ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
मोती सहावा
सत्य साई बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये हेच सांगितले आहे. स्वामींचे गीत ' प्रेम माझे रूप, सत्य माझा श्वास ' परमेश्वर प्रेमस्वरूप आहे. सत्य त्याचा श्वास आहे. तथापि आपण काय बोलतो आहोत हे अगोदर विचारात न घेता सर्वजण बोलतात. जे सत्य आहे तेच आपण बोलले पाहिजे. असे म्हटले जाते ' सत्यं वद् धर्मं चर ' सदा सत्य बोला आणि धर्माच्या मार्गावर वाटचाल करा. तमिळमध्ये वध म्हणजे हत्या. कलियुगातील मनुष्य सत्याची हत्या करून धर्मावर शरसंधान करत आहे.
मुलांनी खोटे बोलू नये हे त्यांना कसे सांगितले जाते ह्यावर मी अगोदर लिहिले आहे. मला जेव्हा हे सांगितले गेले तेव्हा मी माझ्या पालकांना विचारले, " असत्य म्हणजे काय ?" मला असत्य म्हणजे काय हेच माहिती नव्हते. मुले निरागस असतात. जेव्हा त्यांना त्याची माहितीच नसते तेव्हा त्यांना खोटे बोलू नका असे का शिकवायचे. मुले निष्पाप आणि निरागस असतात ती नेहमी जे जसे आहे तसेच सांगतात. लहानपणी मी माझ्या कुटुंबातील सर्वांना असत्य म्हणजे काय, हा प्रश्न विचारात असे. पालक आणि शिक्षक दोघांनी ते मुलांना काय शिकवतात ह्याविषयी अत्यंत सावधानता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. मुलांना कोणतीही गोष्ट शिकवण्या अगोदर त्यांनी त्यांच्या जीवनात त्या गोष्टीचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वामींनी केवळ सत्य आणि सत्यच बोलावे असे सांगितले आहे. सत्य बोलण्याने मन शुद्ध आणि पवित्र होते. स्वामी मला ध्यानामध्ये जे सांगतात तेच मी लिहिते. तथापि ते लिहिण्यापूर्वी, मी स्वामींकडे पुरावा मागते. मी जे शब्द ऐकले ते माझ्या मनाचे बोल नसून, स्वामींचेच आहेत ह्याची मी पूर्ण खात्री करून घेते. पूर्वी मी, ज्या घरांमध्ये चमत्कार होत असत तेथे जात असे व त्यावर विश्वास ठेवत असे. नंतर माझ्या असे लक्षात आले की त्या चमत्कारांमध्ये वा संदेशांमध्ये त्यांच्या मनाचे ही मिसळलेले असे.
संदर्भ :- श्री वसंतसाईंच्या साधना - २० एप्रिल ह्या लेखातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा