ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" दिव्यत्व आपला खरा स्वभाव आहे, हे सत्य जाणून, कोणत्याही गोष्टीने संभ्रमित न होणे हे ज्ञानाचे सौंदर्य आहे. "
प्रकरण दुसरे
अंकुर पुढे सुरु
सहावीला शिकणाऱ्या वडक्कमपट्टीच्या मीना नावाच्या एका शिक्षिकेला मी ओळखत होते. मला त्यांच्या वर्गात घातले. माझे चांगले मार्कस् पाहून आमच्या वसतिगृहाच्या वॉर्डनना मी त्यांच्या वर्गात यावे असे वाटले. मला तिथे जाण्याची भीती वाटली आणि मी माझ्या गावातील शिक्षिकेजवळ राहणे पसंत केले.
वॉर्डनच्या वर्गात जाण्याचे नाकारल्यामुळे मी त्यांची नावडती विद्यार्थिनी झाले. त्या शालेय प्रार्थनांच्या संचालिका असल्यामुळे ' तुझा आवाज चांगला नाही. तू गाणे म्हणायचे नाहीस ' असा हुकूम सोडून त्यांनी मला मागे उभे केले.
अजूनही माझ्यात हा न्यूनगंड घर करून राहिलाय, इतरांसमोर भजन गाताना आजही मला भीती वाटते.
माझी चुलत बहिण सरोजिनी माझ्याच शाळेत शिकत होती. तिने मला खूप मदत केली. ती माझ्याहून पाच वर्षांनी मोठी होती. ती नेहमी माझे कुरळे केस विंचरून वेणी घालून देई. त्यामुळे मला तिचा खूप आधार वाटत असे. दोन वर्षांनी तिने शाळा सोडली आणि मी पुन्हा एकटी पडले. तोपर्यंत मी लहान मुलांचे वसतिगृह सोडून मोठ्या मुलांच्या वसतिगृहात राहायला आले. इथली मुले वयाने मोठी असल्याने समजूतदार होती त्यामुळे मला त्यांचा तितकासा त्रास होत नसे.
उर्वरित मजकूर पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा