सोमवार, ३० जून, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

       " तुमच्या कर्णेनद्रियानी केवळ परमेश्वराविषयी श्रवण केले पाहिजे , अन्य काही नाही ". 


वसंतामृतमाला
पुष्प २२ 
बदमाश ' मी

                 ' पराभक्ती ' या पुस्तकातील ४१ क्रमांकाच्या पानावरील एका उताऱ्याला स्वामींनी कंस केला . परमेश्वराच्या सर्व व्यापकत्वावर गोपगोपिकांची अशी श्रद्धा होती की ते कोठेही गेले तरी ' ते ' एकमेव द्वितीय सत्य वेगवेगळी रूपे धारण करत असे . प्रभू परमेश्वर सर्वत्र , सर्व ठिकाणी विद्यमान आहे . यावर त्यांचा विश्वास होता . जेव्हा ते पाणी पिण्यासाठी तळ्यावर जात तेव्हा कृष्णास पाहात . मत्सरी लोकांनी त्यांना दुधामध्ये विष घालून दिले , त्यातही त्यांना कृष्णच दिसला . ते कृष्णाच्याच विचारात होते . जर आपल्या हृदयात कृष्ण नसेल तर आपण त्याला पाहू शकणार नाही जरी तो प्रत्यक्षात समोर आला तरीही नाही . परंतु जर तो आपल्या हृदयात प्रस्थापित असेल तर आपण त्याला सर्वत्र पाहू शकतो . 
           अशिक्षित गोपगोपीना परमेश्वराचे सर्व व्यापकत्व ज्ञात होते . ते कृष्णास सर्वत्र पाहात . जलाशयातील पाण्यामध्ये त्यांना कृष्ण दिसे . मत्सरग्रस्त लोकांनी दिलेल्या विषमय दुधाच्या प्यालातही त्यांनी कृष्ण पाहिला . अगदी असेच प्रल्हादही परमेश्वराला सर्वत्र पाहात असे . प्रभू सदैव त्यांच्या हृदयात वसण्याचे काय कारण असेल ? जो परमेश्वराला आपल्या हृदयात प्रस्थापित करतो तो सर्वत्र परमेश्वर पाहतो . ही मनोवस्था सर्व संत महात्म्यांची आहे . साधनेद्वारे त्यांनी अंतरंगातील परमेश्वर पाहिला व नंतर सर्व व्याप्त प्रभू बाहेर पाहिला . परमेश्वर नाही असे कोणतेही स्थान नाही . सर्वांना व्यापून उरलेले  केवळ एक व एकच सत्य आहे . हे आहे , ' एकोहम् बहुस्यामी ' . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात

जय साई राम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा