गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

            " आपण साधुसंत आणि महात्मे यांच्या आदर्श जीवनाचे अनुसरण केले पाहिजे व केवळ सत्य म्हणजेच आपल्यातील आत्मतत्व याच्यावर अवलंबून राहिले पाहिजे. "

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                माझे ' इथेच याक्षणी मुक्ती भाग २ ' हे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी कोणी म्हणाले, की माझे नाडीग्रंथ वाचून घ्यावे. आम्ही अनेक नाडीग्रंथ पाहिले. सगळ्या नाडीग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मी पूर्वजन्मी राधा होते व आता माझे शरीर ज्योतीस्वरूप बनून भगवंताच्या देहामध्ये विलिन होईल. आम्ही नाडीवाचनाचा पुस्तकात समावेश केला आणि हस्तलिखित पुट्टपर्तीला स्वामींच्या आशीर्वादासाठी नेले. 
               त्यावेळी स्वामींच्या एका सद्भक्तांनी आम्हाला सुचवले की आम्ही हे नाडीवाचन पुट्टपर्तीतील स्वामींच्या एका जवळच्या भक्ताला दाखवावे. ते कदाचित आम्हाला पुस्तकावर स्वामींची स्वाक्षरी मिळवून देण्यास मदत करतील. तथापि त्या भक्ताने नाडीवाचन करून ते तत्परतेने प्रशांती निलयमच्या कार्यालयातील उचचपदस्थ अधिकाऱ्यास दिले. दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्याने आम्हाला त्यांच्या कार्यालयात बोलावले. माझे पहिले पुस्तक दाखवून त्यांनी मला पुट्टपर्तीतून बाहेर जाण्यास सांगितले व पुन्हा प्रशांती निलयममध्ये येऊ नये असे बजावले. 
               असे का बरं घडले ? माझे नाडीभाकीत वाचल्यावर त्यांना असे वाटले का, की मी स्वामींसारखी आहे किंवा मी स्वामींच्याच योग्यतेची आहे ? या भीतीपोटी त्यांनी मला पुट्टपर्ती सोडून जाण्यास सांगितले व प्रशांती निलयममध्ये येण्यास बंदी घातली. घरी परतल्यावर मी खूप रडले. सर्व पुस्तके एका बाजूला फेकून दिली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा