गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" आपण इथेच, याक्षणी मुक्ती प्राप्त करू शकतो."

पुष्प ४२ पुढे सुरु

४ जून २०१३ दुपारचे ध्यान 
वसंता - स्वामी ज्ञानाविषयी तुम्ही हे काय दिले आहे ? 
स्वामी - तू संयमपूर्वक ज्ञानाविषयी लिहतेस. प्रथमतः तू सरस्वती आहेस; त्यानंतर तू राजाची लक्ष्मी आहेस. 
वसंता - स्वामी, अजून किती काळ हा संयम ? 
स्वामी - सरस्वतीसारखे संयमपूर्वक ज्ञानलेखन कर. मी आलो की तू राजाची लक्ष्मी होशील.  
ध्यान समाप्ती 
                  आता आपण याविषयी पाहू. मी जे काही लिहिते ते सर्व उच्च ज्ञान आहे. स्तूपाचा पाया म्हणजे लक्ष्मीचे पीठ असलेले लाल कमळ होय. स्तूपाची उभारणी या पायावर झाली आहे. स्तूपाच्या शिरोभागी सहस्त्र दलांचे कमळ आहे; ह्यापासून ज्ञानोद् भव होत जगात परिवर्तन घडते. हे ज्ञानसरस्वतीचे पीठ, तिचे आसन आहे. जेव्हा स्वामी येतील आणि मला बोलावतील तेव्हा मी राजाची लक्ष्मी होईन. स्वामी महाराजा आहेत, १४ भुवनांचे अधिपती. बालपणी त्यांना सर्वजण ' राजू, राजू !' म्हणून हाका  मारायचे. वडक्कमपट्टीत असताना मी त्यांना ' माझा राजा ' म्हणून संबोधित असे. या कारणासाठी प्रेम साई अवतारात ते ' रंगराजा ' म्हणून येतील. मला आंडाळ सारख विवाह करून रंगनाथामध्ये विलीन व्हायचे आहे. आता ते रंगराजा असतील. 

जय साईराम 
व्ही. एस.

               

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

          " जीव परमेश्वराचा शोध घेत, त्याचा पुकारा करत त्याच्याकडे धाव घेतो. परमेश्वर त्याच्याप्रयत्नांची प्रशंसा करतो व त्याच्याकडे धावत जाऊन त्याला आपल्या कृपाछत्राखाली घेतो."

पुष्प ४२ पुढे सुरु 

                   ज्ञानाचा अलंकार संयम आहे. जीवनांत सर्व बाबींत संयम असावा. माझे जीवन हा संयमाचा आविष्कार आहे. जन्मापासूनच मी संयमी आहे. एक कन्या या जगात जन्म घेते, जिने यापूर्वी कधीही येथे जन्म घेतला नाही. असे कसे ? या मलीन धरतीवर जन्म घेण्यापूर्वी मी विशुद्ध परमेश्वरासोबत राहत होते. आता मी आले आणि पुन्हा या मलीन भूतलावर जन्म घेतला. इथे बिलकुल शूचिता नाही, मांगल्य नाही. अशा या विश्वामध्ये मी राहतेय. ही सुद्धा एक महान साधना आहे.
                     परमेश्वरास ज्ञान व्यक्त करावयास लावून ते जगासाठी उघड करण्यास संयम हे एक साधन आहे. संयम जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. संयमाद्वारे आपण ज्ञानाचे भांडार प्राप्त करून घेऊ शकतो. यासाठी मी पूर्वी ' Wisdom Mine ' ( ज्ञानाचे भांडार ) नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मी लिहिते ते सर्व अस्सल ज्ञान आहे. माझ्याकडे ज्ञानाव्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. ५ जून २०१३ रोजी स्वामींनी त्यांच्या फोटोवर एक छोटेसे गुलांबी उमललेले फूल ठेवले. त्याविषयी मी स्वामींना विचारले असता ते म्हणाले," हे स्वर्गीय फूल आहे, हे फूल म्हणजे तूच आहेस कारण माझ्या शेजारी बसण्याचा अधिकार केवळ तुझाच आहे." 
                      पूर्वी मी म्हटले आहे की मी शुद्ध पवित्र पुष्पासमान स्वतःला समर्पित केले आहे. म्हणून स्वामींनी या फोटोद्वारे दर्शवले. या फोटोवर स्वामींनी ' Wisdom Nugget ' (ज्ञानाचा गोळा ) असे लिहिले आहे. फोटोच्या मागच्या बाजूला सरस्वती तिच्या वीणेसह श्वेतपद्मासनात बसलेली आहे. तिच्या बाजूला हंस आहे. सरस्वतीच्या भोवती विलयनाचा जांभळा रंग आहे व त्यावर 'ज्ञान सशक्त होत आहे. ' असे लिहिले असून त्याच्याखाली मोठ्या अक्षरात राजलक्ष्मी लिहिले आहे. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम 
            

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 



परमपुज्य श्री वसंतसाई अम्मा यांच्या ७७ व्या वाढदिवसा निमित्त





' वैश्विक स्फोट '

२३ ऑक्टोबर १९३८

अमावस्येची काळोखी रात 
अहो आश्चर्यम् 
अवसेच्या अंधाऱ्या रात्री 
जाहला पुनवेचा जन्म ! 

पिता मधुरकवी आळवार 
माता वेदवल्ली 
दक्षिणेकडील मदुरैसमीप 
वडक्कम् पट्टी ग्राम तयांचे 
कन्येच्या आगमने आनंद त्यांसी शब्दातीत 
सानुल्या ह्या देवदूताचे 
नामाभिधान केले ' वसंता '
केवढे समर्पक नामकरण 
केले तयांनी अजाणता !
वसंता अर्थात वसंतऋतु 
अखेरीस त्या शुष्क मानवी जीवांना 
गवसले प्रयोजन 
आनंदाचा उत्सव करण्या 
प्रभुवराचे गुणगान गाण्या !

स्वागत तुझे माता मेरी 
साक्षात् प्रभूशी विवाह करी ! 
या ! सकल जन या … 
तिची कथा पुढे ऐकण्या !

कट्टर गांधीवादी पिता 
आचरे जीवनी भगवत् गीता !
असे अत्यंत दानशूर 
स्वातंत्र्य सैनिक शूरवीर 
तळपला शुक्र ताऱ्यासम 
सच्चा पुत्र भारतमातेचा 

वेदवल्ली , वैष्णव भक्तपरायण 
रात्रंदिन प्रार्थनेत रममाण  
पतीस घडता तुरुंगवास 
त्या दुर्बल स्त्रीस 
आसरा ना कोणी दूजा 
केवळ एक प्रभू परमेश, प्रभू परमेश ! 

हे प्रभू आहेस कोठे तू ?
अंतरलास का मजसी तू ?
हे माझ्या कृष्णा !
मज उध्दरणार नाहीस का ?
तिच्या करूण रुदनाचे पडसाद उमटती स्वर्गलोकी 
भार असह्य वसुंधरेसी
प्रभू म्हणे," परतुनी ये स्वगृहासी 
प्रतिक्षेत मी तव नेत्रातील अश्रू पुसण्यासी !"

भगवंतासाठी अपयश येते क्वचित 
कसे ? ते पाहू आपण 
बालवसंतेने नेली पुढे 
मातेची प्रज्वलीत ज्योत 
त्या प्रखर ज्योतीने 
जर दाहिले प्रभूवरां
तर दोष कोणा द्यावा बरे ?

धगधगता अग्नि भक्तिचा 
उद्रेक ज्वालामुखीचा 
अर्थात् स्फोट विश्वाचा 
'ब्रम्हांड स्फोट ' सिद्धांत नव्हे हा 
आहे साक्षात् स्फोट ब्रम्हांडाचा !

भगवंतासी संकल्पबदल अनिवार्य आता 
२७ मे २००१ या शुभदिनी 
मांगल्य दिले ब्रम्हचारी बाबांनी 
देऊनी मांगल्य केली घोषणा मूक 
" आम्ही दोघं आहोत एक "

नायक नायिकेचा विवाह होऊनी 
सदा जीवन सुखी होता 
कथेची होते सुफळ सांगता !

परि अम्मा याहुनी न्यारी 
वसंता न केवळ , ही आहे विश्वमाता 
तिचे विश्व , तिची लेकुरे दुःखात चूर असता 
असेल का संतोष तिच्या चित्ता ?

जोवरी ना देसी वैश्विक मुक्ती 
नसे मज शांती विश्रांती 
अग्निप्रवेश , नरकयातना 
सिद्ध मी याहुनी घोर सत्वपरीक्षा देण्या 
पाऊले ना ढळतील माझी मार्गावरूनी 
हा मार्ग वैश्विक मुक्तीचा,
मानवा, दानवा 
कीटक, पशू, जलचरा 
मुक्त करील चराचरा






जय साईराम 

    


गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" आपले भाव रूप धारण करून आपले जीवन बनवतात."

पुष्प ४२ पुढे सुरु 

                   माझ्या स्वामींवरील अतीव प्रेमामुळे हे सर्व घडते. स्वामींचा आणि माझा सर्वसामन्यांसारखा विवाह झाला, मुले बाळे झाली आम्ही कौटुंबिक जीवन जगलो. त्यानंतर आमची ताटातूट झाली. आमच्या विरह वेदनांमुळेच वैश्विक कर्मसंहार होत आहे. माझी अखंड ७२ वर्ष स्वामींप्रती एकाग्र भक्ती, अश्रू आणि व्याकुळता पृथ्वीच्या भ्रमण कक्षेमध्ये बदल घडवते. मानवजातीला भवसागरातून उद्धरून नेण्यासाठी स्वामींनी आणि मी वैश्विक पापकर्मे आमच्या अंगावर घेतली. स्वामी आल्यानंतर सर्वकाही बदलेल. स्वामी मला बोलावतील, आम्ही एकमेकांना पाहू, एकमेकांशी बोलू व एकमेकांना स्पर्श करू तेव्हा विश्व ब्रम्ह गर्भ कोटम आणि मुक्ती स्तूप कार्यरत होईल. त्यानंतर आम्ही हे जग सोडू व प्रेम साई अवतारात पुन्हा येऊ. त्यावेळी जगाचे सत्य युगात पूर्ण परिवर्तन होईल. आम्ही तेव्हा सुखी, आनंदी जीवन जगू. 
                  स्वामींनी ४ जून २०१३ ला दिलेला संदेश या विषयाशी संबंधित आहे. त्यामध्ये पिवळ्या रंगाचा, मनुष्याचा आकार आहे. आणि  'Wise Nuggets ' असे शब्द लिहिले आहेत. त्यानंतर संस्कृत व इंग्रजीमध्ये खालील वचन लिहिले आहे. 
                ' रुप हा मानवाचा अलंकार आहे. मुल्ये हा रुपाचा अलंकार आहे. ज्ञान हा मुल्यांचा अलंकार आहे. संयम हा ज्ञानाचा अलंकार आहे. 
                रूप हा मनुष्याचा अलंकार आहे. ८४ लक्ष योनींपैकी रूप हा केवळ मानवाचा अलंकार आहे. नरजन्म दुर्लभ आहे. केवळ मनुष्य देहाद्वारे परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. देवांनाही परमेश्वरप्राप्ती साध्य नाही. म्हणून आपण ह्या रूपाचा परमेश्वरप्राप्तीसाठी वापर केला पाहिजे. रूपाचे अलंकार सद्गुण आहेत. दुर्गुणी माणूस पशुवत् आहे. तो केवळ मूल्याधिष्ठीत शिक्षणांतर्गत स्वामींनी मुलांना हीच शिकवण दिली. एज्युकेअर हे एज्युकेशनहून अधिक महत्वाचे आहे हे स्वामींनी सर्वांना शिकवले. सद्गुणांचा अलंकार ज्ञान आहे. मनुष्याला ज्ञान प्राप्त झाल्यावरच सद्गुणांच्या आवश्यकतेविषयी समज येते. ज्ञान प्राप्तीनंतरच त्याला ८४ लक्ष योनींमधील नरजन्माचे महत्व समजते. पुन्हा जन्म न घेण्याची अवस्था प्राप्त होण्यासाठीच हा जन्म दिला आहे, हे त्याला ज्ञात होते. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम   

रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " जेव्हा भक्त केवळ परमेश्वरासाठी जीवन व्यतीत करतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्या भक्ताचा शोध घेत येतो." 

पुष्प ४२ पुढे सुरु 

६ जून २०१३ प्रातःध्यान 
वसंता - ' तुम्ही सुद्धा या सागरात उडी घेता '. स्वामी कृपया मला हे अधिक स्पष्ट करून सांगा. मला लिहायचे आहे. 
स्वामी - तू असे लिहिले की समुद्रामध्ये बुडणा-यांना, जो त्या समुद्रात उडी घेतो तोच वाचवू शकतो. आपणही भवसागरात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तसेच केले. आपण विवाह केला. मुलांचा जन्म झाल्यावर मी तुझ्यापासून विभक्त झालो. तू करूण विलाप करू लागलीस. त्यानंतर मी तुझ्याशी ध्यानात बोलू लागलो व तुला सर्व सांगितले. तथापि यातील कोणतीही गोष्ट मी बाहेर उघड केली नाही. मला प्राप्त न करू शकल्याने तू सर्वांना सत्यसाई आणि वसंता बनविण्याची प्रतिज्ञा केलीस. हे घडत आहे आणि घडेल. भविष्यात आपला विवाह होईल व आपण सुखी जीवन जगू. 
वसंता - मला समजले स्वामी, मी लिहीन. 
ध्यान समाप्ती 
    स्वामींनी दुसऱ्या रुपात माझ्याशी विवाह केला. मुलांच्या जन्मानंतर ते माझ्यापासून विभक्त झाले. त्यानंतर मी चाळीस वर्षे अश्रू ढाळले, आक्रोश केला. त्यानंतर स्वामींनीच माझ्याशी विवाह केला होता हे त्यांनी मला दाखवून दिले. त्यांनी मला मंगळसूत्र देऊन ते घालण्यास सांगितले. मी स्वामींची शक्ती असल्याचे सर्व नाडीग्रंथ घोषित करतात. तथापि स्वामींचे व्यवस्थापन पाहणाऱ्या लोकांनी मला स्वामींचे दर्शन घेण्यास मनाई केली. १९९६ पासून स्वामी माझ्याशी ध्यानात बोलतात. तथापि त्यांनी मी कोण आहे हे बाहेर सांगितले नाही. म्हणून मी प्रतिज्ञा केली की जर मला सत्यसाईंचे हे एक रूप अप्राप्य असेल तर मी जगातील सर्व पुरुषांना सत्यसाई बनवेन आणि जगातील सर्व स्त्रियांना वसंता नंतरच मी आनंद लुटेन. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

            " आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराला अर्पण करून सर्व इच्छावासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि नंतर स्वतःला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे ."

पुष्प ४२ पुढे सुरु

                  आज स्वामींनी स्वतःचा झुल्यावर बसलेला फोटो दिला. त्या फोटोत त्यांच्या बाजूला एक फुल होते. हे एक स्वर्गीय फुल आहे असे स्वामींनी सांगितल्याचे मागील अध्यायात मी लिहिले आहे. आता स्वामींनी जे सांगितले ते यापूर्वी कधीही उघड केलेले नाही. ही एक नवीन संकल्पना आहे. सागरामध्ये बुडणाऱ्याला किनाऱ्यावर नुसती उभी असणारी व्यक्ती वाचवू शकत नाही तर त्या व्यक्तीला पोहता येणे आवश्यक आहे तसेच त्या व्यक्तीने सागरामध्ये उडी घेणेही आवश्यक आहे. तरच ती व्यक्ती बुडणाऱ्या मनुष्याला वाचवू शकते. त्याचप्रमाणे भवसागरामध्ये बुडणाऱ्या मनुष्याला वाचवण्यासाठी परमेश्वराला भवसागरात उडी घेणे अनिवार्य आहे. सर्वजण साधना करून भूलोक सोडतात व वैकुंठनिवासी परमेश्वराला प्राप्त करतात. तथापि स्वामी आणि मी स्वर्गातून भूतलावर आलो.
                    परमेश्वराला सर्वसामान्य माणसाप्रमाणे कुटुंब, पत्नी आणि मुले असे भौतिक जीवन जगायचे आहे का ? स्वामी असं का म्हणाले की असे केल्यानेच ते सर्वांना वाचवू शकतील ? स्वामी अवतार बनून पृथ्वीवर आले. स्वामी असे कां म्हणाले हे मला समजले नाही.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम  

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

          " हे विश्व म्हणजे माया आहे त्यामध्ये न अडकता केवळ परमेश्वराच्या विचारात राहा व त्यांच्यासाठी जीवन व्यतीत करा. "

पुष्प ४२ पुढे सुरु

                   यामध्ये परमेश्वराला चालण्यासाठी मी कसा पुष्पमार्ग सुशोभित करेन ते सांगते. परंतु कोणतेही फुल त्यासाठी उचित नाही, नाही याचे मला दुःख होते. अखेरीस मी असे लिहिते की परमेश्वराला चालण्यासाठी बनवण्याच्या मार्गावर वेदांनी पुष्परूप धारण करावे. मला कधीही स्वामींचे दर्शन, स्पर्शन वा संभाषण लाभले नाही. मला कधीही त्यांचे सामीप्य लाभले नाही. त्यांनी मला कधीही त्यांना स्पर्श करण्याची वा त्यांच्याशी प्रत्यक्ष संभाषण करण्याची अनुमती दिली नाही. म्हणून मी करूण विलाप करते, अश्रू ढाळते. मला स्वतःला त्यायोग्य बनविण्यासाठी मी पूर्ण जाण ठेवून तप करते व स्वतःमध्ये बदल घडवते. 
                    मला दर्शन, स्पर्शन वा संभाषण याचा लाभ न देताच स्वामींनी देह त्याग केला. इतरांना याचा लाभ अवश्य मिळाला. स्वामी आता नूतन देह धारण करून येत आहेत. त्या नवीन देहात ते मला दर्शन देतील, माझ्याशी बोलतील. त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी मी स्वतःला निर्मल आणि पवित्र बनवते आहे. माझ्याशी संभाषण करण्यासाठी ते नवीन देहात येत आहेत. अशा तऱ्हेने ह्या दोन मंगल मूर्ती एकमेकांना पाहतील, संभाषण करतील व स्पर्श करतील आणि त्यानंतरच कल्याणकारक सत्य युगाचा जन्म होईल. ही नवनिर्मिती अक्षत असेल, अस्पर्श असेल. 
५ जून २०१३ प्रातः ध्यान 
वसंता - स्वामी, माझे प्रभू तुम्ही या ! मला फक्त तुम्ही हवे आहात. 
स्वामी - मी नक्की येईन. मलाही तुझे सानिध्य हवे आहे. भौतिक जगतातील सर्वजण साधना करून परमेश्वरास प्राप्त करतात. आपण स्वर्गातून खाली येत आहोत. जगामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी परमेश्वराला भौतिक जीवन हवेसे वाटते आहे. महासागरामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला स्वतःहून सागरांत उडी घेतलेली व्यक्तीच वाचवू शकतो. 
वसंता - आता मला समजले स्वामी, मी तुमच्या दर्शन , स्पर्शन आणि संभाषणासाठी व्याकुळ झाले आहे. 
स्वामी - आपण लवकरच अनुभूती घेऊ. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" चेहरा मनाचा आरसा आहे म्हणून सदैव आनंदी राहा."

पुष्प ४२ पुढे सुरु 

                 आता आपण याविषयी पाहू. मला स्वामींच्या चरणांना अभिषेक करायचा आहे तथापि गंगाजल पवित्र नाही. मी केवळ माझ्या अश्रूंनी अभिषेक करू शकते. मला वाटते की अर्चनेसाठी फुले म्हणावी तितकी शुद्ध नाहीत. स्वामींचे चरण परममंगल असल्याने मी अशीच कोणतीही गोष्ट अर्चनेसाठी वापरू शकत नाही. सर्वजण मालिन्याने माखलेले आहेत. म्हणून भगवंताला समर्पित होण्यासाठी मी स्वतःला शुद्ध करते. माझ्या देहाचा प्रत्येक भाग मलीन असल्याने मी सर्व देह शुद्ध आणि निर्मल बनवून प्रकाशमय करते. त्यानंतर मी अर्चना करून त्यांना समर्पित होते. परमेश्वर सुमंगल आहे. त्यांच्या चरणांवर अर्चना करण्यासाठी परमसुमंगल असे काहीही नाही. बालपणापासून माझे विचार असे होते. 
खूप वर्षांपूर्वी मी शबरीवर एक लेख लिहिला होता. 
फुलांची पखरण करेन मी प्रभूच्या मार्गावरी 
परि, कमलपुष्पे जड तर नाही होणार ? 
गुलाबपुष्पांनी करू का मार्ग सुशोभित ?
परि तयांचे काटे ..... 
गालिचा जुईचा अंथरीत 
पायात रुततील त्यांच्या, कळ्या जुईच्या  
भगव्या कफनीधारीसाठी, चाफा भगवा 
अनेक पाकळ्या चंपकाच्या, इजा तर नाही पोहचणार पायासी त्यांच्या ? 
मार्गावरती शेवंतीचा रंगबिरंगी रम्य गालीचा 
नको, नको देठ बोचतील शेवंतीचे प्रभूचरणांसी. 
मनोरंजीता पुष्पांनी करू का मार्ग सुशोभित ? 
दिसे मनोहर परि, ना ती पुष्पे उत्कृष्ट, प्रिय प्रभुचरणांसाठी 
मार्ग वेदमंत्राचा; हीच अनुरूप पुष्पांजली, आदरांजली !


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 

जय साईराम   

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" सर्वांवर प्रेम करा ..... हा तुमचा मंत्र बनवा ."

वसंतामृतमाला 

अनुचित फुले

पुष्प ४२ 

                 मी जे जे काही लिहिते, त्यांनी माझ्या मनाला शांती लाभत नाही . मी नेहमी अश्रू ढाळते त्यामुळे माझ्या शरीरावर अधिक परिणाम होतो . मला केवळ स्वामींच्या दर्शनाची इच्छा आहे . 
३ जून २०१३ ध्यान 
वसंता- स्वामी , स्वामी ! मला तुमच्या चरणांना अभिषेक करायचा आहे , मी काय करू ? गंगाजलही आता शुद्ध नाही . नाही , नाही ! मी अभिषेक करणार नाही . मी अर्चना करू का ?
स्वामी - हो , अवश्य कर . 
वसंता - अर्चना करण्यासाठी मी कोणती फुले घेऊ ? तुमच्या चरणांना स्पर्श करण्यास कोणतीही फुले उचित नाहीत . सर्व फुलांमध्ये मधमाशांचा व इतर कीटकांचा मुखरस असतो आणि मुंग्याही असतात ! नाही , नाही कोणतीही गोष्ट शुद्ध आणि पवित्र नाही . मी काय करू स्वामी ? 
स्वामी - तुला देण्यासाठी माझा देह शुद्ध नसल्याने मी देहत्याग केला आणि नवीन देह धारण करून मी पुन्हा येणार आहे . तो देह अस्पर्श असेल . 
वसंता - स्वामी , तुमचे स्तुतीगान करण्यासाठी लागणारे शब्द , मी इतरांच्या कवितांसाठी वापरले आहेत . असे का ? 
स्वामी - यातून तुझा कृतज्ञता भाव दिसतो . जगातील कोणीही तुझ्यासारखी कृतज्ञता व्यक्त करत नाही . म्हणून तू वैश्विक मुक्ती मागितलीस . परमेश्वरही कृतज्ञता दर्शवत नाही . तू परमेश्वर असूनही कृतज्ञ भाव व्यक्त करतेस . 
ध्यान समाप्ती 

उर्वरित वसंतामृत पुढील भागत .....

जय साईराम 

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

" सर्वांवर प्रेम करा ……. हा तुमचा मंत्र बनवा."

पुष्प ४१ पुढे सुरु 

                  लहानपणापासूनच मला जरा, मरण, व्याधी आदींचे भय होते. हे तिन्ही माझ्या वाट्याला येऊ नये म्हणून मी तप केले. परंतु अवतारासही या तिन्हीला सामोरे जावे लागल्याचे मी पाहिले. मी टाहो फोडला. ' नाही ! नाही ! मला हे नकोय ! यानंतर स्वामींनी मला नाडीग्रंथ पाहण्यास सांगितले. त्यामध्ये स्वामी पुन्हा परत येणार असल्याचे सर्व सिद्धपुरुषांनी व ऋषींनी घोषित केले आहे. ते वाचून मी थोडी शांत झाले. ते येईपर्यंत माझे अश्रू व विलाप थांबणार नाहीत. अवताराला जरा, मरण, व्याधी नाही ,हे मी सिद्ध केलेच पाहिजे. मलाही जरा, मरण, व्याधी नाही. स्वामींपासून  मी ज्योतीरुपाने जन्म घेतला व माझी काया पुन्हा ज्योती स्वरूप धारण करून स्वामींमध्ये विलीन होईल.
..... हे पाप्यांचे आश्रयस्थान, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                    पाप्यांचे रक्षण करण्यासाठी स्वामी इथे आले. त्यांनी सर्वांची पापकर्मे स्वतःच्या देहावर घेतली. जीझसप्रमाणे ते पापी लोकांच्या रक्षणार्थ अवतरले. त्यांनी सर्व त्यांच्या अंगावर घेऊन हे जग सोडले. स्वामींनी मला येथे आणले; सर्वांच्या कर्मांचा संहार करून त्यांना मुक्ती देण्यासाठी. माझे तप आणि अश्रूंनी स्वामींचे हृद्य हेलावले. त्यांनी वैश्विक मुक्ती देण्याचे कबुल केले. तथापि त्यांनीच घालून दिलेल्या कर्मकायद्याचे उल्लंघन करणेही शक्य नव्हते. 
                   मानवाला त्याच्या गतजन्मातील सर्व कर्मांचे परिणाम भोगल्यानंतरच मुक्ती प्राप्त होते. म्हणून स्वामी आणि मी, आम्ही दोघांनी ५७० कोटी लोकांची कर्मे आमच्या अंगावर घेऊन भोगली. नूतन स्वामी आल्यानंतर सर्व संपेल; सत्ययुगाचा जन्म होईल. कर्माचे ओझे दूर झाल्याने सर्वांना मुक्तीचा लाभ होईल. ही नवनिर्मिती आहे. सर्वांचा कर्मांचा व पापांचा संहार होईल, आम्ही दोघं सर्वांमध्ये प्रवेश करू; एक नवी मानवता उदयास येईल. स्वामींनी दिलेल्या प्रार्थनेची येथे सांगता झाली. 
                    जीझसने धारण केलेला काटेरी मुकुट मदर मेरीच्या हृदयाभोवती दिसतो आहे. हा काटेरी मुकुट आता स्वामींच्या आणि माझ्या देहाला व्यापून राहिला आहे. शरशय्येसारखेच आम्ही आता वैश्विक पापकर्मांच्या कंटकशय्येवर पहुडलो आहोत. मेरीच्या चित्रातील हृद्य गर्भकोटमचे प्रतिनिधित्व करते. तिच्या हृदयातून उमटणाऱ्या ज्वाला स्तूपाचे निर्देशन करतात. त्या अष्टदल १२ कमलपुष्पांच्या सहस्त्राद्वारे स्वामींनी आणि मी वैश्विक कर्मे जाळून टाकली आणि आता नवयुगाचा जन्म झाला आहे. त्या अष्टदलपुष्पांमधून उमटणारी स्पंदने वैकुंठ भूलोकावर अवतरल्याचे दर्शवतात. 


जय साईराम