गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

            " आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराला अर्पण करून सर्व इच्छावासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि नंतर स्वतःला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे ."

पुष्प ४२ पुढे सुरु

                  आज स्वामींनी स्वतःचा झुल्यावर बसलेला फोटो दिला. त्या फोटोत त्यांच्या बाजूला एक फुल होते. हे एक स्वर्गीय फुल आहे असे स्वामींनी सांगितल्याचे मागील अध्यायात मी लिहिले आहे. आता स्वामींनी जे सांगितले ते यापूर्वी कधीही उघड केलेले नाही. ही एक नवीन संकल्पना आहे. सागरामध्ये बुडणाऱ्याला किनाऱ्यावर नुसती उभी असणारी व्यक्ती वाचवू शकत नाही तर त्या व्यक्तीला पोहता येणे आवश्यक आहे तसेच त्या व्यक्तीने सागरामध्ये उडी घेणेही आवश्यक आहे. तरच ती व्यक्ती बुडणाऱ्या मनुष्याला वाचवू शकते. त्याचप्रमाणे भवसागरामध्ये बुडणाऱ्या मनुष्याला वाचवण्यासाठी परमेश्वराला भवसागरात उडी घेणे अनिवार्य आहे. सर्वजण साधना करून भूलोक सोडतात व वैकुंठनिवासी परमेश्वराला प्राप्त करतात. तथापि स्वामी आणि मी स्वर्गातून भूतलावर आलो.
                    परमेश्वराला सर्वसामान्य माणसाप्रमाणे कुटुंब, पत्नी आणि मुले असे भौतिक जीवन जगायचे आहे का ? स्वामी असं का म्हणाले की असे केल्यानेच ते सर्वांना वाचवू शकतील ? स्वामी अवतार बनून पृथ्वीवर आले. स्वामी असे कां म्हणाले हे मला समजले नाही.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा