ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपले भाव रूप धारण करून आपले जीवन बनवतात."
पुष्प ४२ पुढे सुरु
स्वामींनी ४ जून २०१३ ला दिलेला संदेश या विषयाशी संबंधित आहे. त्यामध्ये पिवळ्या रंगाचा, मनुष्याचा आकार आहे. आणि 'Wise Nuggets ' असे शब्द लिहिले आहेत. त्यानंतर संस्कृत व इंग्रजीमध्ये खालील वचन लिहिले आहे.
' रुप हा मानवाचा अलंकार आहे. मुल्ये हा रुपाचा अलंकार आहे. ज्ञान हा मुल्यांचा अलंकार आहे. संयम हा ज्ञानाचा अलंकार आहे.
रूप हा मनुष्याचा अलंकार आहे. ८४ लक्ष योनींपैकी रूप हा केवळ मानवाचा अलंकार आहे. नरजन्म दुर्लभ आहे. केवळ मनुष्य देहाद्वारे परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. देवांनाही परमेश्वरप्राप्ती साध्य नाही. म्हणून आपण ह्या रूपाचा परमेश्वरप्राप्तीसाठी वापर केला पाहिजे. रूपाचे अलंकार सद्गुण आहेत. दुर्गुणी माणूस पशुवत् आहे. तो केवळ मूल्याधिष्ठीत शिक्षणांतर्गत स्वामींनी मुलांना हीच शिकवण दिली. एज्युकेअर हे एज्युकेशनहून अधिक महत्वाचे आहे हे स्वामींनी सर्वांना शिकवले. सद्गुणांचा अलंकार ज्ञान आहे. मनुष्याला ज्ञान प्राप्त झाल्यावरच सद्गुणांच्या आवश्यकतेविषयी समज येते. ज्ञान प्राप्तीनंतरच त्याला ८४ लक्ष योनींमधील नरजन्माचे महत्व समजते. पुन्हा जन्म न घेण्याची अवस्था प्राप्त होण्यासाठीच हा जन्म दिला आहे, हे त्याला ज्ञात होते.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा