ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
मोती
चौदावा
मी पृथ्वी आहे
पृथ्वी कर्मभूमी आहे. संचित कर्मांमुळे लोकं पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. आपल्या गतकर्मांमुळे आपण आता पृथ्वीवर जन्म घेतला आहे. कर्म म्हणजे काय ? कर्म म्हणजे स्पर्शभाव. ज्या कृती आपल्याला स्पर्श करतात व आपल्यासाठी परिणामकारक असतात त्यांना कर्म म्हणतात. स्पर्श म्हणजे काय ? ज्या घटना आणि वस्तू आपला विचार, उच्चार आणि आचार ह्यावर परिणामकारक ठरतात तो ' स्पर्श ' वा स्पर्शभाव. हा स्पर्शभाव आनंद - दुःख, आवड - नावड,प्रेम -तिरस्कार असा द्वंद्वभाव निर्माण करतो. त्यामुळेच मनुष्य जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकतो. ह्या स्पर्शभावामुळे मनुष्य पृथ्वीवर जन्म घेतो. पृथ्वी स्पर्शभावाचे क्षेत्र आहे आपण त्या क्षेत्रास कर्मभूमी म्हणतो . माझा स्पर्शभाव केवळ परमेश्वरासाठी आहे.
मी प्रकृतिचे प्रतिनिधित्व करते. प्रकृति म्हणजे पृथ्वी. मी मला स्वतःला पृथ्वीरूपात विस्तारित करते आहे. ह्या नूतन वसंतपृथ्वीवर कर्माचे फल नाही परिणामतः सर्वत्र शांती नांदेल. सर्वांना त्याचा लाभ मिळेल. पृथ्वी म्हणजे संयम आणि सहिष्णुता ह्यांचे प्रतिक आहे.
संत थिरुवल्लूवर म्हणतात, " पृथ्वी जशी तिला लुबाडणाऱ्या सर्वांविषयी सहिष्णुता बाळगते. त्यांना सहन करते तसे तुम्हीही तुमचे सर्व अवमान संयमपूर्वक सहन केले पाहिजेत." ते म्हणतात त्याप्रमाणे, जे माझा अवमान करतात, मला दुखावतात त्यांना मी संयमपूर्वक सहन करते. मी वैश्विक मुक्ती मागते आहे. माझ्या मनात कोणाविषयीही तिरस्काराची भावना नाही.
जे जन्म घेत नाहीत ते परमेश्वरमध्ये विलीन झालेले असतात. जे जन्म घेतात ते स्पर्शभावनाविना कसे जगू शकतील ? माझे जीवन पाहाल तर माझे भाव केवळ परमेश्वरालाच स्पर्श करतात. त्यातूनच नवनिर्मिती झाली आहे.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'शिवसूत्र ' पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा