ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे. "
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
समारोप
सर्वसाधारणपणे आत्मचरित्र म्हटले की त्यामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग लिहिलेले असतात. परंतु माझे आत्मचरित्र म्हणजे केवळ माझ्या भावविश्वाची अभिव्यक्ती आहे. जन्मापासून आजमितीपर्यंत निर्माण झालेल्या माझ्या भावविश्वाभोवतीच माझे जीवन केंद्रित आहे. तसेच माझ्या आयुष्याची वाटचालही ह्या भावविश्वाभोवतीच होत आहे. अशा भाववर्षावामुळेच एखादा प्रभूपद प्राप्त करतो. लहानपणापासूनच माझ्या मनात कृष्णाविषयी असणारा प्रेमभावाच वैश्विक मुक्तीचे प्रमुख कारण आहे. माझे जीवन कर्मकायद्यावर आधारित प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी हे तत्व उलगडून दाखवते. लोकांना कर्मकायदा समजत नाही आणि त्यामुळे ते पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. आपला प्रत्येक विचार आपले जीवन निश्चित करत असतो. प्रत्येक विचार प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी निर्माण करतो. हे स्पष्टपणे तपशीलवार समजून घेतल्यास आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमधून सुटका होईल. माझे भाव संपूर्णपणे भगवंतावर केंद्रित आहेत. या परमेश्वराप्रती असणाऱ्या एकाग्र भावांमुळे मी प्रतिबिंब, प्रतिक्रिया, प्रतिध्वनी तत्वाद्वारे नवनिर्मित करू शकते आणि सत्ययुग आणू शकते.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा