गुरुवार, २८ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " जन्मजात आपल्यामध्ये अमर्याद शक्ती असते. त्यायोगे मनुष्य पंचतत्वांनाही नियंत्रणात ठेऊ शकतो."

भाग चौथा 

हृद्गत ......... 

             मी आक्रोश करून भगवानांना म्हणत होते, " हे कान्हा, हे साईश्वरा, मी स्वतःला कशी मुक्त करू ? का मन मानेल त्या मार्गाने जाऊन अधोगतीला जाऊ ? का मनावर विजय मिळवून मुक्ती प्राप्त करू ? कान्हा, तुम्ही काय करणार आहात ? हा माझ्या तत्वाचा प्रश्न आहे आणि हा तुमच्या चांगुलपणाचाही प्रश्न आहे. तुच्या दिव्य नामाप्रीत्यर्थ मी तुम्हाला विचारते आहे. कृपा करून मला मार्ग दाखवा. माझे मन तुम्ही तुमच्याकडे वळवा, नाहीतर तुम्ही माझा जीव परत घ्या. मला ते हरीण व्हायचं आहे, ज्याचा एक केस जरी जमिनीवर पडला तर ते प्राण सोडतं. मला माझ्या मनाच्या मागे धावून जीवन व्यर्थ घालवायचे नाही. "
             " साई मां, तुमच्या या लेकराला वाचवा. कान्हा माझे जीवन तुमच्या हातात आहे." असे म्हणत मी किती आक्रोश केला ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, २४ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " परमेश्वर म्हणजे प्रेम, ही शिकवण होय आणि प्रेम म्हणजेच परमेश्वर हे आचरण होय."

भाग - चौथा

हृद्गत ......... 

१३ जुलै १९८१मध्ये मनाशी केलेला वादविवाद

             बराच वेळ झगडूनही मन ध्यानमग्न होत नव्हते. मी रडून रडून मदतीसाठी विनवण्या करत होते," हे साई मां, तुझ्या लेकराला वाचव. कान्हा, माझे जीवन तुझ्या हातात आहे." शेवटी भगवानांच्या साक्षीने मी मनाबरोबर एक करार केला. फक्त चार दिवसांच्या आत मी मनाला परमानंद स्थिती दाखवली पाहिजे. ह्या चार दिवसांत मनाने माझी आज्ञा पाळली पाहिजे. जर या प्रयत्नांमध्ये मी यशस्वी झाले तर मन माझे गुलाम होऊन राहील आणि जर माझे प्रयत्न अयशस्वी झाले तर मी ह्या मनाची गुलाम होऊन राहीन. ते जिथे म्हणेल तिथे त्याच्यामागे जाईन. मला आवडले नाही तरीसुद्धा मी सक्तीने त्याच्यामागे जाईन. असा करार आमच्यामध्ये झाला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 
 

शनिवार, २३ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती सहावा 

सत्य मनाचे शुद्धीकरण करते. सत्य बोलणे म्हणजे अंर्तशुद्धी मुखातून निघालेला प्रत्येक शब्द सत्य असायला हवा. 
              सत्य साई बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये हेच सांगितले आहे. स्वामींचे गीत ' प्रेम माझे रूप, सत्य माझा श्वास ' परमेश्वर प्रेमस्वरूप आहे. सत्य त्याचा श्वास आहे. तथापि आपण काय बोलतो आहोत हे अगोदर विचारात न घेता सर्वजण बोलतात. जे सत्य आहे तेच आपण बोलले पाहिजे. असे म्हटले जाते '  सत्यं वद् धर्मं चर ' सदा सत्य बोला आणि धर्माच्या मार्गावर वाटचाल करा. तमिळमध्ये वध म्हणजे हत्या. कलियुगातील मनुष्य सत्याची हत्या करून धर्मावर शरसंधान करत आहे. 
               मुलांनी खोटे बोलू नये हे त्यांना कसे सांगितले जाते ह्यावर मी अगोदर लिहिले आहे. मला जेव्हा हे सांगितले गेले तेव्हा मी माझ्या पालकांना विचारले, " असत्य म्हणजे काय ?" मला असत्य म्हणजे काय हेच माहिती नव्हते. मुले निरागस असतात. जेव्हा त्यांना त्याची माहितीच नसते तेव्हा त्यांना खोटे बोलू नका असे का शिकवायचे. मुले निष्पाप आणि निरागस असतात ती नेहमी जे जसे आहे तसेच सांगतात. लहानपणी मी माझ्या कुटुंबातील सर्वांना असत्य म्हणजे काय, हा प्रश्न विचारात असे. पालक आणि शिक्षक दोघांनी ते मुलांना काय शिकवतात ह्याविषयी अत्यंत सावधानता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. मुलांना कोणतीही गोष्ट शिकवण्या अगोदर त्यांनी त्यांच्या जीवनात त्या गोष्टीचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. 
             स्वामींनी केवळ सत्य आणि सत्यच बोलावे असे सांगितले आहे. सत्य बोलण्याने मन शुद्ध आणि पवित्र होते. स्वामी मला ध्यानामध्ये जे सांगतात तेच मी लिहिते. तथापि ते लिहिण्यापूर्वी, मी स्वामींकडे पुरावा मागते. मी जे शब्द ऐकले ते माझ्या मनाचे बोल नसून, स्वामींचेच आहेत ह्याची मी पूर्ण खात्री करून घेते. पूर्वी मी, ज्या घरांमध्ये चमत्कार होत असत तेथे जात असे व त्यावर विश्वास ठेवत असे. नंतर माझ्या असे लक्षात आले की त्या चमत्कारांमध्ये वा संदेशांमध्ये त्यांच्या मनाचे ही मिसळलेले असे.

संदर्भ :- श्री वसंतसाईंच्या साधना - २० एप्रिल ह्या लेखातून. 

जय साईराम  

गुरुवार, २१ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " मातेचा त्याग एवढा महान असतो की फक्त तिच्यापुढे नतमस्तक झाले तरी पुरेसे आहे. " 

भाग - चौथा 
हृद्गत.........    

" प्रेम हा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे ..... "
हृद्गत.......

              माझ्या साधनापर्वामध्ये दैनंदिनी लिहीत असताना, मी तुमच्यासाठी त्यातील काही विचारपुष्पे वेचली. हा भक्तीच्या फुलांचा छोटासा ज्ञानगुच्छ आहे. त्याच्या सौंदर्याने आणि सुगंधाने तुमचे हृदय परमेश्वराच्या प्रेमाने पूर्ण व्याप्त होवो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साई राम



रविवार, १७ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " आपली चिंता व आपले अश्रू जे पूर्वनिर्धारीत असते त्यामध्ये बदल करू शकत नाहीत. त्याऐवजी तुम्ही परमेश्वरासाठी अश्रू ढाळा, तुमच्या चिंतेचे त्याच्या दर्शनाच्या विनवणीमध्ये परिवर्तन करा. "
प्रकरण वीस

वैश्विक मुक्ती भाव

भाव - वैश्विक मुक्ती

             कुंडलिनी शक्ती पाठीच्या कण्याच्या तळाशी असणाऱ्या मूलाधार चक्रामध्ये सुप्तावस्थेत असते. तिचा रंग लाल असतो व त्याला ' लाल बिंदू ' असे संबोधले जाते हे मी पूर्वीच सांगितले आहे. जेव्हा ती जागृत होते तेव्हा ती इतर चक्रांमधून वरती जाते. पुढे ती सहाव्या आणि सातव्या चक्राच्या मध्ये असणाऱ्या ब्रम्हारंध्रातील श्वेत बिंदुला जाऊन मिळते. या संयोगानंतर नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या शक्तीचा उद्भव होतो. बिंदू हा निर्मितीचा आराखडा असून त्यामध्ये अगणित विश्वाची रचना करण्याचे सामर्थ्य असते. यालाच हिरण्यगर्भ किंवा विश्वगर्भ असेही म्हटले जाते.
             ब्रम्हारंध्रापाशी होणाऱ्या लाल बिंदू व श्वेत बिंदू यांचा योग शिव-शक्तीच्या मीलनाचे प्रतीक आहे. माझे सर्व भाव स्वामींवर ऐकवटलेले असल्यामुळे माझी कुंडलिनी शक्ती ब्रम्हारंध्राप्रत पोहोचली. माझे आणि त्यांचे ऐक्य झाले, त्या ऐक्यातून निर्माण होणाऱ्या शक्तीमधून नवीन सृष्टी उदयास येईल. विश्वकल्याणासाठी सत्ययुगाचा जन्म होईल, त्यावेळेस इथे सर्वजण जीवनमुक्त अवस्थेत असतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १४ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जर आपण फक्त परमेश्वराला दृढ धरून ठेवले तर इतर सर्व गोष्टी आपोआपच आपल्याला सोडून जातील."

प्रकरण वीस 

वैश्विक मुक्ती भाव

भाव - त्याग

             मी स्वामींवर केलेल्या अधिकाधिक प्रेमवर्षावाने प्रसन्न होऊन त्यांनी मला ब्रम्हपद व अवतारपद देऊ केले, परंतु मला यातले काहीच नको होते. स्वामी म्हणतात, हा परमेश्वराप्रती असणाऱ्या प्रेमाशी स्पर्धा करणारा त्याग आहे. या अमर्याद त्यागाने वैश्विक मुक्तीचे वरदान मिळवले आहे. 
             त्यागामध्ये एवढी शक्ती कोठून येते ? वैराग्यामधून. परमेश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याकरता तुमच्याकडे शक्तीशाली वैराग्य असलेच पाहिजे. केवळ परमेश्वर हेच सत्य आहे हे जाणून सर्वांचा त्याग करा आणि कोणतीही इच्छा धरू नका. त्याग म्हणजे अमरत्व ! त्याग हेच माझे जीवन आहे. हा भाव-त्याग आहे. 

भाव - आरोग्य 

            स्वामींनी २७ मे २००३ पासून २७ मे २००४ पर्यंत मला गंभीर प्रकृती अस्वास्थाचा अनुभव दिला. हे जगातील सर्व लोकांच्या कर्मांचा संहार करण्यासाठी होते असे  सांगितले. मुक्ती हेच प्रत्येकाचे खरे स्वास्थ्य आहे हे सर्वांना बहाल करण्यासाठी आम्ही अतोनात त्रास सहन केला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १० जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " एकदा का परमेश्वराने आपल्यामध्ये प्रवेश केला की हळूहळू आपली पूर्ण कर्म नष्ट होऊ लागतात."

प्रकरण वीस

वैश्विक मुक्ती भाव

भाव -निर्मिती

               " मला स्वामींची अनुभूती मिळायला हवी." ह्या अतृप्त तृष्णेने मी सतत झपाटलेली असे. ह्यामुळे ' मी जशी स्वामींसाठी रडते तसे प्रत्येकाने रडले पाहिजे. ' अशी प्रार्थना मी करायला लागले. मी म्हणाले, " एका वसंतने स्वामींची अनुभूती घेणे पुरेसे नाही. सर्वांनीच वसंता व्हायला हवे. " स्वामी उत्तरले, " आगळ्या वेगळ्या तऱ्हेने माझी अनुभूती घ्यावी असं तुला नेहमी वाटत असतं. तू म्हणालीस की माझी भक्ती करायला दोन हात, दोन डोळे आणि एक मुख पुरेसे नाही. तुला हजारो हात, डोळे व मुखे हवी होती. त्यानेही तुझे समाधान झाले नाही; तर प्रत्येकानेच वसंता बनून माझ्यासाठी अश्रू ढाळावेत, अशी इच्छा तू केलीस. तुला सर्वांच्याद्वारे माझ्या प्रेमाची अनुभूती घ्यायची होती. याहीपुढे जाऊन तू म्हणालीस की केवळ मानव जाताच नाही तर वृक्ष, वल्ली, पशु, पक्षी संपूर्ण सृष्टीमध्येच तुझे भाव भरून राहायला हवेत. " अशा प्रकारे नवीन सृष्टीची निर्मिती झाली. माझा प्रेमभाव आणि स्वामींचा सत्यभाव सर्वांमध्ये प्रवेशला. स्वामी म्हणाले, " हे सत्ययुग आहे. तू सृष्टीकर्ता, ब्रम्हा आहेस आणि हा आहे भाव-निर्मिती. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ७ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"  केवळ विनयशीलता तुम्हाला इच्छांपासून मुक्ती देईल. "

प्रकरण वीस

वैश्विक मुक्ती भाव

भाव-भावना

             विविध भावांमधून भावना उमलतात - व भावनांमधून भाव व्यक्त केले जातात. आपण समोरच्या व्यक्तीशी किंवा वास्तूशी ज्या नात्याने बांधलेले असतो, त्यानुसार हे भाव व्यक्त होतात. मैत्री, वैवाहिक, कौटुंबिक नात्यांमधील अनेक भावांमधून वेगवेगळ्या भावना आपण व्यक्त करत असतो. याच भावांचा आधार घेऊन परमेश्वरावरील भक्तीही व्यक्त करता येते. असे एकूण नऊ भाव आहेत आणि या नवविध मार्गांनी परमेश्वराची भक्ती करता येते. 
             स्वामीनीं मला मधुर भाव भक्ती करण्यास सांगितले. लहानपणापासूनच मी आंडाळच्या ओव्या गात असे आणि माझा श्रीकृष्णाशी विवाह होत आहे, या कल्पनाविश्वात रमून जात असे. त्या ओव्यांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे विवाहाचे सर्व विधी प्रत्यक्ष घडत आहेत असे मी मनःचक्षूंसमोर पाहत असे. ' यद् भावम् तद् भवति '. माझी कल्पना सत्यात उतरली ! २७ मे रोजी मंगळसूत्राला आशीर्वाद देऊन स्वामींनी माझा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. 
             " परमेश्वराशी विवाह ' या भावाद्वारे नवीन निर्मितीचा आरखडा निर्माण झाला. हा भाव-भावना आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ३ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " आपल्याला इतरांप्रती वाटणारे प्रेम हे वास्तविकतः त्यांच्या अंतर्यामी वास करणाऱ्या ईश्वराप्रती वाटणारे प्रेम होय, हे आपण जाणून घेतले पाहिजे."

प्रकरण वीस 

वैश्विक मुक्ती भाव 

भाव-ज्ञान 
               आपल्या मनात एखादा विचार आल्याक्षणी तो चांगला आहे की वाईट हे आपण तपासून पाहिले पाहिजे ; यालाच विवेकबुद्धी म्हणतात. नेहमी विवेकबुद्धीचा वापर करून आपण योग्य कृती केली पाहिजे. नाहीतर मन बुद्धीला फसवेल.  
               विवेकबुद्धी व सारासार विचार करणे म्हणजेच ज्ञान होय. चांगले वाईट यातील तारतम्यामुळे सत्य काय व असत्य काय याचे ज्ञान होते. केवळ परमेश्वर सत्य आणि बाकी सर्व मिथ्या हे जाणणे म्हणजेच ज्ञान. ज्ञानाद्वारे मी परमेश्वराला धरून ठेवले. केवळ परमेश्वर सत्य आहे, हे मला उमगले. मी त्यांच्या चरणी समर्पित होऊन स्वतःला रिक्त केले. स्वामींनी  रिक्त घटामधये त्यांचे सत्य भरले आणि मी सत्य बनले. अशा तऱ्हेने माझे भाव सत्य झाले. 
               ईश्वराकडे वळवलेले भाव सत्य होतात, तर भौतिक जगाकडे वाळवलेले भाव असत्य बनतात. माझे सर्व भाव ईश्वराकडे वळवण्याची साधना मी कशी केली ? भाव माध्यमातून. यालाच भाव - ज्ञान म्हणतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम