ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" अनंत अवकाशाला कोण मर्यादा घालणार ? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याच प्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा वा बंधने नाहीत."
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
माझे डोळे भरून आले. मी हे आश्रमवासियांना सांगितल्यावर ते आश्चर्यचकीत झाले. माझ्या या अवस्थेने मी स्वतःसुद्धा आश्चर्यचकीत झाले. प्रेमसाई सुद्धा माझ्याजवळ येऊ नयेत असं मला वाटतं. केवळ स्वामीच माझा जीव, माझा देह, माझी इंद्रिये, माझा अहंकार, माझी बुद्धी आहेत. मी फक्त त्यांचीच आहे. हेच सत्य साई पुन्हा प्रेम साई बनून येणार आहेत; तथापि प्रेम साईंनी ह्या वसंताजवळ यावे हे मला मान्य नाही. अंतःप्रेरणेने ही प्रतिक्रिया माझ्या मनामध्ये उमटली. जसा देह बाहेरील परकी वस्तू नाकारतो. तसे प्रेम साई माझ्याजवळ येत असल्याचे पाहून माझे हृदय भीतीने कंप पावू लागले. माझ्या प्रिय स्वामींव्यतिरिक्त माझे हृदय कोणाचाही स्वीकार करणार नाही. ही माझ्या सतीत्वाची परिसीमा आहे. कृष्ण किंवा प्रेमसाई यांच्यापैकी कोणीही माझ्याजवळ येऊ लागले तर ते मला सहन होत नाही. हा देह फक्त स्वामींचा आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा