गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" त्यागमार्गानेच परमशांती प्राप्त होते."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

माझे जन्मरहस्य 

७ ऑक्टोबर २००५ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही माझे जन्मरहस्य उघड केलेत ! 
स्वामी - तुझा जन्म एखाद्या सामान्य मानवासारखा कसा असेल ? तू माझ्यामधून प्रकट झालीस आणि माझ्यातच पुन्हा विलीन होशील. पुढील अवतारातही तसेच घडेल. आपण भूतलावर एकत्र जीवन जगू आणि एकत्रच निजधामाला जाऊ. तू तुझा फोटो व तुझ्या आईवडिलांचा फोटो यामध्ये तुलना करून पाहिलेस तर तुझ्या लक्षात येईल, की तू त्या दोघांपैकी कोणा सारखीच दिसत नाहीस. कारण तू स्वयंभू आहेस. तुझ्या ठायी सर्व शक्ती आहेत .... 
ध्यान समाप्ती 
               माझ्या मनात नेहमी हा विचार येत असे की मी माझ्या आईसारखी सुंदर का नाही झाले ? स्वामींनी मला जेव्हा विचारले," प्रेमसाई अवतारात तुझे रूप कसे असावे असे तुला वाटते ?" त्यावर मी उत्तरले," मी गोरी व सुंदर असावी आणि माझे केस लांब असावेत."

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

रविवार, २७ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " केवळ त्यागाने अमरत्व प्राप्त होते. परमेश्वरासाठी भौतिक जीवनाचा त्याग केला तर आपल्या कर्मांचे परिणाम नष्ट होतात."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                परमेश्वर प्राप्ती हे मनुष्याचे ध्येय आहे. त्यासाठी प्रेम हा एकमेव मार्ग आहे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी कशा तऱ्हेने जीवन जगावे ? आपले प्रेम कसे व्यक्त करावे ? मूर्तिमंत प्रेमतत्वाने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सर्वांमध्ये परमेश्वराला कसे पहावे ? तसेच सूक्ष्म जीवजंतुंपासून ते ब्रम्हदेवापर्यंत सर्वांवर प्रेम कसे करावे हे तिने स्वतः उदाहरण घालून दाखवून दिले आहे. केवळ प्रेममार्गानेच मोक्षप्राप्ती होते आणि नरजन्माचा हाच एक उद्देश आहे. ' सर्वांवर प्रेम करा ' हाच तिच्या जीवनाचा संदेश आहे. 
                प्रभू सत्य साई हे साक्षात सत्य स्वरूप आहेत. हा ' वसंता ' जीव साक्षात प्रेमस्वरूप आहे. ते ही तत्वे निदर्शित करण्यासाठी आले आहेत. प्रभू, सत्य आहे, जीवनाचे ध्येय आहे. तर जीव प्रेम आहे, ध्येयप्राप्तीचा मार्ग. 
               (सत्य-परमेश्वर-जीवनाचे ध्येय) (जीव-प्रेम-ध्येयप्राप्तीचा मार्ग)
               अनेकांनी पुरुष प्रकृती तत्वाबद्दल वाचले असेल परंतु त्याचे कार्य कसे चालते याविषयी त्यांना माहीत नसेल. स्वामी आणि मी पुरुष प्रकृती तत्व दर्शवण्यासाठी आलो आहोत. अनेकांना चित् शक्ती म्हणजे काय ? आणि तिचे कार्य कसे चालते ? हे माहीत नाही तसेच ती कुठून येते व कुठे परत जाते हेही माहीत नाही. माझ्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकलात, तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो."

प्रकरण पाच

प्रेम साई अवतार

              अतृप्त प्रेमाच्या शक्तीने सहस्त्रार उघडते व त्यातून नवनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा म्हणजेच बिंदू शक्ती वाहू लागते आणि मला सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवाची अवस्था प्रदान करते. आता मी माझ्या इच्छेनुसार नवीन सृष्टी निर्माण करेन. हेच अवताराच्या अवतारणाचे रहस्य आहे. 
              दोन एक आहेत. 
              या कलियुगामध्ये ना प्रेम आहे ना धर्म ! म्हणून ' ब्रम्हा दोनात विभाजित होऊन, सत्य आणि प्रेम बनून भूतलावर आले. ते एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत. एक ईश्वरत्त्व, सत्यतत्व व प्रेमतत्व असे दोनात विभागून कार्यरत आहे. "
              सत्यतत्व पुट्टपर्तीमध्ये कार्यरत असून " मी परमेश्वर आहे, प्रत्येकजण परमेश्वर आहे, मायेचा त्याग करा." अशी शिकवण देत आहे आणि " मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे." असे पुन्हा पुन्हा सांगत आहे तर प्रेमतत्व इथे " मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे." असे सांगते आहे. यामधून आम्ही घेतलेल्या भूमिकांमधील निराळेपण दिसून येते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम  

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती तेरावा 

विश्वगर्भ 

               सृष्टी अस्तित्वात कशी येते ? परमात्म्याचे अस्तित्व असते. जेव्हा तो निर्मितीचा संकल्प करतो तेव्हा तो स्वतःला पुरुष आणि प्रकृति असे दोन भागात विभागते. पुरुष आणि प्रकृति म्हणजे परमेश्वराचे नर आणि नारी तत्व होय. दोन्ही सत्य आहे, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत  पुरुष पिता आणि प्रकृति माता आहे. भगवद् गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात,
" माझी महद् ब्रम्हरूप मूळ प्रकृति संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदायरूप गर्भाची स्थपणा करतो त्या जड-चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते." 
              पुरुष आणि प्रकृति पासून सर्व जीवांची उत्पत्ती होते. प्रकृति, मूळ प्रकृति वा महामाया ह्या नावांनेही ओळखली जाते. ज्यांना प्रकृतिची कृपा प्राप्त होते, त्यांच्यासाठी ती ज्ञान प्रकट करून त्यांना मायेच्या बेड्यातून मुक्त करेल. ज्यांना प्रकृति तत्वाचा बोध झाला आहे ते जीवनभर आनंदामध्ये राहू शकतील, ज्यांना त्याचा बोध झाला नसेल त्यांच्या वाट्याला दुःख येईल.  
              सर्वात प्रथम आपण परमेश्वराला धरून ठेवले पाहिजे. त्याच्या प्रती असलेल्या प्रेमाची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि समस्त विश्व परमेश्वराचेच रूप आहे हे जाणून घेतले पाहिजे. विश्व परमेश्वराहून वेगळे नाही.  जे ते दोन्ही एक मानून त्याची भक्ती करतात त्यांना इथेच याक्षणी मुक्ती मिळेल. निर्मिती पुर्णम आहे, परमेश्वर आहे. ती परमेश्वरापासून वेगळी नाही परंतु आपण काय करतो ? हे माझे आहे असे म्हणून आपण भिंती उभ्या करतो आणि ह्या सुंदर विश्वाचे विभाजन करतो. ही माझी पत्नी, मुले, माझा देश, माझी जमीन, माझी मालमत्ता असे विभाजन करतो. अशा तऱ्हेने माझे ,माझे, माझे म्हणत छोटे छोटे भाग पाडून भिंती उभ्या करतो. आनंद गमावून आपण आसक्ती, लालसा, क्रोध आणि वासना ह्यांच्या जाळ्यात अडकतो.  
               येथे आपल्या मालकीचे काहीही नाही, सर्व परमेश्वराचे आहे, ह्या भावनेने आपण आपली कर्तव्ये बजावली पाहिजेत तर आपल्याला शांती, आनंद आणि ज्ञान लाभेल. हे विश्व सर्वसत्ताधीश परमेश्वराच्या मालकीचे आहे. आपल्या कर्म करण्याच्या पद्धतीनुसार आपल्याला वेतन मिळेल जर आपण त्या परमेश्वराशी जवळीक साधली, त्याला प्रसन्न करून घेऊन त्याचे प्रेम संपादित केले तर तो आपल्याला मुक्तीचे सर्वोत्तम पारितोषिक देईल. ह्या उलट जर आपण मालमत्तेवर आपली मालकी आणि हक्क प्रस्थापित करू लागलो. स्वयंकेंद्रित वृत्तीने स्वैर वागू लागलो तर पुन्हा त्या भवसागरात फेकून दिले जाऊ हे नक्की ! ह्या विश्वामध्ये कसे जीवन जगावे हे जाणण्यासाठी प्रकृति तत्व समजून घेणे आवश्यक आहे. 
               युगानुयुगे विश्वाने केवळ परमेश्वराच्या नरतत्वाची, पुरुषाची भक्ती केली आहे. त्याचे निर्मितीचे अंग म्हणजे प्रकृति उपेक्षित राहिली. कोणीही परमेश्वराची दुसरी बाजू म्हणजेच विश्व विचारात घेतले नाही तथापि साई अवतार लोकांना प्रकृतिविषयी ज्ञात करून देत आहे. 
                जेव्हा ज्ञान आचरणात आणले जाते तेव्हा लोकांना खरे ज्ञान प्राप्त होते व त्याचे फायदे मिळतात. आजच्या आधुनिक जगात वैज्ञानिक तत्व जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेत प्रयोग केले जातात. प्रात्यक्षिकाद्वारे इच्छित ज्ञानाचा लाभ होतो. पुरुष आणि प्रकृती तत्वाचे निदर्शन करण्यासाठी स्वामींनी आणि मी जन्म घेतला आहे. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या Beyond The Upanishads ह्या पुस्तकातून 

जय साईराम 


रविवार, २० जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेमाद्वारे त्यागाची जोपासना होते. त्यागामुळे प्रेम फोफावते."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               या एकाच विचाराने मी खडतर तप केले. स्वामींनी मला ' वसंतमयम ' प्रदान केले. किमान इथे तरी माझ्या कथेचा शेवट व्हायला हवा होता. परंतु तसे घडले नाही. मी माझी प्रार्थना चालूच ठेवली. की मी स्वामींची अनुभूती घेणं पुरेसं नाही तर स्वामींनीही माझा अनुभव घ्यायला हवा. लक्षावधी वसंतांच्या प्रेमाची अनुभूती स्वामी कशी काय घेणार ? त्यासाठी आम्ही एक योजना बनवली की सर्व पुरुषांना सत्य आणि सर्व स्त्रियांना प्रेम बनवून आम्ही एकमेकांवर प्रेम करू !
               इथे तरी ही संपली का ? नाही. एवढे होऊनही अतृप्त मी, असं म्हणाले की सर्वजण स्वामींच्या आणि माझ्या पोटी जन्माला येऊन माझी मुले बनायला हवीत. विश्वागर्भाचे हेच कारण आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आपल्या भक्तीची गुणवत्ता म्हणजे आपल्या मनोदशेचे थेट प्रतिबिंब."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

अतृप्त 
                 जन्मापासूनच माझे परमेश्वरावर प्रेम होते. मला त्याच्याशी विवाह करायचा होता. परंतु एका सर्वसामान्य मानवानेच माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. परमेश्वराशीच विवाह करण्याचा माझा निर्धार असताना मी वैवाहिक जीवन जगलेच कशी ? हे शक्य कसे झाले, हे स्वामींनी मला यथार्थपणे दर्शवले. माझा ज्यांच्याशी विवाह झाला त्यांच्यामध्ये स्वामींचे दिव्यत्व होते. मी राधा आहे आणि ते माझा कृष्ण आहेत हे स्वामींनी निर्विवादपणे सिद्ध केले. तरी अजूनही माझे प्रेम तृप्त झालं नाही. मला परमेश्वराची तळमळ लागून राहिली आहे. माझे प्रेमच त्यामध्ये अडथळा बनून राहिले आहे. कसे काय ? ते आता आपण पाहू या. 
             ज्याक्षणी स्वामींनी मी राधा आहे असे सांगून जीवनमुक्त अवस्था बहाल केली त्याचक्षणी माझा त्यांच्याशी योग व्हायला हवा होता आणि माझ्या कथेचा शेवट व्हायला हवा होता, परंतु तसे घडले नाही. अशा प्राप्तीने मी तृप्त नव्हते. मी स्वामींनी सांगितले," या एका वसंतेच्या रूपातून प्रेमाचा वर्षाव करणे पुरेसे नाही. अखिल सृष्टी मी होऊन मला तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे. प्रत्येकाने वसंता होऊन तुमच्यावर प्रेम केले पाहिजे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

रविवार, १३ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

            " रात्रंदिवस आपले भाव आपण परमेश्वराला अर्पण केले तर ती २४ तास अखंड परमेश्वराची पूजा होईल. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

               राधा कृष्णाची आहे. मी राधा असेनही पण मी साईकृष्णाची आहे. द्वापारयुगातील कृष्ण आणि राधा, कलियुगातील साईकृष्ण आणि वसंतराधा यांच्याहून वेगळे आहेत. मी द्वापारयुगातील साईकृष्ण पूर्णपणे विसरून गेले आहे. जेव्हा जेव्हा मी कृष्णाबद्दल बोलते किंवा लिहिते, तेव्हा माझ्या मनात फक्त स्वामीच असतात. साईकृष्ण माझा जीव की प्राण आहेत. मी पुन्हा येईन तेव्हा त्यांच्याशी विवाह करेन. परंतु त्यावेळेस आमचे नाम आणि रूप वेगळे असेल आणि म्हणूनच आता मला प्रेम साई माझ्याजवळ यायला नको आहेत. अनेक अवतार त्यांच्या चित् शक्तीसह  भूतलावर आले आहेत. युगायुगांच्या फेऱ्यांमध्ये अनेक राम सीता, अनेक कृष्ण राधा भूतलावर येऊन गेले. तथापि हा सत्य साई आणि वसंत साई अवतार न भूतो न भविष्यती असा आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " अनंत अवकाशाला कोण मर्यादा घालणार ? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याच प्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा वा बंधने नाहीत."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               माझे डोळे भरून आले. मी हे आश्रमवासियांना सांगितल्यावर ते आश्चर्यचकीत झाले. माझ्या या अवस्थेने मी स्वतःसुद्धा आश्चर्यचकीत झाले. प्रेमसाई सुद्धा माझ्याजवळ येऊ नयेत असं मला वाटतं. केवळ स्वामीच माझा जीव, माझा देह, माझी इंद्रिये, माझा अहंकार, माझी बुद्धी आहेत. मी फक्त त्यांचीच आहे. हेच सत्य साई पुन्हा प्रेम साई बनून येणार आहेत; तथापि प्रेम साईंनी ह्या वसंताजवळ यावे हे मला मान्य नाही. अंतःप्रेरणेने ही प्रतिक्रिया माझ्या मनामध्ये उमटली. जसा देह बाहेरील परकी वस्तू नाकारतो. तसे प्रेम साई माझ्याजवळ येत असल्याचे पाहून माझे हृदय भीतीने कंप पावू लागले. माझ्या प्रिय स्वामींव्यतिरिक्त माझे हृदय कोणाचाही स्वीकार करणार नाही. ही माझ्या सतीत्वाची परिसीमा आहे. कृष्ण किंवा प्रेमसाई यांच्यापैकी कोणीही माझ्याजवळ येऊ लागले तर ते मला सहन होत नाही. हा देह फक्त स्वामींचा आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ६ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा काहीही स्पर्श करणार नाही."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               बराच कालावधी लोटल्यानंतर स्वामींनी मला दाखवून दिले की माझे लग्न एका सामान्य मानवाशी झाले नव्हते. माझे लग्न परमेश्वराशीच झाले असल्याचा त्यांनी मला ठोस पुरावा दिला. म्हणून मी अजूनपर्यंत जिवंत आहे. माझा आत्मा परमेश्वराशी बद्ध होता. मी स्वामींना माझ्या गहिऱ्या प्रेमभावाने बांधून टाकले आहे. मी अजूनही जिवंत आहे यावरून हे सिद्ध होते, की स्वामी माझ्या बरोबर आहेत. 
               माझे जर मानवाशी लग्न झाले असते तर मी जिवंतच राहिले नसते. स्वामी म्हणतात की दुसऱ्या अवताराशी जरी माझे नाव जोडले असते तरीही तसेच घडले असते. रामाचे मंगळसूत्र फक्त सीतेसाठी आहे. मी ते घालू शकत नाही. मी फक्त स्वामींची आहे. एकदा मुक्ती निलयममध्ये भजन चालू असताना, स्वामी त्यांच्या खुर्चीत बसले होते मला भजन आणि आरतीच्या वेळेस स्वामींचे नेहमीच दर्शन होते. अचानक स्वामी प्रेमसाई बनून माझ्या दिशेने येऊ लागले. मी किंचाळले," माझ्याजवळ येऊ नका; माझ्याजवळ येऊ नका. मी स्वामींची आहे. पुढील अवतारात मी तुमची होणार आहे. आता यावेळी माझ्याजवळ येऊ नका."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" देहभाव गळून पडल्यावर सत्याचा साक्षात्कार होतो."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                मी रडूनच स्वामींना सांगितले की मी ते  मंगळसूत्र स्वीकारणार नाही. रामाचे मंगळसूत्र फक्त सीताच गळ्यात घालू शकते. 
                आंडाळनी त्यांच्या एका रचनेमध्ये म्हटले आहे, " हे मन्मथा ! विवाहबंधनाने जर माझे नाव एखाद्या सामान्य मानवाशी जोडले गेले तर मी जिवंत राहणार नाही." माझीही स्थिती अशीच आहे. मलाही फक्त परमेश्वराशीच लग्न करायचे होते. परंतु शेवटी मला एका सामान्य मानवाशीच सक्तीने विवाह करावा लागला. " मी आक्रोश करत होते." मी अजूनपर्यंत जिवंत कशी राहिले, माझी भक्ती खोटी आहे का ?"

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम