ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" केवळ परमेश्वराला स्पर्श केल्याने आपल्याला चिरंतन शांतीचा लाभ होतो."
प्रकरण सहा
सतीत्व
हे माझ्या जीवनाचे रहस्य आहे. मी लिहिले आहे की प्रेमाचे विस्तृतीकरण म्हणजे मातृभाव. भौतिक विषयांबद्दल असणारी कामभावना मनुष्याला बंधनात टाकते, तो जन्ममृत्यूच्या सापळ्यात अडकतो. परंतु तो काम जर परमेश्वराकडे वळवला तर प्रेम कामाचा नाश करून त्याचे मातृभावामध्ये रूपांतर करते आणि वैश्विक मुक्तीप्रत घेऊन जाते. ब्रम्हा, विष्णू, महेश्वर अनुसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी गेले. तिच्या पतिव्रत्याने त्यांचे तान्ह्या बालकांमध्ये रूपांतर झाले. पातिव्रत्यामध्ये त्रिमूर्तींना बालके बनवण्याचे सामर्थ्य आहे ! एका ऋषीपत्नीच्या पातिव्रत्यामध्ये एवढे सामर्थ्य, मग कल्पना करा की जी फक्त परमेश्वरावरच प्रेम करते तिच्या पातिव्रत्यामध्ये केवढे सामर्थ्य असेल. जी परमेश्वरालाच पती मानून त्याच्यावर प्रेम करते, कल्पना करा की तिच्या सतीत्वामध्ये केवढे सामर्थ्य असेल. हा एकाग्र सतीत्वाचा अग्नी जगातील सर्व काम आणि कर्म भस्मसात करून जगामध्ये सत्ययुग आणत आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा