या ज्योतीरुपात पाहतात हिंदू धर्म हा सनातन धर्माचे अनुसरण करणारा पहिला धर्म आहे . त्या वेळी वेदांमध्ये असे घोषित केले गेले की परमेश्वर नील ज्योती स्वरूपाने सर्वांच्या हृदयात वास करतो . हे वैश्विक सत्य आहे . स्वामींनी हे वैदिक ज्ञान यथार्थपणे स्पष्ट करून सांगितले . येथे फक्त एकच परमेश्वर आहे. स्वामींनी सर्वधर्मातील लोकांना हे दर्शवले आहे जेव्हा मनुष्य व्यक्तिगत मी चा त्याग करतो तेव्हाच सगळे एकच आहेत  याचे त्याला ज्ञान होते . व तो सर्वांवर प्रेम करू शकतो आणि नंतर मुक्ती प्राप्त करतो . ' सत्य साई स्पीक्स '   भाग ९ पान नं . ११६ वर लिहिले आहे . 
                     आज अस्तित्वात असलेल्या वेदांचे नक्की केव्हा संकलन केले गेले हे कोणालाही माहित नाही . 
                       बाळ गंगाधर टिळकांच्या तर्कानुसार हे साधारणपणे १३,००० वर्षांपूर्वी केले गेले असावे व इतरांच्या अनुमानानुसार हे ६००० वर्षांपूर्वी केले गेले असावे परंतु सर्वानुमते किमान ४००० वर्षांपूर्वी  हे केले गेले असावे . गौतम बुद्धांचा  काळ २५०० वर्षांपूर्वी होता . ख्रिस्त १९६९ वर्षांपुर्वी जन्मले तर इस्लामची स्थापना त्यानंतर ६०० वर्षांनी झाली . कालक्रमानुसार तसेच तर्कदृष्ट्या पाहिले तर वरील अनुमान बरोबर आहे की वेदिक धर्म पितामह ( आजोबा ) आहे . बौद्ध धर्म - मुलगा,  ख्रिश्चन धर्म - नातू तर इस्लाम पणतू आहे . 
                      अशा प्रकारे सर्व धर्मांचे कुळ  एकच आहे . ख्रिश्चन , हिंदू , मुस्लीम यामध्ये काहीही फरक नाही . सर्वांमध्ये तो नील ज्योती स्वरूपातील तो एकच अंतर्यामी आहे . म्हणूनच आपणां सर्वांमध्ये काहीही भेद नाही . आपण सर्व त्या एका परमेश्वराची लेकरे आहोत . 
                  उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा