रविवार, २७ जानेवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " केवळ त्यागाने अमरत्व प्राप्त होते. परमेश्वरासाठी भौतिक जीवनाचा त्याग केला तर आपल्या कर्मांचे परिणाम नष्ट होतात."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                परमेश्वर प्राप्ती हे मनुष्याचे ध्येय आहे. त्यासाठी प्रेम हा एकमेव मार्ग आहे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी कशा तऱ्हेने जीवन जगावे ? आपले प्रेम कसे व्यक्त करावे ? मूर्तिमंत प्रेमतत्वाने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सर्वांमध्ये परमेश्वराला कसे पहावे ? तसेच सूक्ष्म जीवजंतुंपासून ते ब्रम्हदेवापर्यंत सर्वांवर प्रेम कसे करावे हे तिने स्वतः उदाहरण घालून दाखवून दिले आहे. केवळ प्रेममार्गानेच मोक्षप्राप्ती होते आणि नरजन्माचा हाच एक उद्देश आहे. ' सर्वांवर प्रेम करा ' हाच तिच्या जीवनाचा संदेश आहे. 
                प्रभू सत्य साई हे साक्षात सत्य स्वरूप आहेत. हा ' वसंता ' जीव साक्षात प्रेमस्वरूप आहे. ते ही तत्वे निदर्शित करण्यासाठी आले आहेत. प्रभू, सत्य आहे, जीवनाचे ध्येय आहे. तर जीव प्रेम आहे, ध्येयप्राप्तीचा मार्ग. 
               (सत्य-परमेश्वर-जीवनाचे ध्येय) (जीव-प्रेम-ध्येयप्राप्तीचा मार्ग)
               अनेकांनी पुरुष प्रकृती तत्वाबद्दल वाचले असेल परंतु त्याचे कार्य कसे चालते याविषयी त्यांना माहीत नसेल. स्वामी आणि मी पुरुष प्रकृती तत्व दर्शवण्यासाठी आलो आहोत. अनेकांना चित् शक्ती म्हणजे काय ? आणि तिचे कार्य कसे चालते ? हे माहीत नाही तसेच ती कुठून येते व कुठे परत जाते हेही माहीत नाही. माझ्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकलात, तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा