गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जेव्हा रूप आणि भाव यांच्यामध्ये समन्वय असतो तेव्हाच आपण सत्याची अनुभूती घेतली असे म्हणू शकतो."

प्रकरण सहा 

मंत्र 

                 नंतर ध्यानामध्ये स्वामींनी सांगितले की सर्वजण या मंत्राचे उच्चारण करू शकतात. व्याधीग्रस्त लोकांना हा मंत्र सहाय्यभूत ठरेल. मी विभूतीवर तो मंत्र लिहून ती विभूती अनेक व्याधीग्रस्त व्यक्तींना पाठवली. तेव्हापासून आतापर्यंत मंत्र, प्रार्थना आणि विभूती यांच्या सहाय्याने अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे. स्वामी म्हणाले, " आध्यात्मिक मार्गावर प्रगती करणाऱ्यास व शांतीची अनुभूती घेण्यास हा मंत्र सहाय्यभूत होतो. हा मुक्तीमंत्र आहे. देह, मन आणि आत्मा ह्यांच्या त्रिविध तापांवर रामबाण उपाय असा हा मंत्र आहे. 
३० डिसेंबर २००३ ध्यान 
वसंता : स्वामी, ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः हा मंत्र कसा काय आला ?
स्वामी : तुझ्या प्रेमामुळेच तुझे नाव परमेश्वराशी जोडले गेले. तुझ्या अनिर्बंध प्रेमवर्षावाने परमेश्वराचे नाव तुझ्याशी जोडले गेले. 
वसंता : स्वामी, या मंत्राचे उच्चारण करणाऱ्यास कोणता लाभ होईल ?
स्वामी : अनेक रोग या मंत्राने बरे झाले आहेत, हे कसं घडलं ? वृंदावनामध्ये सर्वजण राधे राधे या नामाचा जप करत असल्यामुळे सर्वजण तिच्यासारखेच बनतात. त्याचप्रमाणे वसंतसाई मंत्राचा जप करणारे तुझ्यासारखेच प्रेमस्वरूप होतील. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा