रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

          " हे विश्व म्हणजे माया आहे त्यामध्ये न अडकता केवळ परमेश्वराच्या विचारात राहा व त्यांच्यासाठी जीवन व्यतीत करा. "

पुष्प ४२ पुढे सुरु

                   यामध्ये परमेश्वराला चालण्यासाठी मी कसा पुष्पमार्ग सुशोभित करेन ते सांगते. परंतु कोणतेही फुल त्यासाठी उचित नाही, नाही याचे मला दुःख होते. अखेरीस मी असे लिहिते की परमेश्वराला चालण्यासाठी बनवण्याच्या मार्गावर वेदांनी पुष्परूप धारण करावे. मला कधीही स्वामींचे दर्शन, स्पर्शन वा संभाषण लाभले नाही. मला कधीही त्यांचे सामीप्य लाभले नाही. त्यांनी मला कधीही त्यांना स्पर्श करण्याची वा त्यांच्याशी प्रत्यक्ष संभाषण करण्याची अनुमती दिली नाही. म्हणून मी करूण विलाप करते, अश्रू ढाळते. मला स्वतःला त्यायोग्य बनविण्यासाठी मी पूर्ण जाण ठेवून तप करते व स्वतःमध्ये बदल घडवते. 
                    मला दर्शन, स्पर्शन वा संभाषण याचा लाभ न देताच स्वामींनी देह त्याग केला. इतरांना याचा लाभ अवश्य मिळाला. स्वामी आता नूतन देह धारण करून येत आहेत. त्या नवीन देहात ते मला दर्शन देतील, माझ्याशी बोलतील. त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी मी स्वतःला निर्मल आणि पवित्र बनवते आहे. माझ्याशी संभाषण करण्यासाठी ते नवीन देहात येत आहेत. अशा तऱ्हेने ह्या दोन मंगल मूर्ती एकमेकांना पाहतील, संभाषण करतील व स्पर्श करतील आणि त्यानंतरच कल्याणकारक सत्य युगाचा जन्म होईल. ही नवनिर्मिती अक्षत असेल, अस्पर्श असेल. 
५ जून २०१३ प्रातः ध्यान 
वसंता - स्वामी, माझे प्रभू तुम्ही या ! मला फक्त तुम्ही हवे आहात. 
स्वामी - मी नक्की येईन. मलाही तुझे सानिध्य हवे आहे. भौतिक जगतातील सर्वजण साधना करून परमेश्वरास प्राप्त करतात. आपण स्वर्गातून खाली येत आहोत. जगामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी परमेश्वराला भौतिक जीवन हवेसे वाटते आहे. महासागरामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला स्वतःहून सागरांत उडी घेतलेली व्यक्तीच वाचवू शकतो. 
वसंता - आता मला समजले स्वामी, मी तुमच्या दर्शन , स्पर्शन आणि संभाषणासाठी व्याकुळ झाले आहे. 
स्वामी - आपण लवकरच अनुभूती घेऊ. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा