गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जेव्हा रूप आणि भाव यांच्यामध्ये समन्वय असतो तेव्हाच आपण सत्याची अनुभूती घेतली असे म्हणू शकतो."

प्रकरण सहा 

मंत्र 

                 नंतर ध्यानामध्ये स्वामींनी सांगितले की सर्वजण या मंत्राचे उच्चारण करू शकतात. व्याधीग्रस्त लोकांना हा मंत्र सहाय्यभूत ठरेल. मी विभूतीवर तो मंत्र लिहून ती विभूती अनेक व्याधीग्रस्त व्यक्तींना पाठवली. तेव्हापासून आतापर्यंत मंत्र, प्रार्थना आणि विभूती यांच्या सहाय्याने अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे. स्वामी म्हणाले, " आध्यात्मिक मार्गावर प्रगती करणाऱ्यास व शांतीची अनुभूती घेण्यास हा मंत्र सहाय्यभूत होतो. हा मुक्तीमंत्र आहे. देह, मन आणि आत्मा ह्यांच्या त्रिविध तापांवर रामबाण उपाय असा हा मंत्र आहे. 
३० डिसेंबर २००३ ध्यान 
वसंता : स्वामी, ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः हा मंत्र कसा काय आला ?
स्वामी : तुझ्या प्रेमामुळेच तुझे नाव परमेश्वराशी जोडले गेले. तुझ्या अनिर्बंध प्रेमवर्षावाने परमेश्वराचे नाव तुझ्याशी जोडले गेले. 
वसंता : स्वामी, या मंत्राचे उच्चारण करणाऱ्यास कोणता लाभ होईल ?
स्वामी : अनेक रोग या मंत्राने बरे झाले आहेत, हे कसं घडलं ? वृंदावनामध्ये सर्वजण राधे राधे या नामाचा जप करत असल्यामुळे सर्वजण तिच्यासारखेच बनतात. त्याचप्रमाणे वसंतसाई मंत्राचा जप करणारे तुझ्यासारखेच प्रेमस्वरूप होतील. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " हे जग म्हणजे आपल्या भाव आणि विचारांचा आविष्कार होय. हा एक आरसा आहे. "

प्रकरण सहा 

मंत्र

              संध्याकाळी डॉक्टरांच्या कुटुंबाने मला त्यांच्या देवघरात बोलावले आणि त्यांनी मला नवीन साडी दिली. ते म्हणाले " तुम्ही आमची पूजा स्वीकारली पाहिजे." त्यांनी मला एका सुशोभित खुर्चीत बसण्यास सांगितले. मी त्याला नकार दिला आणि म्हणाले," नाही नाही मी नाही बसणार." डॉक्टर व इतरांनी माझी आर्जवं केली. स्वामींनी साडीवर SV अशी अक्षरे लिहून साडीला आशीर्वाद दिले. मी ती साडी नेसून देवघरात बसले. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. डॉक्टरांचे कुटुंब माझ्या भोवती बसले आणि आम्ही सर्वांनी १०८ वेळा  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः या मंत्राचा जप केला. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आपली श्रध्दा आणि भक्ती यांच्याद्वारे आपण लाभान्वित होतो, कोणतीही बाह्य गोष्ट वा व्यक्ती यांच्यामुळे नव्हे. " 


प्रकरण सहा 
मंत्र 

              " हा मंत्र म्हणजे स्वामींच्या आणि माझ्यामध्ये असलेल्या बंधांच्या सत्यतेचा ठोस पुरावा आहे. मी त्यांची चितशक्ती असल्याचे हा मंत्र दर्शवतो. माझा जन्म त्यांच्यापासून झाला आहे आणि माझा त्यांच्याशी योग होणार आहे. "
               लंडनच्या एक भक्त निर्मला, माझे पहिले पुस्तक वाचून वडक्कमपट्टीला आल्या. लंडनला परतल्यानंतर त्यांनी मला पत्र पाठवले. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांविषयी लिहिले होते. मी प्रार्थना केल्यास त्यांना सहाय्य होईल, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. बऱ्याचदा त्या मला स्वामींकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगत. या दरम्यान मी परमकुडीतील डॉक्टरांच्या घरी जा ये करत असे, जिथे चिठ्ठीवर स्वामींचे संदेश येत. २३ मे १९९८ रोजी मी परमकुडीमध्ये असताना निर्मलाने  फोन केला व म्हणाल्या, " अम्मा, प्लीज मला एक मंत्र सांगा ना. दिवसेंदिवस येथील परिस्थिती कठीण होत चालली आहे." मी म्हणाले," मला माहित नाही. मी स्वामींना विचारेन." मी दुपारच्या ध्यानात स्वामींकडे प्रार्थना केली. ध्यानानंतर आम्ही पाहिलं की एका कागदाच्या तुकड्यावर ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः हा मंत्र स्वामींनी लिहिला होता. 
                मला धक्काच बसला आणि खूप भीतीही वाटली. मी आक्रोश करू लागले. " स्वामींनी माझे नाव का बरे घातले ?"

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम
            

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " बाह्य जगत, कीर्ती, संपत्ती, कोणी व्यक्ती वा कोणतीही गोष्ट यापैकी कशाचीही इच्छा न धरता फक्त परमेश्वराची इच्छा धरा." 

प्रकरण पाच
 
चंद्र आणि मन

                 त्यावेळी स्वामींनी मदुराईहून एका मुलाला पाठवले. त्यांच्या घरी अनेक चमत्कार घडतात. तिथे स्वामी या मुलाशी बोलतात. तो मुलगा मला म्हणाला, " स्वामींनी मला तुमच्या घरी येण्यास सांगितले. " स्वामी त्या मुलाच्याद्वारे माझ्याशी बोलले व माझे सांत्वन केले. नंतर तो मला मदुराईला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे ' इथेच, याक्षणी, मुक्ती भाग २ ' हस्तलिखिताच्या प्रत्येक पानावर विभूती साक्षात करून स्वामींनी आशीर्वाद दिले. आम्ही दुसरे पुस्तक छापल्यानंतर स्वामींनी १०८ नामे दिली आणि यातील प्रत्येक नाव गीतेतील अध्यायाशी जोडून त्यावर लिहिण्यास सांगितले. प्रथम मी काही नामे लिहिली. नंतर मी असे लिहिले की ही सहा नामे, जो कोणी या अध्यायाचे आचरण करेल त्याच्यासाठी आहेत. स्वामींनी स्वतः मला १०८ नावे देऊन सांगितले की मी त्यांची शक्ती आहे. तथापि मी असे लिहिले की, जो ह्या अध्यायाचे आचरण करेल तोही त्या नामांसाठी पात्र असेल. केवळ ' साई पादधुलीकायै ' हे नाम माझ्यासाठी आहे. 
               मला स्वामींच्याद्वारेही नावलौकिक नको आहे. मी नेहमीच एकटी असते. मला कोणाकडूनही प्रशंसेची इच्छा नाही वा आवश्यकता नाही. मला प्रशंसेचीही भीती वाटते. मी परमेश्वराकडे एक वर मागितला, की संपूर्ण विश्वामध्ये आध्यात्मिक जाणीव निर्माण होऊन मुक्ती मिळावी. एवढीच माझी विनवणी होती. हा माझा स्वभाव आहे. त्यासाठीच मी अश्रू ढाळत आहे. मी माझ्या कुटुंबासाठी किंवा कोणत्याही भौतिक गोष्टीसाठी अश्रू ढाळत नाही. मी केवळ परमेश्वरासाठी आणि वैश्विक मुक्तीसाठी अश्रू ढाळत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

            " आपण साधुसंत आणि महात्मे यांच्या आदर्श जीवनाचे अनुसरण केले पाहिजे व केवळ सत्य म्हणजेच आपल्यातील आत्मतत्व याच्यावर अवलंबून राहिले पाहिजे. "

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                माझे ' इथेच याक्षणी मुक्ती भाग २ ' हे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी कोणी म्हणाले, की माझे नाडीग्रंथ वाचून घ्यावे. आम्ही अनेक नाडीग्रंथ पाहिले. सगळ्या नाडीग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मी पूर्वजन्मी राधा होते व आता माझे शरीर ज्योतीस्वरूप बनून भगवंताच्या देहामध्ये विलिन होईल. आम्ही नाडीवाचनाचा पुस्तकात समावेश केला आणि हस्तलिखित पुट्टपर्तीला स्वामींच्या आशीर्वादासाठी नेले. 
               त्यावेळी स्वामींच्या एका सद्भक्तांनी आम्हाला सुचवले की आम्ही हे नाडीवाचन पुट्टपर्तीतील स्वामींच्या एका जवळच्या भक्ताला दाखवावे. ते कदाचित आम्हाला पुस्तकावर स्वामींची स्वाक्षरी मिळवून देण्यास मदत करतील. तथापि त्या भक्ताने नाडीवाचन करून ते तत्परतेने प्रशांती निलयमच्या कार्यालयातील उचचपदस्थ अधिकाऱ्यास दिले. दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्याने आम्हाला त्यांच्या कार्यालयात बोलावले. माझे पहिले पुस्तक दाखवून त्यांनी मला पुट्टपर्तीतून बाहेर जाण्यास सांगितले व पुन्हा प्रशांती निलयममध्ये येऊ नये असे बजावले. 
               असे का बरं घडले ? माझे नाडीभाकीत वाचल्यावर त्यांना असे वाटले का, की मी स्वामींसारखी आहे किंवा मी स्वामींच्याच योग्यतेची आहे ? या भीतीपोटी त्यांनी मला पुट्टपर्ती सोडून जाण्यास सांगितले व प्रशांती निलयममध्ये येण्यास बंदी घातली. घरी परतल्यावर मी खूप रडले. सर्व पुस्तके एका बाजूला फेकून दिली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 
 

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " कूपण मनुष्य जसा खर्च करण्यापूर्वी पै न पै मोजतो तसेच एकही सेकंड वाया न घालवता परमेश्वराचे चिंतन करा. इतर कोणत्याही गोष्टीवर वेळ खर्ची घालण्याचे कटाक्षाने टाळा. म्हणजे कूपणतेचे योगात रूपांतर होईल. "

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

               जगाच्या कर्मांसाठी मी १० वर्षे रडत होते. असे कोणी रडेल का ? त्यापुढे मला माझे कुटुंब, मुलेबाळे त्यांचाही विसर पडला. मी दिवसरात्र जगासाठी अश्रू ढाळत होते. माझा चेहरा रडून रडून सुजला होता. मी स्वामींना वर मागितला, " स्वामी, कृपा करून सर्वांच्या  कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी मला मार्ग दाखवा. " 
              स्वामी म्हणाले, " रडू नकोस, तू तुझ्या अश्रुंनीच सर्व काही साध्य करणार आहेस. तुझी वैश्विक करुणाच संपूर्ण जगाला बदलेल. तू नक्कीच करशील. रडू नकोस. "
               जगातल्या सर्वांसाठी ढाळलेल्या अश्रुंचे हेच कारण आहे तर ! त्यावेळी जे माझ्या सोबत होते ते माझ्या भावनांचे साक्षीदार आहेत. प्रथम मी रडले की  सर्वजण माझे व्हायला हवेत. मग मी त्यांची कर्मे नष्ट  करण्यासाठी रडले. 
                लहान असतानाच मला व्याधी, जरा आणि मृत्यू यातून मुक्त व्हायचे होते. मला मार्ग सापडला. तो म्हणजे भगवंताशी लग्न करायचे आणि त्याच्याशी  सदेह एकरूप व्हायचे. आता मला सर्वांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग सापडला. 

***

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

                 " काम ज्ञानाला झाकोळून टाकते.  भावनांचा उद्रेक इंद्रियांमध्ये प्रवेश करून नानाविध इच्छा दर्शवतो व अतृप्त अग्नीसारखा खऱ्या ज्ञानाला वेढून टाकतो आणि परिणाम स्वरूप सर्वनाश होतो." 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                जगातल्या सर्वांसाठी काहीतरी करावं याचा मी ध्यासच घेतला. हा करुणामूर्ती परमेश्वर इथे अवतरला आहे. त्याचा सर्वांना फायदा नको का व्हायला ? त्यांच्यामध्ये परिवर्तन नको का व्हायला ? काही मार्ग आहे का ? त्या महान अवताराच्या चरणकमलांशी मी सर्वांना कसे बरे आणणार ? आता जर त्यांना दिलासा मिळाला नाही तर कधी मिळणार ? बुद्धाला मिळाले तसे मला उत्तर मिळेल का ? त्यांना अज्ञानाच्या अंधःकरातून बाहेर काढून जाणीवेच्या प्रकाशाकडे मी कसे बरे नेऊ ? 
                जगभरातून आलेली असंख्य पत्रे आणि फोन यामुळे माणूस कसा या सर्व रोगांना बळी पडतो आणि कर्मांचा प्रभाव कसा असतो याची मला जाणीव झाली. जागतिक कर्मतराजू समतोल करण्यासाठी मी मलाच अर्पण करायचे ठरवले. एका पारड्यात जगाची कर्मे होती. हा कर्मतराजू समतोल करण्यासाठी स्वतःला दुसऱ्या पारड्यात घातले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         " सत्याला केवळ वेद आणि उपनिषदे यांच्यामध्ये परिसीमित करू नका. सत्य सर्वव्यापी आहे व प्रत्येकाचे आहे. " 

प्रकरण 

चंद्र आणि मन 

               चतुर्युगाच्या अखेरीस प्रलय होतो आणि नंतर पुन्हा नवीन चक्र सुरु होते. हे कसं घडतं ? पुरुष प्रकृती म्हणजे काय ? स्वामी माझ्या जीवनाद्वारे हे दाखवत आहेत. परमेश्वर आणि निर्मिती एकच आहेत. यावेळेस प्रलय न घडवता आम्ही संपूर्ण जगाच्या कर्माचा संहार करून नवनिर्मिती करणार आहोत हे अवतारकार्य आहे.  मी विलाप करत होते आणि म्हणत होते, 
               " मी सर्व लोकांचा कर्मतराजू कसा बरं  समतोल करू ? मला सर्वांसाठी काहीतरी केलेच पाहिजे. यातून काय बरं मार्ग काढता येईल ? परमेश्वराने पृथ्वीवर अवतार घेतला असताना, संपूर्ण जगाला त्याचा लाभ व्हायला नको का ? नंतर त्यांना कोण पापमुक्त करणार ? त्यांचं काय होईल ? काहीतरी केलेच पाहिजे. मी करू तरी काय ?" 
               फक्त हाच प्रश्न सतत मला अंतर्मनात ऐकू येत होता. जणू काही किंचाळत होता. यावर कोणता मार्ग आहे ? या विचारांची तीव्रता इतकी होती की मला भीती वाटली, की मी आता पूर्णपणे कोसळणार. हे कार्य मी कसे पूर्णत्वास नेणार !

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम
          
 

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" भक्तांच्या प्रयत्नांनुसार परमेश्वर स्वतःला प्रकट करतो. "
प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

              काही दिवसांनी सावित्री पुट्टपार्टीला गेल्या. तेथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यावर शिक्कामोर्तब झाले. काही दिवसांनी स्वामींनी त्यांना इंटरव्ह्यूला बोलावले, तेव्हा त्यांनी त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स स्वामींनी दाखवले. स्वामी म्हणाले , " सगळं खरं आहे. वडक्कमपट्टीला जाऊन आण्टीनना भेटा." सावित्री त्यांचे पती व आई माझ्याकडे आले. स्वामी ध्यानात म्हणाले," तुझ्या प्रेमशक्तीने त्यांच्या कर्माचा संहार झाला आणि कॅन्सर कॅन्सल झाला. "
             सावित्री दक्षिण आफ्रिकेतील पाच साई सेंटर्सच्या चेअरपर्सन आहेत. 
            यानंतर जगभरातून मला अनेक पत्रे आणि फोन येऊ लागले. ते मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगत. याविषयी मी ' प्रेम निवारण साई ' मध्ये लिहिले आहे. अनेकजण रोगमुक्त झाले. माझ्या प्रेमाने त्यांची कर्मे आणि रोग कसे नाहीसे होतात, हे स्वामींनी अनेक उदाहरणांद्वारे दाखवले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम