गुरुवार, ७ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"  केवळ विनयशीलता तुम्हाला इच्छांपासून मुक्ती देईल. "

प्रकरण वीस

वैश्विक मुक्ती भाव

भाव-भावना

             विविध भावांमधून भावना उमलतात - व भावनांमधून भाव व्यक्त केले जातात. आपण समोरच्या व्यक्तीशी किंवा वास्तूशी ज्या नात्याने बांधलेले असतो, त्यानुसार हे भाव व्यक्त होतात. मैत्री, वैवाहिक, कौटुंबिक नात्यांमधील अनेक भावांमधून वेगवेगळ्या भावना आपण व्यक्त करत असतो. याच भावांचा आधार घेऊन परमेश्वरावरील भक्तीही व्यक्त करता येते. असे एकूण नऊ भाव आहेत आणि या नवविध मार्गांनी परमेश्वराची भक्ती करता येते. 
             स्वामीनीं मला मधुर भाव भक्ती करण्यास सांगितले. लहानपणापासूनच मी आंडाळच्या ओव्या गात असे आणि माझा श्रीकृष्णाशी विवाह होत आहे, या कल्पनाविश्वात रमून जात असे. त्या ओव्यांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे विवाहाचे सर्व विधी प्रत्यक्ष घडत आहेत असे मी मनःचक्षूंसमोर पाहत असे. ' यद् भावम् तद् भवति '. माझी कल्पना सत्यात उतरली ! २७ मे रोजी मंगळसूत्राला आशीर्वाद देऊन स्वामींनी माझा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. 
             " परमेश्वराशी विवाह ' या भावाद्वारे नवीन निर्मितीचा आरखडा निर्माण झाला. हा भाव-भावना आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा