ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" शुद्ध भावांमुळे आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्त होते. "
प्रकरण सहा
सतीत्व
जर ह्यांच्या पतीवर असणाऱ्या पवित्र प्रेमामध्ये एवढे सामर्थ्य असते तर कल्पना करा की जर एखादीने परमेश्वराला पती मानले तर त्या प्रेमाचे सामर्थ्य केवढे असेल. यावर चिंतन करत असताना माझ्या मनात विचार आला," या एकाग्र प्रेमामध्ये, पातिव्रत्यामध्ये केवढे सामर्थ्य असेल ?"
मी स्वामींना याविषयी विचारले असता ते म्हणाले," तुझ्या प्रेमामध्ये, तुला सत्य बनवण्याचे सामर्थ्य आहे. एवढेच नाही तर तू सत्य बनून तुझ्या प्रेमाने आणि मातृभावाने मला भरून टाकलेस. मी माझ्या हातातील कर्माचा तराजू फेकून दिला आणि वैश्विक मुक्ती द्यायला तयार झालो."मी म्हणाले," स्वामी, केवढे हे महान सत्य तुम्ही प्रकट केलेत ! तुम्ही केवळ सत्य असता तर तुमच्या हातामध्ये कर्मतराजू असता ; परंतु माझ्या मातृभावाने तुमच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे तुम्ही आई बनून तराजूची पारडी दूर फेकून दिलीत."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा