रविवार, ११ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " कूपण मनुष्य जसा खर्च करण्यापूर्वी पै न पै मोजतो तसेच एकही सेकंड वाया न घालवता परमेश्वराचे चिंतन करा. इतर कोणत्याही गोष्टीवर वेळ खर्ची घालण्याचे कटाक्षाने टाळा. म्हणजे कूपणतेचे योगात रूपांतर होईल. "

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

               जगाच्या कर्मांसाठी मी १० वर्षे रडत होते. असे कोणी रडेल का ? त्यापुढे मला माझे कुटुंब, मुलेबाळे त्यांचाही विसर पडला. मी दिवसरात्र जगासाठी अश्रू ढाळत होते. माझा चेहरा रडून रडून सुजला होता. मी स्वामींना वर मागितला, " स्वामी, कृपा करून सर्वांच्या  कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी मला मार्ग दाखवा. " 
              स्वामी म्हणाले, " रडू नकोस, तू तुझ्या अश्रुंनीच सर्व काही साध्य करणार आहेस. तुझी वैश्विक करुणाच संपूर्ण जगाला बदलेल. तू नक्कीच करशील. रडू नकोस. "
               जगातल्या सर्वांसाठी ढाळलेल्या अश्रुंचे हेच कारण आहे तर ! त्यावेळी जे माझ्या सोबत होते ते माझ्या भावनांचे साक्षीदार आहेत. प्रथम मी रडले की  सर्वजण माझे व्हायला हवेत. मग मी त्यांची कर्मे नष्ट  करण्यासाठी रडले. 
                लहान असतानाच मला व्याधी, जरा आणि मृत्यू यातून मुक्त व्हायचे होते. मला मार्ग सापडला. तो म्हणजे भगवंताशी लग्न करायचे आणि त्याच्याशी  सदेह एकरूप व्हायचे. आता मला सर्वांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग सापडला. 

***

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा