ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" एकदा का परमेश्वराने आपल्यामध्ये प्रवेश केला की हळूहळू आपली पूर्ण कर्म नष्ट होऊ लागतात."
प्रकरण वीस
वैश्विक मुक्ती भाव
" मला स्वामींची अनुभूती मिळायला हवी." ह्या अतृप्त तृष्णेने मी सतत झपाटलेली असे. ह्यामुळे ' मी जशी स्वामींसाठी रडते तसे प्रत्येकाने रडले पाहिजे. ' अशी प्रार्थना मी करायला लागले. मी म्हणाले, " एका वसंतने स्वामींची अनुभूती घेणे पुरेसे नाही. सर्वांनीच वसंता व्हायला हवे. " स्वामी उत्तरले, " आगळ्या वेगळ्या तऱ्हेने माझी अनुभूती घ्यावी असं तुला नेहमी वाटत असतं. तू म्हणालीस की माझी भक्ती करायला दोन हात, दोन डोळे आणि एक मुख पुरेसे नाही. तुला हजारो हात, डोळे व मुखे हवी होती. त्यानेही तुझे समाधान झाले नाही; तर प्रत्येकानेच वसंता बनून माझ्यासाठी अश्रू ढाळावेत, अशी इच्छा तू केलीस. तुला सर्वांच्याद्वारे माझ्या प्रेमाची अनुभूती घ्यायची होती. याहीपुढे जाऊन तू म्हणालीस की केवळ मानव जाताच नाही तर वृक्ष, वल्ली, पशु, पक्षी संपूर्ण सृष्टीमध्येच तुझे भाव भरून राहायला हवेत. " अशा प्रकारे नवीन सृष्टीची निर्मिती झाली. माझा प्रेमभाव आणि स्वामींचा सत्यभाव सर्वांमध्ये प्रवेशला. स्वामी म्हणाले, " हे सत्ययुग आहे. तू सृष्टीकर्ता, ब्रम्हा आहेस आणि हा आहे भाव-निर्मिती.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा