गुरुवार, १ मार्च, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

            " तुमच्या नेत्रांना केवळ परमेश्वर दृष्टीस पडला पाहिजे, अन्य कहीही नाही. "

प्रकरण चौदा

वसंतमयम्

              कशासाठी ही आस्था ? का हे प्रेम ? ' स्वामींचं प्रेम पुरेसं नाहीय ' असं मला नेहमी का वाटत असतं ? परमेश्वराची अनेकदा अनुभूती घेऊनही मी कधीही तृप्त झाले नाही. माझ्यामध्ये सतत ' मला भगवंत हवा ' ही धगधगती तृष्णा का होती ? त्यावर मी कधी ताबा मिळवू शकेन ? स्वामींना प्राप्त केल्यानांतरही माझ्या डोळ्यातील अश्रू का थांबत नाहीत ? हा काही आजकालचा ध्यास नव्हे. अगदी बालवयापासून मी हा ध्यास घेतला आहे. बालवायत मी लिहिलेली ही कविता पुढे देत आहे. 

रसग्रहण कराया तुझ्या मनमोहक रूपाचे 
सहस्त्र नेत्र असती इंद्रदेवास 
का न लाभले सहस्त्र नेत्र मज ?
असती मात्र दोन नेत्र मज !
तुझे दिव्य रूप पाहण्या, अपुरे हे दोन नेत्र 
हे परमेशा, इंद्रासम का न लाभले सहस्त्र नेत्र मज ?


सहस्त्र जिव्हा असती आदिशेषास 

असे मात्र एक जिव्हा मज तुझ्या स्तवनास 
कृष्णा ! गोविंदा !मुरली !मुकुंदा !
अच्युता ! अमला ! हरि ! प्रभू !
माझ्या जीवा ... हे परमेशा ! हे नसे पुरेसे 
गुणगान तुझे कराया,
आदिशेषासम का न दिल्या मज सहस्त्र जिव्हा ?


सहस्त्र कर असती कार्तवीर्य अर्जुनास 

सहस्त्र कर देऊनी कृतार्थ कर मज 
हे प्रियतम कृष्णा, विनविते मी ... 
हे दान सहस्त्र करांचे -


- तुझे पूजन कराया   
- पुष्पार्चन कराया  

- दिव्य चरणांना मिठी घालाया 


का घेतला नरजन्म मी अंधेरी नगरीत ?


- ना मज सहस्त्र नेत्र 
- ना मज सहस्त्र जिव्हा 
- ना मज सहस्त्र कर 

काय करू मी, काय करू ? 



उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा