ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" त्यागमार्गानेच परमशांती प्राप्त होते. "
प्रकरण सहा
सतीत्व
तप आणि पातिव्रत्य
तप आणि पातिव्रत्य माझ्या दोन डोळ्यांप्रमाणे आहेत. तप म्हणजे काय ? मी कोणते तप केले ? माझे पातिव्रत्य हेच माझे तप आहे. तप आणि पातिव्रत्य दोन्ही वेगळे नसून अविभक्त आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझा प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यावर मी बारकाईने लक्ष ठेवते. माझ्या पातिव्रत्याला परमेश्वराशी संबंधित नसलेला एकही शब्द मान्य नाही. या ज्ञानाच्या वर्षावाचे हेच कारण आहे. ज्ञान, पातिव्रत्य आणि तप हे तिन्ही वेगळे नाहीत. माझे तप व पातिव्रत्य यामुळे युग बदलते आहे. जन्मापासून मी घेतलेल्या शपथा व केलेली व्रतवैकल्ये माझे तप बनले. स्वामीशिवाय इतर कशाचाही विचार न करण्याचा माझा स्वभाव माझे पातिव्रत्य बनला.
मी अगदी क्षणभरही परमेश्वराचा विसर पडू देत नाही.
ही झाली तपश्चर्या
मी दुसरा कोणताही विचार न करता फक्त परमेश्वराचाच विचार करते.
हेच पातिव्रत्य आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा