गुरुवार, १६ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्मांची निर्मिती करत असता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात ढकलतात."

भाग - सातवा
 
प्रेम सूत्र 

२४ जून २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, मला तुमच्याविषयी एवढे प्रेम का वाटते ? हे प्रेम मला वेडेपिसे बनवते. 
स्वामी - प्रेम सदैव भरभरून येते. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यक्ती अथवा वस्तूची गरज असते. प्रेमाशिवाय जगाचे अस्तित्व असू शकत नाही. केवळ प्रेमाद्वारे जगाचे व्यवहार चालतात. 
वसंता - स्वामी, आता मला समजले. 
स्वामी - केवळ प्रेम जगाच्या अस्तित्वाचे कारण आहे. प्रेमामुळे जगाणे रूप धारण केले आहे. प्रेमभावनेला सदोदित द्यायची इच्छा असते. तुझं प्रेमसुद्धा तसंच आहे, ते सर्वांना देत असते. तुझ्याप्रेमाने संपूर्ण विश्वाला कवटाळले आहे. 
           प्रेम विस्तार पावते. प्रेमाशिवाय जग असूच शकत नाही. प्रेमाच्या पायावरच विश्वाची निर्मिती झाली आहे. प्रेमाशिवाय निर्मिती नाही. 
           दानशीलता (देण्याची वृत्ती ) हे प्रेमाचे वैशिष्ट्य आहे. दिल्याने प्रेम वाढते. प्रेम स्वतःला अनेक मार्गांनी व्यक्त करते. याबद्दल मी पूर्वी बरेच काही लिहिले आहे. 
            माझे प्रेमही असेच आहे. मला जे जे काही प्राप्त होते ते सर्वांमध्ये वाटून द्यावे असे मला वाटते. ह्या वसंताकडे जे काही आहे, ते सर्वांकडे असायलाच हवे. जंतूपासून ते ब्रह्मपर्यंत सर्वांकडे सारखेच असायला हवे. 
            मनुष्य म्हणतो, " मला हे हवे, मला ते हवे. " पैसा, घरदार, नावलौकिक, पदव्या, व्यवसाय सर्व अशाश्वत आहे. मी काय प्राप्त केले आहे ? परमेश्वराचे प्रेम, शाश्वत प्रेम, मोक्षावस्था, शाश्वत आनंद, शांती. सर्वांनी याचा आनंद लुटावा अशी माझी इच्छा आहे. कोणताही भेदभाव न पाहणारा माझा स्वभाव अखिल विश्वास आलिंगन देतो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा