रविवार, ३ जून, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " आपल्याला इतरांप्रती वाटणारे प्रेम हे वास्तविकतः त्यांच्या अंतर्यामी वास करणाऱ्या ईश्वराप्रती वाटणारे प्रेम होय, हे आपण जाणून घेतले पाहिजे."

प्रकरण वीस 

वैश्विक मुक्ती भाव 

भाव-ज्ञान 
               आपल्या मनात एखादा विचार आल्याक्षणी तो चांगला आहे की वाईट हे आपण तपासून पाहिले पाहिजे ; यालाच विवेकबुद्धी म्हणतात. नेहमी विवेकबुद्धीचा वापर करून आपण योग्य कृती केली पाहिजे. नाहीतर मन बुद्धीला फसवेल.  
               विवेकबुद्धी व सारासार विचार करणे म्हणजेच ज्ञान होय. चांगले वाईट यातील तारतम्यामुळे सत्य काय व असत्य काय याचे ज्ञान होते. केवळ परमेश्वर सत्य आणि बाकी सर्व मिथ्या हे जाणणे म्हणजेच ज्ञान. ज्ञानाद्वारे मी परमेश्वराला धरून ठेवले. केवळ परमेश्वर सत्य आहे, हे मला उमगले. मी त्यांच्या चरणी समर्पित होऊन स्वतःला रिक्त केले. स्वामींनी  रिक्त घटामधये त्यांचे सत्य भरले आणि मी सत्य बनले. अशा तऱ्हेने माझे भाव सत्य झाले. 
               ईश्वराकडे वळवलेले भाव सत्य होतात, तर भौतिक जगाकडे वाळवलेले भाव असत्य बनतात. माझे सर्व भाव ईश्वराकडे वळवण्याची साधना मी कशी केली ? भाव माध्यमातून. यालाच भाव - ज्ञान म्हणतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा