ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" प्रेमाला लज्जा माहित नाही. कोणतीही गोष्ट प्रेमाला नियंत्रित करू शकत नाही. ते कोणावरही अवलंबून नाही. ते सदा मुक्त असते."
पुष्प ३९ पुढे सुरु
कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन शक्य आहे. सर्वकाही शक्य आहे. सर्व देवदेवतास्वरूप स्वामींच्या चरणी हे सामर्थ्य आहे. कोणत्याही नामरूपाची भक्ती केल्याने तुम्हाला स्वामींची कृपा प्राप्त होईल. कलियुगाला वाचविण्यासाठी हा परमेश्वर इथे अवतरला. अशी संधी पुन्हा कधीही येणार नाही, म्हणून म्हणते आता प्रयत्न करा ! स्वामींनी कार्डावर सूर्यफुले चितारली. एक पूर्ण विकसित फुल तर दोन कळ्या. सुर्यफुल केवळ सूर्यप्रकाशातच उमलते. त्याचप्रमाणे ही वसंताही केवळ साई सूर्यप्रकाशातच उमलली पाहिजे. प्रयत करा. हा ज्ञानसूर्य तुमचे ज्ञानचक्षू उघडेल. अज्ञानाचा अंधार दूर करा. ज्ञानसूर्या समोर मायेचा अंधार दूर होतो. जागे व्हा ! मायेत गुरफटणे पुरे झाले !
सर्व साधकांसाठी एकलव्य एक उत्तम आदर्श आहे. त्याला त्याच्या साधनेची फलाशा नव्हती. त्याने अर्जित केलेले सर्व ज्ञान गुरुचरणी अर्पित केले. एवढेच नव्हे तर गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा कापून देऊन त्याने सर्व कौशल्य ही गमावले. जगासाठी त्यागाचे हे श्रेष्ठ उदाहरण आहे. परमेश्वरासाठी सर्वसंगपरित्याग कसा करावा हे यावरून आपल्याला शिकता येते. द्रोणाचार्यांच्या सगुण नामरूपाने अर्जुनाला धनुर्विद्येचे कौशल्य शिकविले परंतु ' इष्टदेवता ' द्रोणांनी एकलव्याला शिकविलेले कौशल्य हे त्यापलीकडचे होते. ' इष्टदेवता ' सर्वश्रेष्ठ आहे. तिला नामरूपाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत.
जय साईराम
व्ही. एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा