ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" पंचतत्वांचा पंचेंद्रीयांवर थेट प्रभाव पडतो. जर आपण शुद्ध नसलो तर पंचतत्वही त्यांची शुद्धता गमावतात म्हणून पंचतत्वांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत."
पुष्प ४० पुढे सुरु
बनियनच्या ५ कापडी तुकड्यांवर स्वामींनी काही अक्षरे व आकडे लिहिले होते. आता आपण याविषयी पाहू.
पहिल्या तुकड्यावर लिहिले होते - 18
PT 27
26 GG 18
Junior 26 GG SOS ( on it's side )
***
आता याचा अर्थ …..
* 18 ही संख्या स्तूपात समाविष्ट असणारे १८ योग आणि मोज्याचे आचरण केले ते भगवत् गीतेचे १८ अध्याय सुचित करते. स्तूप माझी कुंडलिनी संपूर्ण जगात १८ योग प्रसारित करते.
* PT - याचा सर्वसामान्य अर्थ आहे. प्लीज टर्न, म्हणजे पान उलटा. पण इथे PT म्हणजे प्रेमाने परिवर्तन.
* 27 - २७ हा आमचा विवाह दिन आहे .
* 26 GG - याचा अर्थ परमेश्वराची २६ तत्वे. मानवी देहात २४ तत्वे असतात. अंतरात्मा त्याच्याशी संलग्न झाल्यावर २५ तत्वे होतात. मानवाने मुक्ती प्राप्त केल्यानंतर त्याचा परमेश्वराशी योग होतो. मानवी शरीरातील २४ तत्वे + अंतरात्मा = २५; २५ + परमात्मा = २६ तत्वे.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा