गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " जर तुम्ही अखंड नामस्मरण केलेत तर ते तुमच्या श्वासाइतके स्वाभाविक बनून जाते."

प्रकरण चार 

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरू 

                  ही सर्व पत्रे आता खूप जुनी झाली म्हणून मी ती पत्रे पुन्हा नवीन वहीत लिहिली. परंतु तीही आता जीर्णशीर्ण झाली आहेत. आज मी ही वही उघडल्यावर १९८६ चे एक पत्र मला मिळाले. ते वाचू लागल्यावर मला अश्रू आवरेनासे झाले. मला असे लक्षात आले की या पत्राला प्रतिसाद देण्यासाठी स्वामी प्रेमसाई अवतार घेणार आहेत. आज माझ्या त्यांच्यासाठी ज्या भावना आहेत त्याच भावना भविष्यकाळात माझ्यासाठी त्यांच्या मनात असतील. २५ वर्षांपूर्वी लिहिलेले हे पत्र मी पूर्णपणे विसरून गेले होते. जेव्हा मी ही वही शोधू लागले तेव्हा ते पुन्हा माझ्या मनाच्या पृष्ठभागावर आले . आज मी स्वामींसाठी जशी तळमळते आहे तसे स्वामी प्रेमसाई अवतारात माझ्यासाठी तळमळतील. ते मला पाहण्यासाठी व माझ्याशी बोलण्यासाठी तळमळतील. 
११-९-२००८ ( दुपारचे ध्यान )
वसंता : स्वामी, हे असे पत्र मी का लिहिले ? हे तळतळाट तर नाहीत ना ? का हे प्रेमापोटी आलेले शब्द आहेत ? 
स्वामी : हे तर प्रेमच आहे. ते ऋण फेडण्यासाठी मी अजून एक अवतार घेतो आहे. तू जशी सदैव माझ्या विचारांमध्ये असतेस, माझ्यासाठी अश्रू ढाळतेस, जसे तुझे अंतःकरण माझ्यासाठी द्रवते तसेच मीही तुझ्यासाठी करेन. मी ही तुझाच विचार करेन व तुझ्या प्रेमाचा ध्यास घेईन. 
वसंता : स्वामी, मला हे काहीही नकोय. खरे प्रेम असे नसते. 
स्वामी : आता तुझे सर्व भाव शब्दातून व्यक्त झाले पाहिजेत. मगच ते शब्द सत्यात उतरतील. माझा पुढील जन्म म्हणजे तुझ्या भावविश्वाचे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी असेल. 
वसंता : स्वामी, परमेश्वराला प्रतिबिंब, प्रतिक्रिया व प्रतिध्वनी कसे लागू होईल ? 
स्वामी : हे सर्व परमेश्वराच्या दिव्य कार्यासाठी घडते आहे. हे प्रतिरोधाच्या भावनेने उच्चारलेले शब्द आहेत असे तू समजू नकोस. तू केवळ तुझी इच्छा व्यक्त केली आहेस आणि म्हणून ती पूर्ण होईल. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा