ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो."
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
अतृप्त प्रेमाच्या शक्तीने सहस्त्रार उघडते व त्यातून नवनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा म्हणजेच बिंदू शक्ती वाहू लागते आणि मला सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवाची अवस्था प्रदान करते. आता मी माझ्या इच्छेनुसार नवीन सृष्टी निर्माण करेन. हेच अवताराच्या अवतारणाचे रहस्य आहे.
दोन एक आहेत. या कलियुगामध्ये ना प्रेम आहे ना धर्म ! म्हणून ' ब्रम्हा दोनात विभाजित होऊन, सत्य आणि प्रेम बनून भूतलावर आले. ते एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत. एक ईश्वरत्त्व, सत्यतत्व व प्रेमतत्व असे दोनात विभागून कार्यरत आहे. "
सत्यतत्व पुट्टपर्तीमध्ये कार्यरत असून " मी परमेश्वर आहे, प्रत्येकजण परमेश्वर आहे, मायेचा त्याग करा." अशी शिकवण देत आहे आणि " मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे." असे पुन्हा पुन्हा सांगत आहे तर प्रेमतत्व इथे " मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे." असे सांगते आहे. यामधून आम्ही घेतलेल्या भूमिकांमधील निराळेपण दिसून येते.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा