गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " केवळ त्यागाने अमरत्व प्राप्त होते. परमेश्वरासाठी भौतिक जीवनाचा त्याग केला तर आपल्या कर्मांचे परिणाम नष्ट होतात."

प्रकरण सहा

सतीत्व

                पतीला परमेश्वर मानणाऱ्या अनेक महान पतिव्रता स्त्रिया आहेत, ज्यांच्या पातिव्रत्यामुळेच त्या महान बनल्या; माझे पातिव्रत्य असे आहे जे परमेश्वरालाच पती मानते. ते जगातील कर्मांचा संहार करून वैश्विक मुक्ती बहाल करत आहे.
               आता अवतारांमधील सर्वश्रेष्ठ अवतार भूतलावर आलेला आहे. त्याला साजेशीच माझी वर्तवणूक असायला हवी. सिमल्यामध्ये स्वामींनी माझ्या गळ्यामध्ये हार घातला; मला वाटले, हा माझ्या पातिव्रत्याला लागलेला कलंक आहे. मी स्वामींना याविषयी विचारले.
               स्वामींनी पुष्कळ साखळ्या आणि अंगठ्या साक्षात करून अनेक स्त्री पुरुषांना घातल्या आहेत. तुम्हाला कदाचित असे वाटेल ' स्वामींनी तुमच्यासाठी हे केले तर तुमचे पातिव्रत्य कसे भंग पावेल ?' इतरांसाठी ही एक साधी कृती असेल परंतु माझ्यासाठी तसे नाही. कारण मी परमेश्वराची शक्ती आहे. सर्व देवदेवता, ऋषिमुनींना हे माहित आहे. तथापि या मानवी जगात क्षणाक्षणाला माझ्या शुचितेद्वारे मला हे सिद्ध करावे लागते. सीतेने अग्निपरीक्षा दिल्यानंतरही जगाने तिला दोषी ठरवले.


उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम 

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" त्यागमार्गानेच परमशांती प्राप्त होते. " 

प्रकरण सहा 

सतीत्व 

तप आणि पातिव्रत्य 

              तप आणि पातिव्रत्य माझ्या दोन डोळ्यांप्रमाणे आहेत. तप म्हणजे काय ? मी कोणते तप केले ? माझे पातिव्रत्य हेच माझे तप आहे. तप आणि पातिव्रत्य दोन्ही वेगळे नसून अविभक्त आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझा प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यावर मी बारकाईने लक्ष ठेवते. माझ्या पातिव्रत्याला परमेश्वराशी संबंधित नसलेला एकही शब्द मान्य नाही. या ज्ञानाच्या वर्षावाचे हेच कारण आहे. ज्ञान, पातिव्रत्य आणि तप हे तिन्ही वेगळे नाहीत. माझे तप व पातिव्रत्य यामुळे युग बदलते आहे. जन्मापासून मी घेतलेल्या शपथा व केलेली व्रतवैकल्ये माझे तप बनले. स्वामीशिवाय इतर कशाचाही विचार न करण्याचा माझा स्वभाव माझे पातिव्रत्य बनला. 
           मी अगदी क्षणभरही परमेश्वराचा विसर पडू देत नाही. 
           ही झाली तपश्चर्या 
           मी दुसरा कोणताही विचार न करता फक्त परमेश्वराचाच विचार करते. 
           हेच पातिव्रत्य आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती चौदावा
मी पृथ्वी आहे


               मी पृथ्वी आहे. मी सर्वांमधून विस्तार पावेन. मी सर्वांना धारण करेन. माझ्यामध्ये असणारी सर्व नैसर्गिक साधने व संपत्ती मी सर्वांना बहाल करेन. मी वसुंधरा आहे. माझी अनमोल संपदा मी सर्वांना विनामूल्य देईन. मी सर्वांना शांती प्रदान करेन. शांतीचा प्रसार सर्वत्र होईल. माझ्यामध्ये असणाऱ्या कोणालाही इजा पोहचणार नाही. चांगले- वाईट मी सर्व सहन करेन.  
              पृथ्वी कर्मभूमी आहे. संचित कर्मांमुळे लोकं पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. आपल्या गतकर्मांमुळे आपण आता पृथ्वीवर जन्म घेतला आहे. कर्म म्हणजे काय ? कर्म म्हणजे स्पर्शभाव. ज्या कृती आपल्याला स्पर्श करतात व आपल्यासाठी परिणामकारक असतात त्यांना कर्म म्हणतात. स्पर्श म्हणजे काय ? ज्या घटना आणि वस्तू आपला विचार, उच्चार आणि आचार ह्यावर परिणामकारक ठरतात तो ' स्पर्श ' वा स्पर्शभाव. हा स्पर्शभाव आनंद - दुःख, आवड - नावड,प्रेम -तिरस्कार असा द्वंद्वभाव निर्माण करतो. त्यामुळेच मनुष्य जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकतो. ह्या स्पर्शभावामुळे मनुष्य पृथ्वीवर जन्म घेतो. पृथ्वी स्पर्शभावाचे क्षेत्र आहे आपण त्या क्षेत्रास कर्मभूमी म्हणतो . माझा स्पर्शभाव केवळ परमेश्वरासाठी आहे.   
               मी प्रकृतिचे प्रतिनिधित्व करते. प्रकृति म्हणजे पृथ्वी. मी मला स्वतःला पृथ्वीरूपात विस्तारित करते आहे. ह्या नूतन वसंतपृथ्वीवर कर्माचे फल नाही परिणामतः सर्वत्र शांती नांदेल. सर्वांना त्याचा लाभ मिळेल. पृथ्वी म्हणजे संयम आणि सहिष्णुता ह्यांचे प्रतिक आहे. 
               संत थिरुवल्लूवर म्हणतात, " पृथ्वी जशी तिला लुबाडणाऱ्या सर्वांविषयी सहिष्णुता बाळगते. त्यांना सहन करते तसे तुम्हीही तुमचे सर्व अवमान संयमपूर्वक सहन केले पाहिजेत." ते म्हणतात त्याप्रमाणे, जे माझा अवमान करतात, मला दुखावतात त्यांना मी संयमपूर्वक सहन करते. मी वैश्विक मुक्ती मागते आहे. माझ्या मनात कोणाविषयीही तिरस्काराची भावना नाही. 
              जे जन्म घेत नाहीत ते परमेश्वरमध्ये विलीन झालेले असतात. जे जन्म घेतात ते स्पर्शभावनाविना कसे जगू शकतील ? माझे जीवन पाहाल तर माझे भाव केवळ परमेश्वरालाच स्पर्श करतात. त्यातूनच नवनिर्मिती झाली आहे. 


संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'शिवसूत्र ' पुस्तकातून 

जय साईराम 

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

            " जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही."

प्रकरण सहा 

सतीत्व 

             केवळ एकाग्र पातिव्रत्य आणि संपूर्ण सदाचरण  ह्या दोन गोष्टींमुळे अवताराची पत्नी होणे शक्य आहे. केवळ पत्नीच त्यांना स्पर्श करू शकते. यासाठी मला माझा देह परिशुद्ध केला पाहिजे. माझ्या जीवनातील क्षण न् क्षण मी फक्त त्यांच्यासाठीच व्यतीत केला पाहिजे. 
             स्वामी म्हणले, 
             " पातिव्रत्याची अशी परमोच्च पातळी आजवर कोणीही प्राप्त केली नाही. हे एकाग्र परमोच्च पातिव्रत्य जगामध्ये परिवर्तन घडवेल. हे जगातील सर्व कर्मे भस्मसात करेल. ही परमोच्च साधना तू पूर्णत्वास नेलीस, त्यामुळे तुला वैश्विक मुक्तीचे परमोच्च फल प्राप्त होईल. "
              माझा पातिव्रत्याचा दृष्टिकोन इतरांहून वेगळा का आहे ? त्याचे कारण ... 
              " मी एक अशी स्त्री आहे जी अगोदर त्यांच्याशी संयुक्त होती. आता त्यांच्यापासून विलग झाली आहे व पुन्हा त्यांच्याशी संयुक्त होणार आहे." 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " केवळ परमेश्वराला स्पर्श केल्याने आपल्याला चिरंतन शांतीचा लाभ होतो."

प्रकरण सहा 

सतीत्व 

                 हे विलक्षण स्पष्टीकरण आहे. मी माझी सर्व शक्ती स्वामींना अर्पण केली. ही तपाची शक्ती आणि परमेश्वराप्रति एकाग्र प्रेम यामुळे सत्याने माझ्यामध्ये प्रवेश करून मला भरून टाकले. सर्वांमध्ये पवित्र प्रेम प्रवेश करून जगातील कर्माचा नाश करत आहे आणि सर्वांना मुक्तीकडे घेऊन जात आहे. 
                 हे माझ्या जीवनाचे रहस्य आहे. मी लिहिले आहे की प्रेमाचे विस्तृतीकरण म्हणजे मातृभाव. भौतिक विषयांबद्दल असणारी कामभावना मनुष्याला बंधनात टाकते, तो जन्ममृत्यूच्या सापळ्यात अडकतो. परंतु तो काम जर परमेश्वराकडे वळवला तर प्रेम कामाचा नाश करून त्याचे मातृभावामध्ये रूपांतर करते आणि वैश्विक मुक्तीप्रत घेऊन जाते. ब्रम्हा, विष्णू, महेश्वर अनुसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी गेले. तिच्या पतिव्रत्याने त्यांचे तान्ह्या बालकांमध्ये रूपांतर झाले. पातिव्रत्यामध्ये त्रिमूर्तींना बालके बनवण्याचे सामर्थ्य आहे ! एका ऋषीपत्नीच्या पातिव्रत्यामध्ये एवढे सामर्थ्य, मग कल्पना करा की जी फक्त परमेश्वरावरच प्रेम करते तिच्या पातिव्रत्यामध्ये केवढे सामर्थ्य असेल. जी परमेश्वरालाच पती मानून त्याच्यावर प्रेम करते, कल्पना करा की तिच्या सतीत्वामध्ये केवढे सामर्थ्य असेल. हा एकाग्र सतीत्वाचा अग्नी जगातील सर्व काम आणि कर्म भस्मसात करून जगामध्ये सत्ययुग आणत आहे. 




उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम    

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" शुद्ध भावांमुळे आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्त होते. "

प्रकरण सहा

सतीत्व

               जर ह्यांच्या पतीवर असणाऱ्या पवित्र प्रेमामध्ये एवढे सामर्थ्य असते तर कल्पना करा की जर एखादीने परमेश्वराला पती मानले तर त्या प्रेमाचे सामर्थ्य केवढे असेल. यावर चिंतन करत असताना माझ्या मनात विचार आला," या एकाग्र प्रेमामध्ये, पातिव्रत्यामध्ये केवढे सामर्थ्य असेल ?"
               मी स्वामींना याविषयी विचारले असता ते म्हणाले," तुझ्या प्रेमामध्ये, तुला सत्य बनवण्याचे सामर्थ्य आहे. एवढेच नाही तर तू सत्य बनून तुझ्या प्रेमाने आणि मातृभावाने मला भरून टाकलेस. मी माझ्या हातातील कर्माचा तराजू फेकून दिला आणि वैश्विक मुक्ती द्यायला तयार झालो."
               मी म्हणाले," स्वामी, केवढे हे महान सत्य तुम्ही प्रकट केलेत ! तुम्ही केवळ सत्य असता तर तुमच्या हातामध्ये कर्मतराजू असता ; परंतु माझ्या मातृभावाने तुमच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे तुम्ही आई बनून तराजूची पारडी दूर फेकून दिलीत."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

रविवार, १० फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये (मनातील ) भाव अत्यंत महत्वाचे आहेत. "

प्रकरण सहा 
सतीत्व 


               " विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्तरांवर पातिव्रत्याचे काटेकोर पालन केले गेले पाहिजे."

सतीत्वाचे सामर्थ्य 

                २००३ च्या उन्हाळ्यामध्ये मी इतिहासातील पतिव्रता स्त्रियांविषयी सतत विचार करत होते. अनसूया, पद्मावती, मंदोदरी आणि इतर स्त्रियांच्या कथांवर मी चिंतन केले. संत तिरुवल्लर यांच्या एका वाचनाची मला आठवण झाली. 
               " जर पतिव्रतेने वरुणाला पाऊस पाडण्याची आज्ञा केली तर पाऊस पडेल." 
               संत तिरुवल्लर यांचे हे वाचन पातिव्रत्याचे सामर्थ्य दर्शवते. जर पतिव्रतेने सूर्याला उगवू नकोस अशी आज्ञा दिली, तर सूर्य उगवणार नाही. जर तिने अग्नीकडे सर्व जाळून टाकण्याची मागणी केली, तर सर्व काही भस्मसात होईल. एवढेच नव्हे तर पंचमहाभूतेही पातिव्रत्यापुढे नतमस्तक होतात. पतीवरील एकाग्र प्रेमामुळेच त्या पातिव्रत्याची उच्च पातळी गाठू शकतात. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे. " 

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

समारोप 
               सर्वसाधारणपणे आत्मचरित्र म्हटले की त्यामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग लिहिलेले असतात. परंतु माझे आत्मचरित्र म्हणजे केवळ माझ्या भावविश्वाची अभिव्यक्ती आहे. जन्मापासून आजमितीपर्यंत निर्माण झालेल्या माझ्या भावविश्वाभोवतीच माझे जीवन केंद्रित आहे. तसेच माझ्या आयुष्याची वाटचालही ह्या भावविश्वाभोवतीच होत आहे. अशा भाववर्षावामुळेच एखादा प्रभूपद प्राप्त करतो. लहानपणापासूनच माझ्या मनात कृष्णाविषयी असणारा प्रेमभावाच वैश्विक मुक्तीचे प्रमुख कारण आहे. माझे जीवन कर्मकायद्यावर आधारित प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी हे तत्व उलगडून दाखवते. लोकांना कर्मकायदा समजत नाही आणि त्यामुळे ते पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. 
                आपला प्रत्येक विचार आपले जीवन निश्चित करत असतो. प्रत्येक विचार प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी निर्माण करतो. हे स्पष्टपणे तपशीलवार समजून घेतल्यास आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमधून सुटका होईल. माझे भाव संपूर्णपणे भगवंतावर केंद्रित आहेत. या परमेश्वराप्रती असणाऱ्या एकाग्र भावांमुळे मी प्रतिबिंब, प्रतिक्रिया, प्रतिध्वनी तत्वाद्वारे नवनिर्मित करू शकते आणि सत्ययुग आणू शकते. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" कर्मफळांचा त्याग केल्यानंतरच परमेश्वर प्राप्ती होते."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               मी माझ्या आई वडिलांसारखी दिसत नाही याचे कारण स्वामी देत आहेत. ते म्हणतात, की मी ज्योतीरूपाने आईच्या गर्भात प्रवेश केला हेच त्याचे कारण आहे. आमचे अवतार कार्य सिद्धीस गेल्यानंतर माझा देह पुन्हा ज्योतीरूप बनून स्वामींमध्ये विलीन होईल. त्यानंतर मी प्रेमसाई अवतारामध्ये स्वामींच्या देहातून परत ज्योतीरूपाने बाहेर पडून जन्म घेईन. ती ज्योत माझ्या आईच्या गर्भामध्ये प्रवेश करेल आणि मी प्रेम बनून जन्म घेईन. प्रेम साई अवतारातील कार्य पूर्णत्वास गेले, की आम्ही एकत्र इहलोक सोडून जाऊ. 
                माझे जन्मरहस्य मी स्वामींची चत्शक्ती असल्याचे सिद्ध करते. आम्ही एकातून दोघांमध्ये विभागलो गेलो आहोत. आमचा योग झाला की आम्ही पुन्हा एक होऊ. प्रेम साई अवतारात पुन्हा एकदा आम्ही विभागले जाऊ. एक दोन होतील. अखेरीस आम्ही एकत्र निजधामाला जाऊ. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम