ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" परमेश्वर आपले अधिकाधिक प्रेम भक्षण करून हृद्य गुंफेमध्ये तेजाने तळपतो."
पुष्प ४० पुढे सुरु
* Junior GG SOS 18 - १८ योगांद्वारे पूर्ण परिवर्तन होईल. या योगांचे अनुसरण करणारा परमात्म स्वरूपास प्राप्त होईल. सर्वजण परमेश्वराची लेकरे आहेत. 26 GG म्हणजे परमेश्वर + त्याची देवी, शक्ती. परमेश्वर व त्याची शक्ती २६ तत्वांसहित मानवी देहात इथे विद्यमान आहेत. नवनिर्मितीमध्ये सर्व त्याच्या भावविश्वांमधून जन्म घेतील. म्हणून स्वामी म्हणाले, " Junior 26 GG - सर्वजण धाकटे देवदेवता म्हणून जन्म घेतील. ते त्यांच्या जीवनात गीतेच्या १८ अध्यायांचे अनुसरण करतील. आमच्या भावविश्वांमधून जन्मल्यामुळे ते धाकले देवदेवता आहेत. स्वामींनी Junior का लिहिले ? कारण मी या अगोदर प्रल्हादावर एक अध्याय लिहिला आहे. प्रल्हाद सदैव ' ॐ नमो नारायणाय ' हा मंत्र जपत असे हे मी त्यात लिहिले आहे. त्याची ईश्वरावर पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळे या मंत्रजपाने त्याला सर्व संकटांपासून तारले. जर त्याच्या मनात श्रद्धा नसती तर तो छोटा हिरण्यकश्यपू झाला असता. जसे हिरण्यकश्यपूचा पुत्र म्हणजे छोटा हिरण्यकश्यपू तसे परमेश्वराचा पुत्र म्हणजे छोटा परमेश्वर. म्हणूनच स्वामींनी धाकला परमेश्वर असे लिहिले. नवनिर्मितीत सर्वांचा जन्म आमच्यापासून होईल, सर्व आमची संतती असेल. सर्वजण जीवनमुक्त असतील. सर्व पुरुष सत्य साई तर सर्व स्त्रिया वसंता म्हणून जन्मतील. याचा अर्थ असा की, त्यांच्या मनात केवळ सत्य आणि प्रेम हे भाव असतील. त्यांचे विचार, उच्चार अन् आचार यांमधून सत्य आणि प्रेम अभिव्यक्त होईल. सर्वजण साईपुत्र असतील.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात.....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा