ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" सर्वांवर प्रेम करा ……. हा तुमचा मंत्र बनवा."
पुष्प ४१ पुढे सुरु
..... हे पाप्यांचे आश्रयस्थान, आमच्यासाठी प्रार्थना कर .....
पाप्यांचे रक्षण करण्यासाठी स्वामी इथे आले. त्यांनी सर्वांची पापकर्मे स्वतःच्या देहावर घेतली. जीझसप्रमाणे ते पापी लोकांच्या रक्षणार्थ अवतरले. त्यांनी सर्व त्यांच्या अंगावर घेऊन हे जग सोडले. स्वामींनी मला येथे आणले; सर्वांच्या कर्मांचा संहार करून त्यांना मुक्ती देण्यासाठी. माझे तप आणि अश्रूंनी स्वामींचे हृद्य हेलावले. त्यांनी वैश्विक मुक्ती देण्याचे कबुल केले. तथापि त्यांनीच घालून दिलेल्या कर्मकायद्याचे उल्लंघन करणेही शक्य नव्हते. मानवाला त्याच्या गतजन्मातील सर्व कर्मांचे परिणाम भोगल्यानंतरच मुक्ती प्राप्त होते. म्हणून स्वामी आणि मी, आम्ही दोघांनी ५७० कोटी लोकांची कर्मे आमच्या अंगावर घेऊन भोगली. नूतन स्वामी आल्यानंतर सर्व संपेल; सत्ययुगाचा जन्म होईल. कर्माचे ओझे दूर झाल्याने सर्वांना मुक्तीचा लाभ होईल. ही नवनिर्मिती आहे. सर्वांचा कर्मांचा व पापांचा संहार होईल, आम्ही दोघं सर्वांमध्ये प्रवेश करू; एक नवी मानवता उदयास येईल. स्वामींनी दिलेल्या प्रार्थनेची येथे सांगता झाली.
जीझसने धारण केलेला काटेरी मुकुट मदर मेरीच्या हृदयाभोवती दिसतो आहे. हा काटेरी मुकुट आता स्वामींच्या आणि माझ्या देहाला व्यापून राहिला आहे. शरशय्येसारखेच आम्ही आता वैश्विक पापकर्मांच्या कंटकशय्येवर पहुडलो आहोत. मेरीच्या चित्रातील हृद्य गर्भकोटमचे प्रतिनिधित्व करते. तिच्या हृदयातून उमटणाऱ्या ज्वाला स्तूपाचे निर्देशन करतात. त्या अष्टदल १२ कमलपुष्पांच्या सहस्त्राद्वारे स्वामींनी आणि मी वैश्विक कर्मे जाळून टाकली आणि आता नवयुगाचा जन्म झाला आहे. त्या अष्टदलपुष्पांमधून उमटणारी स्पंदने वैकुंठ भूलोकावर अवतरल्याचे दर्शवतात.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा