ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" जेव्हा भक्त केवळ परमेश्वरासाठी जीवन व्यतीत करतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्या भक्ताचा शोध घेत येतो."
पुष्प ४२ पुढे सुरु
६ जून २०१३ प्रातःध्यान
वसंता - ' तुम्ही सुद्धा या सागरात उडी घेता '. स्वामी कृपया मला हे अधिक स्पष्ट करून सांगा. मला लिहायचे आहे.
स्वामी - तू असे लिहिले की समुद्रामध्ये बुडणा-यांना, जो त्या समुद्रात उडी घेतो तोच वाचवू शकतो. आपणही भवसागरात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तसेच केले. आपण विवाह केला. मुलांचा जन्म झाल्यावर मी तुझ्यापासून विभक्त झालो. तू करूण विलाप करू लागलीस. त्यानंतर मी तुझ्याशी ध्यानात बोलू लागलो व तुला सर्व सांगितले. तथापि यातील कोणतीही गोष्ट मी बाहेर उघड केली नाही. मला प्राप्त न करू शकल्याने तू सर्वांना सत्यसाई आणि वसंता बनविण्याची प्रतिज्ञा केलीस. हे घडत आहे आणि घडेल. भविष्यात आपला विवाह होईल व आपण सुखी जीवन जगू.
वसंता - मला समजले स्वामी, मी लिहीन.
ध्यान समाप्ती
स्वामींनी दुसऱ्या रुपात माझ्याशी विवाह केला. मुलांच्या जन्मानंतर ते माझ्यापासून विभक्त झाले. त्यानंतर मी चाळीस वर्षे अश्रू ढाळले, आक्रोश केला. त्यानंतर स्वामींनीच माझ्याशी विवाह केला होता हे त्यांनी मला दाखवून दिले. त्यांनी मला मंगळसूत्र देऊन ते घालण्यास सांगितले. मी स्वामींची शक्ती असल्याचे सर्व नाडीग्रंथ घोषित करतात. तथापि स्वामींचे व्यवस्थापन पाहणाऱ्या लोकांनी मला स्वामींचे दर्शन घेण्यास मनाई केली. १९९६ पासून स्वामी माझ्याशी ध्यानात बोलतात. तथापि त्यांनी मी कोण आहे हे बाहेर सांगितले नाही. म्हणून मी प्रतिज्ञा केली की जर मला सत्यसाईंचे हे एक रूप अप्राप्य असेल तर मी जगातील सर्व पुरुषांना सत्यसाई बनवेन आणि जगातील सर्व स्त्रियांना वसंता नंतरच मी आनंद लुटेन.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा