रविवार, १७ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " आपली चिंता व आपले अश्रू जे पूर्वनिर्धारीत असते त्यामध्ये बदल करू शकत नाहीत. त्याऐवजी तुम्ही परमेश्वरासाठी अश्रू ढाळा, तुमच्या चिंतेचे त्याच्या दर्शनाच्या विनवणीमध्ये परिवर्तन करा. "
प्रकरण वीस

वैश्विक मुक्ती भाव

भाव - वैश्विक मुक्ती

             कुंडलिनी शक्ती पाठीच्या कण्याच्या तळाशी असणाऱ्या मूलाधार चक्रामध्ये सुप्तावस्थेत असते. तिचा रंग लाल असतो व त्याला ' लाल बिंदू ' असे संबोधले जाते हे मी पूर्वीच सांगितले आहे. जेव्हा ती जागृत होते तेव्हा ती इतर चक्रांमधून वरती जाते. पुढे ती सहाव्या आणि सातव्या चक्राच्या मध्ये असणाऱ्या ब्रम्हारंध्रातील श्वेत बिंदुला जाऊन मिळते. या संयोगानंतर नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या शक्तीचा उद्भव होतो. बिंदू हा निर्मितीचा आराखडा असून त्यामध्ये अगणित विश्वाची रचना करण्याचे सामर्थ्य असते. यालाच हिरण्यगर्भ किंवा विश्वगर्भ असेही म्हटले जाते.
             ब्रम्हारंध्रापाशी होणाऱ्या लाल बिंदू व श्वेत बिंदू यांचा योग शिव-शक्तीच्या मीलनाचे प्रतीक आहे. माझे सर्व भाव स्वामींवर ऐकवटलेले असल्यामुळे माझी कुंडलिनी शक्ती ब्रम्हारंध्राप्रत पोहोचली. माझे आणि त्यांचे ऐक्य झाले, त्या ऐक्यातून निर्माण होणाऱ्या शक्तीमधून नवीन सृष्टी उदयास येईल. विश्वकल्याणासाठी सत्ययुगाचा जन्म होईल, त्यावेळेस इथे सर्वजण जीवनमुक्त अवस्थेत असतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा