रविवार, १८ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " बाह्य जगत, कीर्ती, संपत्ती, कोणी व्यक्ती वा कोणतीही गोष्ट यापैकी कशाचीही इच्छा न धरता फक्त परमेश्वराची इच्छा धरा." 

प्रकरण पाच
 
चंद्र आणि मन

                 त्यावेळी स्वामींनी मदुराईहून एका मुलाला पाठवले. त्यांच्या घरी अनेक चमत्कार घडतात. तिथे स्वामी या मुलाशी बोलतात. तो मुलगा मला म्हणाला, " स्वामींनी मला तुमच्या घरी येण्यास सांगितले. " स्वामी त्या मुलाच्याद्वारे माझ्याशी बोलले व माझे सांत्वन केले. नंतर तो मला मदुराईला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे ' इथेच, याक्षणी, मुक्ती भाग २ ' हस्तलिखिताच्या प्रत्येक पानावर विभूती साक्षात करून स्वामींनी आशीर्वाद दिले. आम्ही दुसरे पुस्तक छापल्यानंतर स्वामींनी १०८ नामे दिली आणि यातील प्रत्येक नाव गीतेतील अध्यायाशी जोडून त्यावर लिहिण्यास सांगितले. प्रथम मी काही नामे लिहिली. नंतर मी असे लिहिले की ही सहा नामे, जो कोणी या अध्यायाचे आचरण करेल त्याच्यासाठी आहेत. स्वामींनी स्वतः मला १०८ नावे देऊन सांगितले की मी त्यांची शक्ती आहे. तथापि मी असे लिहिले की, जो ह्या अध्यायाचे आचरण करेल तोही त्या नामांसाठी पात्र असेल. केवळ ' साई पादधुलीकायै ' हे नाम माझ्यासाठी आहे. 
               मला स्वामींच्याद्वारेही नावलौकिक नको आहे. मी नेहमीच एकटी असते. मला कोणाकडूनही प्रशंसेची इच्छा नाही वा आवश्यकता नाही. मला प्रशंसेचीही भीती वाटते. मी परमेश्वराकडे एक वर मागितला, की संपूर्ण विश्वामध्ये आध्यात्मिक जाणीव निर्माण होऊन मुक्ती मिळावी. एवढीच माझी विनवणी होती. हा माझा स्वभाव आहे. त्यासाठीच मी अश्रू ढाळत आहे. मी माझ्या कुटुंबासाठी किंवा कोणत्याही भौतिक गोष्टीसाठी अश्रू ढाळत नाही. मी केवळ परमेश्वरासाठी आणि वैश्विक मुक्तीसाठी अश्रू ढाळत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा