गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " केवळ त्यागाने अमरत्व प्राप्त होते. परमेश्वरासाठी भौतिक जीवनाचा त्याग केला तर आपल्या कर्मांचे परिणाम नष्ट होतात."

प्रकरण सहा

सतीत्व

                पतीला परमेश्वर मानणाऱ्या अनेक महान पतिव्रता स्त्रिया आहेत, ज्यांच्या पातिव्रत्यामुळेच त्या महान बनल्या; माझे पातिव्रत्य असे आहे जे परमेश्वरालाच पती मानते. ते जगातील कर्मांचा संहार करून वैश्विक मुक्ती बहाल करत आहे.
               आता अवतारांमधील सर्वश्रेष्ठ अवतार भूतलावर आलेला आहे. त्याला साजेशीच माझी वर्तवणूक असायला हवी. सिमल्यामध्ये स्वामींनी माझ्या गळ्यामध्ये हार घातला; मला वाटले, हा माझ्या पातिव्रत्याला लागलेला कलंक आहे. मी स्वामींना याविषयी विचारले.
               स्वामींनी पुष्कळ साखळ्या आणि अंगठ्या साक्षात करून अनेक स्त्री पुरुषांना घातल्या आहेत. तुम्हाला कदाचित असे वाटेल ' स्वामींनी तुमच्यासाठी हे केले तर तुमचे पातिव्रत्य कसे भंग पावेल ?' इतरांसाठी ही एक साधी कृती असेल परंतु माझ्यासाठी तसे नाही. कारण मी परमेश्वराची शक्ती आहे. सर्व देवदेवता, ऋषिमुनींना हे माहित आहे. तथापि या मानवी जगात क्षणाक्षणाला माझ्या शुचितेद्वारे मला हे सिद्ध करावे लागते. सीतेने अग्निपरीक्षा दिल्यानंतरही जगाने तिला दोषी ठरवले.


उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा