रविवार, ५ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

            " शुद्ध भाव मानवाला माधव बनवतात. अशुद्ध भाव मानवाला पशु बनवतात ".


 पुष्प ३९ पुढे सुरु




                 या जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून अर्जुन ओळखला जातो. एकलव्याला धनुर्विद्या शिकायची होती. द्रोणांना गुरुस्थानी ठेऊन तो स्वतःच धनुर्विद्या शिकला व अर्जुनापेक्षा अधिक निष्णातही झाला. हे कसे शक्य झाले ? त्याच्या इष्ट देवतेने द्रोणांचे रूप धारण करून त्याला शिकवले. आपणही अशाच पद्धतीने शिकले पाहिजे. सध्याच्या काळात धनुर्विद्या कालबाह्य झाली आहे. आपण आत्मविद्या शिकायला हवी. हीच खरी विद्या आहे. ही विद्या आत्मसात केली तर आपण सहजी भवसागर पार करू शकू. आत्मविद्येसाठी कोणी गुरु नाही. ती गुरुकडून शिकता येत नाही. प्रत्येकाने अथक प्रयत्न करून ती प्राप्त करावी. यासाठी एक गोष्ट अत्यावश्यक आहे. ती म्हणजे नित्य अनित्य विवेक. 
                शाश्वत काय, अशाश्वत, क्षणभंगुर काय याचा आपण अभ्यास केला पाहिजे. केवळ परमेश्वर सत्य आहे आणि आपण त्याला प्राप्त केलेच पाहिजे. यासाठीच केवळ आपल्याला हा मानव जन्म दिला गेला आहे. परमेश्वराव्यतिरिक्त सर्व नातीगोती अशाश्वत आहेत. हे शिकविण्यासाठी तो महान अवतार इथे अवतरला. त्यांची शिकवण अनुसरून आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होऊ शकतो. तुमचा बहुमुल्य वेळ तुम्ही कथाकादंबऱ्या वाचण्यात वाया  घालवू नका. रामायण, महाभारत वाचणे अवघड वाटत असेल तर, स्वामींची पुस्तके वाचा. त्यांची शिकवण तुमच्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करा. तुमचे मन न् इंद्रियांना बाह्य गोष्टींच्या मागे भटकू देऊ नका. सर्व ईश्वराभिमुख करा. अशा पद्धतीने आचरण केलेत तर तुमची इष्टदेवता तुम्हाला मार्गदर्शन करेल.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात  ….. 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा