गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" चेहरा मनाचा आरसा आहे म्हणून सदैव आनंदी राहा."

पुष्प ४२ पुढे सुरु 

                 आता आपण याविषयी पाहू. मला स्वामींच्या चरणांना अभिषेक करायचा आहे तथापि गंगाजल पवित्र नाही. मी केवळ माझ्या अश्रूंनी अभिषेक करू शकते. मला वाटते की अर्चनेसाठी फुले म्हणावी तितकी शुद्ध नाहीत. स्वामींचे चरण परममंगल असल्याने मी अशीच कोणतीही गोष्ट अर्चनेसाठी वापरू शकत नाही. सर्वजण मालिन्याने माखलेले आहेत. म्हणून भगवंताला समर्पित होण्यासाठी मी स्वतःला शुद्ध करते. माझ्या देहाचा प्रत्येक भाग मलीन असल्याने मी सर्व देह शुद्ध आणि निर्मल बनवून प्रकाशमय करते. त्यानंतर मी अर्चना करून त्यांना समर्पित होते. परमेश्वर सुमंगल आहे. त्यांच्या चरणांवर अर्चना करण्यासाठी परमसुमंगल असे काहीही नाही. बालपणापासून माझे विचार असे होते. 
खूप वर्षांपूर्वी मी शबरीवर एक लेख लिहिला होता. 
फुलांची पखरण करेन मी प्रभूच्या मार्गावरी 
परि, कमलपुष्पे जड तर नाही होणार ? 
गुलाबपुष्पांनी करू का मार्ग सुशोभित ?
परि तयांचे काटे ..... 
गालिचा जुईचा अंथरीत 
पायात रुततील त्यांच्या, कळ्या जुईच्या  
भगव्या कफनीधारीसाठी, चाफा भगवा 
अनेक पाकळ्या चंपकाच्या, इजा तर नाही पोहचणार पायासी त्यांच्या ? 
मार्गावरती शेवंतीचा रंगबिरंगी रम्य गालीचा 
नको, नको देठ बोचतील शेवंतीचे प्रभूचरणांसी. 
मनोरंजीता पुष्पांनी करू का मार्ग सुशोभित ? 
दिसे मनोहर परि, ना ती पुष्पे उत्कृष्ट, प्रिय प्रभुचरणांसाठी 
मार्ग वेदमंत्राचा; हीच अनुरूप पुष्पांजली, आदरांजली !


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 

जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा