ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्याला केवळ वेद आणि उपनिषदे यांच्यामध्ये परिसीमित करू नका. सत्य सर्वव्यापी आहे व प्रत्येकाचे आहे. "
प्रकरण
चंद्र आणि मन
" मी सर्व लोकांचा कर्मतराजू कसा बरं समतोल करू ? मला सर्वांसाठी काहीतरी केलेच पाहिजे. यातून काय बरं मार्ग काढता येईल ? परमेश्वराने पृथ्वीवर अवतार घेतला असताना, संपूर्ण जगाला त्याचा लाभ व्हायला नको का ? नंतर त्यांना कोण पापमुक्त करणार ? त्यांचं काय होईल ? काहीतरी केलेच पाहिजे. मी करू तरी काय ?"
फक्त हाच प्रश्न सतत मला अंतर्मनात ऐकू येत होता. जणू काही किंचाळत होता. यावर कोणता मार्ग आहे ? या विचारांची तीव्रता इतकी होती की मला भीती वाटली, की मी आता पूर्णपणे कोसळणार. हे कार्य मी कसे पूर्णत्वास नेणार !
उर्वरित प्रकरण पुढील भागात
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा